Breaking News

Ramprahar Team

वामणे रेल्वेस्थानकात सहा प्रवासी जखमी

महाड ़़: प्रतिनिधी कोकण रेल्वेच्या वामणे स्थानकात सोमवारी (दि. 27) रात्री गाडीतून उतरणारे सहा प्रवासी खाली पडले आणि काही सेकंदात गाडी सुरू झाली, मात्र हे पडलेले प्रवासी एकमेकांना आधार देत बाहेर आल्याने मोठी दुर्घटना टळली, मात्र या धडपडीत यातील काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. जुना फलाट काढून टाकल्याने आणि …

Read More »

नागोठण्यातून लाखो रुपयांचा गुटखा हस्तगत

नागोठणे : प्रतिनिधी पेण येथील अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने बुधवारी (दि. 29) पहाटेच्या सुमारास नागोठणे शहरातील एका इमारतीच्या गोदामावर धाड टाकून पान मसाल्याच्या गोणींसह विविध प्रकारची रसायने ताब्यात घेतली. या मालाची किंमत 10 लाख 27 हजार 580 रुपये इतकी असून इमारतीच्या मालकासह एकूण चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. …

Read More »

खालापुरात संशयास्पद कार

अपघातानंतर तिघे जण फरार खोपोली : प्रतिनिधी खालापुरात आठवडाभरापूर्वी अपघात झालेली कार संशयास्पद अवस्थेत पडून आहे. अपघातानंतर कारमधील तीन जणांनी जखमी अवस्थेत पळ काढल्याने या कारचे गूढ वाढले आहे. खालापूर शहरातून द्रुतगती मार्गाला जोडरस्ता असून आठवड्यापूर्वी पहाटेच्या वेळेस सुसाट वेगाने जाणारी कार जोगावडे वाड्यानजीक वळणावर रस्ता सोडून शेतात पलटी झाली. …

Read More »

भूसुरुंग स्फोटाने घरांच्या भिंतींना भेगा

पोलादपूरच्या कशेडी घाटामध्ये महामार्गाच्या चौपदरीकरणात धमाके पोलादपूर : प्रतिनिधी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाच्या कामात कशेडी घाटामधील चोळई आणि धामणदिवी गावांच्या सीमेवर डोंगर फोडण्यासाठी करण्यात आलेल्या भूसुरुंगाने परिसरात हादरे बसून अनेक घरांना तडे गेले. त्यामुळे ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.कशेडी घाटात मंगळवारी (दि. 28) दुपारी चार वाजल्यापासून एल अँड टी या ठेकेदार …

Read More »

कुलाबा किल्ल्यात माघी गणेशोत्सव उत्साहात

अलिबाग ़: प्रतिनिधी येथील कुलाबा किल्ल्यातील आंग्रेकालीन गणेश मंदिरात मंगळवारी (दि. 28) खास माघी गणेशोत्सव साजरा करण्यात आला. पहाटे काकड आरतीने या उत्सवाला प्रारंभ झाला. सकाळी ओहोटीची वेळ साधत भाविकांनी गणेश पंचायतनाचे दर्शन घेतले. यानिमित्ताने किल्ल्यात ठिकठिकाणी रांगोळ्या रेखाटण्यात आल्या होत्या. संपूर्ण किल्ल्यावर विद्युत रोषणाई करण्यात आली होती. माघी गणेशोत्सवानिमित्त …

Read More »

एक्सर्बिया आणि शेतकरी वाद पुन्हा ऐरणीवर

भाडेकराराचे पैसे दिले नाहीत म्हणून शेतकर्‍यांनी केला कंपनीचा रस्ता बंद कर्जत : बातमीदार तालुक्यातील वरई तर्फे वरेडी येथे गृहप्रकल्प असलेल्या एक्सर्बिया कंपनीचा रस्ता शेतकर्‍यांनी बंद केला आहे. कंपनीचा रस्ता स्थानिक शेतकर्‍यांच्या जागेतून असून, त्याबाबत शेतकरी व कंपनी दोघांमध्ये भाडेकरार झाला होता, मात्र त्या करारानुसार पैसे मिळाले नसल्याने आपण अखेरचे पाऊल …

Read More »

पोलादपूरचा बुरूड व्यवसाय लोप पावतोय!

पोलादपूर तालुक्यामध्ये गेल्या चार दशकांपासून तांब्या-पितळेच्या भांड्यांना कल्हई लावणारा व्यवसाय अस्तंगत झाल्यानंतर आता बांबूपासून विविध वस्तू बनविणारा बुरूड व्यवसायदेखील लोप होण्याच्या मार्गावर आहे. कोकणात बांबूचे पीक मुबलक आहे, मात्र बांबूच्या वस्तू बनविणारे पारंपरिक बुरूड व्यावसायिक आणि खरेदीसाठी ग्राहक नसल्याने याबाबत आता उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. दरम्यान, भातकापणीनंतर बांबूच्या …

Read More »

फरशी बसविण्याच्या कामाचा शुभारंभ पं. स. सदस्य रत्नप्रभा घरत यांच्या हस्ते

कोपर-गव्हाण (ता. पनवेल) : जिल्हा परिषद शाळेत पंचायत समिती सेस फंडातून दोन लाखांचा निधी वापरून वर्गाला फरशी बसविण्याच्या कामाचा शुभारंभ पं. स. सदस्य रत्नप्रभा घरत यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाला कोपर शाळेचे चेअरमन अनंतशेठ ठाकूर, ज्येष्ठ कार्यकर्ते वामनशेठ म्हात्रे, ग्रामपंचायत सदस्य माई भोईर, सुनीता घरत, योगिता भगत, ग्रामविकास अधिकारी …

Read More »

दिघाटीत श्रीगणेश जन्मोत्सव सोहळा

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील दिघाटी येथील श्रीगणेश मंदिरात मंगळवारी (दि. 28) माघी गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी श्रींच्या दर्शनासाठी भाविकांनी मंदिरात एकच गर्दी केली होती. नवतरुण गणेश मित्र मंडळातर्फे दरवर्षी माघी गणेशोत्सवानिमित्त दिघाटी येथील मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. यंदाही तीन दिवस काकडा, हरिपाठ, …

Read More »

‘शिवजयंती रात्री 12 वाजेपर्यंत साजरी करण्याची परवानगी द्यावी’

पनवेल : वार्ताहर येत्या 19 फेब्रुवारीला शिवजयंती मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरा करण्यात येणार आहे. यासाठी रात्री 12 वाजेपर्यंत परवानगी मिळावी, अशी मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडे करण्यात आली आहे. यासंदर्भात पदाधिकार्‍यांनी निवेदन दिले आहे. या निवेदनात नमूद केले आहे की, शिवजयंती साजरी करीत असताना शोभायात्रा …

Read More »