Breaking News

Ramprahar Team

कर्जतमध्ये उल्हास नदीवरील चार नव्या पुलांना मंजुरी

कर्जत : बातमीदार उल्हास नदीवर कर्जत तालुक्यात पाच नवीन पूल बांधावेत, अशी मागणी अनेक वर्षांपासून केली जात होती. त्यातील चार पुलांच्या बांधकामाला सार्वजनिक बांधकाम विभागाने मंजुरी दिली आहे. त्यासाठी मागील राज्य सरकारने अर्थसंकल्पात तब्बल 20 कोटींची तरतूद केली आहे. कर्जत तालुक्यातील उल्हास नदीवर नवीन पूल असावेत, अशी मागणी होत होती. …

Read More »

मुरूडमधील इंटरनेट सेवा बंद

दुय्यम निबंधक कार्यालयातील व्यवहार 10 दिवस ठप्प मुरूड : प्रतिनिधी निसर्गरम्य मुरूड शहर व परिसरात आपली हक्काची जागा असावी असे अनेकांना वाटते. त्यामुळे मुरूड तालुक्यात जागा खरेदी-विक्री व्यवहार मोठ्या प्रमाणात वाढले असून, त्याद्वारे शासनाला सर्वाधिक महसूल मिळतो, मात्र गेल्या 10 दिवसांपासून बीएसएनएलची इंटरनेट सेवा बंद असल्याने दुय्यम निबंधक कार्यालयात एकाही …

Read More »

कर्जत पालिकेकडून जलकुंभांची स्वच्छता

प्रत्येक टाकीत होता सहा इंच मातीचा थर कर्जत : बातमीदार कर्जत शहराची वाढीव नळपाणी योजना कार्यान्वित झाल्यापासून या योजनेतील जलकुंभ स्वच्छ करण्यात आले नव्हते. 20 वर्षांनंतर आता या योजनेतील जलकुंभ स्वच्छ केले जात आहेत. त्यात प्रत्येक जलकुंभामध्ये सुमारे सहा इंच मातीचा थर आढळून आला. दरम्यान, जलकुंभ स्वच्छ केल्याने कर्जत शहराला  …

Read More »

महाविकास आघाडी सरकार आणि महाआव्हाने

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे बंड फसल्यानंतर भारतीय जनता पक्षाने विश्वासदर्शक ठरावाला सामोरे न जाण्याचा निर्णय घेऊन सत्तास्थापनेच्या शर्यतीतून माघार घेतली आणि त्यानंतर महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या तीन पक्षांचे महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आले. यानिमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या रूपाने शिवसेनेची तिसरी आणि ठाकरे घराण्यातील पहिलीच …

Read More »

नव्या सरकारचे भवितव्य काँग्रेस-राष्ट्रवादीवर अवलंबून

महाराष्ट्राच्या 14व्या  विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर 2019 रोजी भारताच्या निवडणूक आयोगाने निवडणुका घेतल्या आणि त्याची मतमोजणी 24 ऑक्टोबर 2019 रोजी घेण्यात आली. 288 जागांपैकी भारतीय जनता पक्षाचे 105, शिवसेनेचे 56, राष्ट्रवादी काँग्रेसचे 54 आणि काँग्रेसचे 44 आमदार निवडून आले. लौकिकार्थाने भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनाप्रणित महायुतीला सरकार स्थापनेसाठी जनादेश मिळाला होता, …

Read More »

रामायण अध्ययन प्रेरणादायी -राज्यपाल

मुंबई : प्रतिनिधी रामायण जीवनाचा आधार आहे, रामायण एकता आहे, रामायण विश्वबंधुत्वाचा संदेश देते.  रामायण अध्ययन प्रेरणादायी असून, त्या माध्यमातून आपण एक आदर्श समाज निर्माण करू शकतो, अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त करून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आंतरराष्ट्रीय रामायण संमेलनाचे उद्घाटन केले. मुंबई विश्व विद्यालय आणि भागवत परिवार यांच्यातर्फे मुंबईतील …

Read More »

श्रीलंकेच्या ताब्यात असलेल्या भारतीय बोटींची मुक्तता करणार -राजपक्ष

नवी दिल्ली : वृत्तसंस्था श्रीलंकेचे नवे अध्यक्ष गोताबाया राजपक्ष भारत दौर्‍यावर आले आहेत. हा त्यांचा अध्यक्षपदी निवड झाल्यानंतरचा पहिला परदेश दौरा आहे. आपल्या पहिल्या परदेश दौर्‍यासाठी त्यांनी भारताची निवड केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर त्यांची  शुक्रवारी (दि. 29) द्विपक्षीय चर्चा झाली. या वेळी दहशतवादाबरोबच व्यापारासह अनेक मुद्यांवर चर्चा करण्यात …

Read More »

पॅराग्लायडिंगचा दोर निखळून एकाचा मृत्यू

कुलू : वृत्तसंस्था पॅराग्लायडिंग करताना दोरखंड निखळून हनिमूनसाठी हिमाचल प्रदेशला गेलेल्या नवविवाहित जोडप्यापैकी पतीचा खाली आदळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अरविंद (पूर्ण नाव समजू शकले नाही) असे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, अरविंदला या साहसी राइडचा आनंद लुटायया होता, तर त्याच्या नवविवाहित पत्नीला पॅराग्लायडिंग करायचे नव्हते, त्यामुळे …

Read More »

जळालेल्या अवस्थेत तरुणीचा मृतदेह

सामूहिक बलात्कारानंतर हत्येचा संशय हैदराबाद : वृत्तसंस्था येथे एका 26 वर्षीय तरुणीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. पशुवैद्यकीय डॉक्टर असणारी ही तरुणी बुधवारपासून बेपत्ता होती. गुरुवारी सकाळी तिचा मृतदेह जळलेल्या अवस्थेत शादनगर परिसरात पोलिसांना आढळून आला. या तरुणीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. …

Read More »

शिवसैनिकाला ‘10 जनपथ’वर नाक रगडावे लागेल -गिरिराज सिंह

नवी दिल्ली : वृत्तसंस्था भाजपची साथ सोडत व एनडीएमधून बाहेर पडत काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर जाऊन सरकार स्थापन केलेल्या शिवसेनेवर केंद्रीय मंत्री व भाजप नेते गिरिराज सिंह यांनी घणाघात केला आहे. आता शिवसैनिकाला प्रभू रामाचे नाव घेण्यासाठी सोनिया गांधी यांचे निवासस्थान असलेल्या 10 जनपथवर नाक रगडावे लागेल, अशा शब्दांत त्यांनी टीका केली आहे. …

Read More »