Breaking News

Ramprahar Team

शाळेच्या हलगर्जीपणामुळे पाण्याची होतेय नासाडी

क्लिप व्हायरल होताच महापालिका उपायुक्तांचे कारवाईचे आदेश पनवेल : प्रतिनिधी पनवेल शहरात पाणीटंचाई असताना सरस्वती विद्यामंदिर या शाळेतील प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे रोज शेकडो लीटर पाण्याची नासाडी होत आहे. याबाबत बाजूच्या रहिवाशांनी तक्रार करूनही शाळा प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने त्याची क्लिप सोशल मीडियावर टाकताच महापालिका उपायुक्तांनी शाळा प्रशासनाला कारवाईचे आदेश दिले. पनवेल शहरात …

Read More »

मतमोजणी होणार कडेकोट बंदोबस्तात

निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांची माहिती अलिबाग : प्रतिनिधी रायगड लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी अलिबाग तालुक्यातील  नेहुली येथील जिल्हा क्रीडा संकुलात गुरुवारी (दि. 23) कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत होणार असून, पोलीस व इतर सुरक्षा दलाच्या जवानांसह सुमारे 1800 अधिकारी व कर्मचारी हे मतमोजणी यशस्वीरीत्या पार पाडण्याची जबाबदारी पार पाडणार आहेत, …

Read More »

माथेरानच्या सेंट झेव्हीयर शाळेकडून आयजॅकच्या स्मृतींना उजाळा

कर्जत : प्रतिनिधी माथेरान सेंट झेव्हीयर शाळेतील हुशार विद्यार्थी आयजॅक पर्सी ब्रिट्टो शालांन्त परीक्षेत 65 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाला. पण  परीक्षेचा निकाल घेण्यापुर्वी जन्मजात अनमिया बोर्न मॅरो (कर्करोग) या आजाराने तो निधन पावल्याची घटना घडली होती. या दुर्दैवी घटनेला 19 मे रोजी एक वर्ष पुर्ण झाले. या निमित्ताने आयजॅकच्या …

Read More »

शिरवली-माणकुळे रस्त्याची दुरवस्था

अधिकार्‍यांना भाजप पदाधिकार्‍यांनी विचारला जाब अलिबाग  : प्रतिनिधी शिरवली-माणकुळे रस्ता गेल्या अनेक महिन्यांपासून खड्ड्यात गेला आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या येथील भाजपच्या नेत्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी श्री. चव्हाण यांना याबाबत जाब विचारण्यासाठी घेराव घातला. त्यामुळे पावसाळ्यापुर्वी या रस्त्याची दुरूस्ती होईल, असे आश्वासन श्री.चव्हाण यांनी यावेळी दिले. शिरवली-माणकुळे रस्त्यासंदर्भात 21 फेब्रुवारी …

Read More »

मुरूड येथील नारळी-पोफळीच्या बागा

मुरूड : परिसरात गेले अनेक दिवस सोसाट्याचा वारा सुटतो आहे. या वार्‍यामुळे नारळी-पोफळीच्या बागेतील झाडे अशी वेडीवाकडी होत आहेत.

Read More »

आगरदांडा ते सावली रस्त्याची चाळण

मुरूड : प्रतिनिधी तालुक्यातील आगरदांडा ते सावली रस्त्याची चाळण झाली असून, या पाच किमी लांबीच्या रस्त्याची पावसाळ्यापुर्वी दुरुस्ती करावी, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा प्रवासी संघटनेने दिला आहे. मुरुड तालुक्यातील खड्डे बुजवण्यासाठी दोन वर्षाकरिता दीड कोटी रुपये येथील सार्वजनिक बांधकाम खात्यास प्राप्त झाले होते. मात्र चौपदरीकरण होणार म्हणून आगरदांडा ते सावली …

Read More »

तालुकानिहाय 50 गावतलावांचा गाळ काढणार

अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी तसेच भविष्यात टंचाई जाणवू नये, यासाठी प्रत्येक तालुक्यात किमान 50 गावतलावांचा गाळ काढावा. प्रत्येक तालुक्यात प्री-वॉटर कप स्पर्धा आयोजित करावी, या करीता प्रत्येक तालुक्यांतील 5 गावे निवडावी, असे निर्देश रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले  आहेत.  प्रत्येक तालुक्यात किमान 50 गावतलावांचा …

Read More »

अमेरिकेची इराणला धमकी

नवी दिल्ली ः अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला निर्वाणीचा इशारा दिला आहे. इराणने अमेरिकेच्या हितावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, तर इराणला नष्ट करू, अशी धमकीच ट्रम्प यांनी ट्विटरद्वारे दिली आहे. इराणला लढायचे असेल तर त्यांचा शेवट करू. पुन्हा अमेरिकेला धमकी देण्याची हिंमत करू नका, असे ट्रम्प यांनी खडसावले आहे. …

Read More »

पेन्शनर्सच बँकेला देणार जिवंत असल्याचा ऑनलाइन पुरावा

मुंबई ः प्रतिनिधी पेन्शनर्सला जीवन प्रमाण अर्थात जिवंत असल्याचा दाखला (लाइफ सर्टिफिकेट) बँकेत दरवर्षी नोव्हेंबर वा डिसेंबरमध्ये जमा करण्याची आता आवश्यकता नाही. केंद्र सरकारने पेन्शनर्ससाठी पोर्टल सुरू करून याबाबतची ऑनलाइन सुविधा उपलब्ध केली आहे. त्यामुळे पेन्शनर्सची बँकेच्या वेळखाऊ कटकटीपासून मुक्तता झाली असून, त्यांना तासभर रांगेत उभेही राहावे लागणार नाही. ही …

Read More »

बँक ऑफ बडोदाच्या शेकडो शाखा होणार बंद?

मुंबई ः प्रतिनिधी सार्वजनिक क्षेत्रात काम करणार्‍या दुसर्‍या क्रमांकाच्या बँक ऑफ बडोदाकडून देशातील 800 ते 900 शाखा बंद करण्याचा किंवा अन्य शाखांमध्ये सामावून घेण्याचा विचार सुरू आहे. कार्यक्षमता वाढवण्याच्या हेतूने बँक ऑफ बडोदाकडून याबाबत विचार सुरू आहे. देना आणि विजया बँक या दोन्ही बँकांचे 1 एप्रिल रोजी बँक ऑफ बडोदात …

Read More »