Breaking News

Ramprahar Team

श्रीरंग बारणे यांचा सत्कार

उरण : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे खासदार म्हणून दुसर्‍यांदा प्रचंड मताधिक्याने निवडून आलेले श्रीरंग बारणे यांचा सत्कार समारंभ जेएनपीटी वसाहत येथील बहुउद्देशीय सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या वेळी खासदार श्रीरंग बारणे यांचा सत्कार करताना लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार मनोहर भोईर, जेएनपीटीचे माजी विश्वस्त महेश बालदी, कामगार नेते दिनेश पाटील, …

Read More »

महानगरपालिका युवा मोर्चाच्या सरचिटणीसपदी युवा नेते विनोद घरत यांची नियुक्ती

पनवेल : महानगरपालिका युवा मोर्चाच्या सरचिटणीसपदी युवा नेते विनोद घरत यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा देताना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, प्रल्हाद केणी, दशरथ म्हात्रे, दिनेश खानावकर, ब्रिजेश पटेल, निर्दोष केणी, संतोष पाटील आदी.

Read More »

व्यापारी संकुलात सीसीटीव्ही बसवावेत- तेजस कांडपिळे

पनवेल : वार्ताहर पनवेल महानगरपालिकेच्या मालकीच्या शिवाजी पुतळ्याशेजारी असलेल्या विलासराव देशमुख व्यापारी संकुलात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी प्रभाग समिती ड चे सभापती तेजस कांडपिळे यांनी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की या संकुलात शहरातील टपाल कार्यालयही नुकतेच स्थलांतरित झालेे आहे. …

Read More »

हिंदुस्थानला ‘अच्छे दिन’ आणण्याची जबाबदारी आता महाराष्ट्राच्या या ‘अष्टप्रधान’ मंत्र्यांची!

सतराव्या लोकसभेसाठी भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेला तब्बल 75 दिवसांचा ‘राष्ट्रीय महोत्सव’ यथासांग पद्धतीने यशस्वीरीत्या पार पडला. ‘खोटं बोल पण रेटून बोल’ या पद्धतीने प्रचार करणारे जबरदस्त तोंडघशी पडले आणि देशाला महासत्ता बनविण्यासाठी कंबर कसून कामाला लागलेले भारतीय जनता पक्ष, शिवसेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम ही …

Read More »

पर्यटकांची सुरक्षा रामभरोसे!

संपूर्ण जगात पर्यटन हा विषय आवडीचा बनला आहे. शाळेच्या सुट्ट्या अथवा शनिवार, रविवार लागून आलेल्या सुट्ट्यांचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी एखाद्या आवडत्या ठिकाणी जाऊन तेथील निसर्गाचा आनंद  लुटणे हा भारतासह इतर देशात सुद्धा आवडता उपक्रम बनला आहे.परदेशात पर्यटकांना सुरक्षा पोहोचवणारे कडक कायदे अंमलबजावणीसुद्धा होत असते. त्यासाठी त्याचे काटेकोर नियम व त्याचे …

Read More »

दमदार सुरूवात

शपथविधीनंतर दुसर्‍या दिवशी खातेवाटप जाहीर करीत, देशाच्या गृहमंत्रीपदी अमित शहा यांची तसेच अर्थमंत्री पदी निर्मला सीतारमण यांची नियुक्ती करून मोदी यांनी दुसर्‍या सत्तापर्वातील आपल्या मंत्रिमंडळाला नवा चेहरामोहरा बहाल केला आहे. गुरुवारी राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात आयोजित भव्य सोहळ्यात देशोदेशींच्या नेत्यांच्या आणि मान्यवरांच्या उपस्थितीच्या साक्षीने स्वत: मोदी व त्यांच्या 57 मंत्र्यांनी पद …

Read More »

नेरळमध्ये भरतो आंब्यांचा बाजार

फणसवाडीमधील 30 आदिवासी कुटुंबे 30 वर्षांपासून व्यवसायात कर्जत : बातमीदार सध्या आंब्यांचा सिझन असून आदिवासी लोकांकडून आंब्याची पाटी घेण्यासाठी चोखंदळ ग्राहक नेरळ बाजारपेठमधील त्या आंब्यांच्या बाजारात भेट देतात. नेरळ परिसरात असलेल्या फणसवाडी येथील आदिवासी बांधव गेली 30 वर्षे आंबे विक्री करीत असतात. त्यांच्याकडे खात्रीने गोड आंबे मिळत असल्याने त्यांचा व्यवसायदेखील …

Read More »

माथेरानच्या सिमसंस टँक तलावाने गाठला तळ

एमटीडीसी हॉलिडे होमला टंचाईच्या झळा कर्जत : बातमीदार माथेरानमधील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला अतिरिक्त पाणी पुरवठा करणारा सिमसंस टॅन्क या तलावाने तळ गाठला आहे. येथील हॉलिडे होमसाठी एमटीडीसीने टँकरने पाणी घेण्याचा प्रयत्न केला, मात्र माथेरानमध्ये वाहनबंदी असल्याने एमटीडीसी हॉलिडे होमला पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.  कमी दर असल्याने माथेरानमधील एमटीडीसी …

Read More »

नरेंद्र मोदींच्या शपथविधीचे जल्लोशात स्वागत

अलिबागमध्ये कार्यकर्त्यांची मोटरसायकल रॅली; भाजप कार्यालयाजवळ थेट प्रक्षेपण अलिबाग : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदो यांनी गुरूवारी (दि. 30) पंतप्रधानपदाची दुसर्‍यांदा  शपथ घेतली. त्यावेळी  रायगडात भाजप कार्यकर्त्यांनी  जल्लोष केला. अलिबागमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी मोटारसायकल रॅली काढून आनंद व्यक्त केला. शपथविधीचे थेट प्रक्षेपण पहाता यावे, म्हणून अलिबाग येथील भाजप कार्यालयाजळ मोठा पडदा लावण्यात …

Read More »

पेणमध्ये शैक्षणिक साहित्याचे वाटप

पेण : चिल्ड्रन्स फ्युचर इंडियाच्या रायगड युनिट पेण तर्फे प्रतीपालीत विद्यार्थ्यांना संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व रायगड युनिटचे प्रकल्प प्रमुख डॉ. किशोर देशमुख यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्याचे व शैक्षणिक खेळण्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी डॉ. देशमुख यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना दफ्तर, पाठ्यपुस्तके, वह्या, रजिस्टर, चित्रकला वह्या, पेन्स, रेनकोट, छत्री आदि शैक्षणिक …

Read More »