उरण : वार्ताहर स्पिडी मल्टीमोडल प्रा.लि. या मालाची हाताळणी करणार्या प्रकल्पातील स्पिडी इंडस्ट्रियल सर्व्हिस प्रा.लि. हा खाजगी ठेकेदार सोडून गेल्याने या ठेकेदाराच्या माध्यमातून प्रकल्पात सफाई कामगार म्हणून काम करणार्या 47 कामगारांवर पुढे अन्याय होऊ नये आणि ते काम करीत असणारी नोकरी अबाधित राखण्यासाठी स्पिडी व्यवस्थापनाने स्थानिक ठेकेदाराची नियुक्ती करीत सदर …
Read More »करंबेळीतील छोटा पूल कोसळला
पनवेल : बातमीदार पनवेल शहरापासून जवळपास 20 ते 22 किलोमीटर दूर अंतरावर असलेल्या करंबेळी येथील नदीवरील छोटा पूल कोसळला आहे. गेले दोन ते चार दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे हा पूल कोसळला असल्याची माहिती येथील आदिवासी बांधवांनी दिली आहे. येथील करंबेळी वाडीत 35 घरे असून लोकवस्ती जवळपास दीडशेहून अधिक आहे. …
Read More »कर्नाळा अभयारण्यात पर्यटकांना 9 ऑगस्टपर्यंत नो एण्ट्री
पनवेल ः रामप्रहर वृत्त पावसाळ्यात वर्षासहलीसाठी कर्नाळा अभयारण्याला पर्यटकांकडून नेहमीच पसंती दिली जाते. सुटीच्या दिवशी तर या ठिकाणी हजारोंच्या संख्येने पर्यटक दाखल होत असतात, मात्र रविवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे कर्नाळा अभयारण्यात भूस्खलन झाले असून विविध ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. त्यामुळे या ठिकाणी 9 ऑगस्टपर्यंत पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. रायगडसह …
Read More »रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचा स्थापना दिन उत्साहात
खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचा दहावा स्थापना दिन बुधवारी अत्यंत उत्साहात, तसेच विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. या वेळी संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या कार्यक्रमाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी विविध कलाकृती सादर करून उपस्थितांची दाद मिळविली. …
Read More »महाडच्या पुरात व्यापारी, नागरिकांचे नुकसान
महाड : प्रतिनिधी मुसळधार पावसामुळे महाडमध्ये मंगळवारी आलेल्या पुराने व्यापार्यांसह नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पुराने महाडकर नागरिकांच्या 2005मधील महापुराच्या स्मृती जाग्या झाल्या. महाडजवळून वाहणार्या सावित्री, काळ आणि गांधारी नद्यांनी मंगळवारी रौद्ररूप धारण केले. शहरात ज्या भागात पाणी शिरण्याची शक्यता नव्हती त्या भागातही पाणी शिरल्याने एकच गोंधळ उडाला. पुरामुळे …
Read More »रस्त्यावर अश्लील चाळे करणार्या महिलांवर कारवाई
पुणे : प्रतिनिधी शहरात अनेक ठिकाणी रस्त्यावर उभे राहून अश्लील चाळे करून पुरुषांना आकर्षित करीत वेश्याव्यवसाय करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढू लागले आहेत. याबाबत फरासखाना पोलिसांनी एक वेगळे पाऊल उचलले असून भडक मेकअप करून रस्त्यावर उभे राहून अश्लील चाळे करणार्या महिलांवर कलम 294 अन्वये कारवाई करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यास सुरुवात …
Read More »नेरळ ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक अडचणीत
ग्रामविकास अधिकारीच नसल्याने तयारी अपूर्ण कर्जत ़: बातमीदार नेरळ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. शुक्रवार (दि. 9)पासून नामांकन अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे, मात्र अद्यापही सहापैकी एकाही प्रभागाच्या मतदार याद्या राजकीय पक्षांकडे उपलब्ध नाहीत. दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ग्रामविकास अधिकार्याला 30 जुलै रोजी लाच स्वीकारताना पकडल्यापासून नेरळ …
Read More »देगावच्या शेकाप सरपंच भाजपमध्ये
माणगाव : प्रतिनिधी पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाने प्रभावित होऊन तसेच भाजयुमो रायगड जिल्हा उपाध्यक्ष चिन्मय मोने यांच्या प्रयत्नाने मोर्बा विभागातील देगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच शेकापच्या बबिता काटकर व त्यांच्या समर्थकांनी मंगळवारी (दि. 6) पेण येथे झालेल्या भाजपच्या जिल्हा बैठकीत भाजपत प्रवेश केला. सरपंच बबिता …
Read More »खालापुरात वृद्धाला वादातून मारहाण
खोपोली : जागेच्या जुन्या वादातून कासिम करजीकर (60, रा. हाळखुर्द) यांना मारहाण केल्याची घटना हाळ खुर्द गावात घडली असून, या प्रकरणी नऊ जणांविरोधात खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तबेल्याच्या जागेवरून कासिम यांचा जुना वाद सुरू आहे. अनेकदा भांडणेही झाली आहेत. रविवारी हा वाद पुन्हा उफाळला. कासिम हाळ फाटा …
Read More »सायगाव नदीने ओलांडली धोक्याची पातळी
मुरूड : प्रतिनिधी सतत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे सायगाव नदीने मुरूड तालुक्यात रौद्ररूप धारण केले असून, या नदीकाठच्या वावडुंगी गावाला धोका निर्माण झाला आहे. सलग पाच दिवसांपासून मुसळधार पावसाने मुरूड तालुक्यात धुमाकूळ घातला असून, त्यामुळे सायगाव नदीला पूर आला आहे. त्यामुळे वावडुंगी गावाचा संपर्क तुटला आहे. नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper