कर्जत : बातमीदार शहराला पाणी पुरवठा करणार्या जलकुंभाचा परिसर अस्वच्छतेच्या गराड्यात आहे. सर्वत्र धूम्रपान बंदी आहे, पण या पाणी साठवण टाकीच्या परिसरात धूम्रपान करणारे मनसोक्तपणे मजा लुटत असल्याचे सिद्ध होत आहे. दरम्यान, कर्जत नळपाणी योजनेच्या या टाकीजवळ असलेली अस्वच्छता ही रोगराई पसरविण्यास कारणीभूत ठरू शकते. कर्जत शहराला पाणी पुरवठा करणारी …
Read More »ऑईल रस्त्यावर पडल्याने अनेक जण जखमी
खालापूर : प्रतिनिधी मुंबई-पुणे महामार्गावरील बोरघाटातील टाटा कंपनी कॉलनी ते शिंग्रोबा मंदिर मार्गावर अज्ञात वाहनाच्या इंधन टाकीतून शनिवारी (दि. 11) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ऑइल गळती झाली. त्यामुळे रस्ता निसरडा होऊन 10 ते12 मोटारसायकल घसरून पडल्या. त्यात किमान 10 जणांना किरकोळ स्वरुपात जखमा झाल्या. या बाबतची माहिती मिळताच खोपोलीतील सामाजिक …
Read More »मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज
156 फेर्यांत होणार प्रक्रिया पूर्ण; आता प्रतीक्षा निकालाची अलिबाग : जिमाका रायगड लोकसभा मतदार संघाची मतमोजणी गुरुवारी (दि. 23) नेहुली अलिबाग येथील क्रीडा संकुलात होणार असून, त्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. प्रत्येकी 14 टेबल्सवर मतमोजणी करण्यात येणार असून, लवकरात लवकर निकाल जाहीर करण्याचा प्रयत्न असणार आहे, असे जिल्हा निवडणूक …
Read More »रमजान
रमजान हा इस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असून या महिन्याला इस्लाम धर्मात फार महत्व दिले गेलेले आहे. रमजान हा महिना फारच उत्साहाच्या वातावरणात साजरा केला जातो. इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद सल्ललाहु अलैहि व सल्लम यांचा सर्वात प्रिय महिना म्हणून रमजान महिना ओळखला …
Read More »शरदराव! ‘कृष्ण’ बनू शकत नाहीत, निदान ‘मोहन’ (धारिया) तरी बना!!
भगवान श्रीकृष्णानंतर चाणक्य, कौटिल्य असे राजकारणी होऊन गेले पण 70च्या दशकात खरा राजकारणी पहायला मिळाला तो शरदचंद्र गोविंदराव पवार यांच्या रुपाने. तसे बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन, डॉ. मनोहर जोशी हेही चाणक्य म्हणवले जात होते पण बाळासाहेब, महाजन आज हयात नाहीत आणि डॉ. मनोहर जोशी हे ‘आता उरलो मी मार्गदर्शनापुरता’ या …
Read More »बांधकाम मजुरांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष
मनपाच्या इमारतीचे काम करताना कामगारांचे जीव टांगणीवर नवी मुंबई : प्रतिनिधी एकीकडे नवी मुंबई परिसरात चाललेल्या खाजगी इमारतीच्या बांधकामांवर काम करताना बांधकाम मजूर सुरक्षात्मक साहित्य वापरत आहेत, परंतु या उलट मनपाच्या इमारतीचे काम करत असताना मात्र बांधकाम मजूर सुरक्षात्मक साहित्य न घेता काम करत असल्याने भरउन्हात जर एखाद्या कामगाराला भोवळ …
Read More »शहरात शुद्ध पाण्याचा काळा धंदा जोरात
पनवेल : बातमीदार शहराच्या अनेक भागांत विनापरवाना पाणी विक्रेते मिनरल वॉटरच्या नावाखाली साधे पाणी विकत आहेत. त्यामुळे पनवेलकर पैसे मोजून आजार विकत घेताहेत. नफा कमावण्यासाठी शहरात शुद्ध पाण्याचा काळा धंदा जोरात सुरू आहे. शहर व ग्रामीणच्या अनेक भागात विनापरवाना पाणी विक्रेते मिनरल वॉटरच्या नावाखाली साधे पाणी विकत आहेत. अन्न व …
Read More »तीन गाड्यांची धडक; एक ठार
पनवेल : वार्ताहर पनवेलजवळील मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आज पहाटे मुंबई लेनला 7-700 किमी अंतरावर एका उभ्या इको गाडीला पाठीमागून आलेल्या टाटा मांझा, आयशर टेम्पो व टाटा टेम्पोने धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक व्यक्ती ठार झाल्याची घटना पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. आज पहाटेच्या सुमारास मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर कोणत्याही …
Read More »चार मतदान केंद्रांच्या अध्यक्षांवर कारवाई
पनवेल : बातमीदार मतदान केंद्रांवर कामात हलगर्जी केल्याबद्दल चार केंद्राध्यक्षांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पनवेल विधानसभा मतदारसंघातील चार वेगवेगळ्या मतदान केंद्रांवर घडलेल्या प्रकारामुळे पनवेलच्या क्षेत्रीय अधिकार्यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हे दाखल केले आहेत. 29 एप्रिल रोजी मावळ लोकसभा मतदारसंघातील मतदानप्रक्रिया झाली. पनवेल विधानसभा मतदारसंघात राज्यातील सर्वात जास्त …
Read More »‘नैना’तील दुसर्या नगररचना परियोजनेस सिडकोची मंजुरी
पनवेल : रामप्रहर वृत्त सिडकोच्या प्रस्तावित नैना प्रकल्पातील दुसर्या नगररचना परियोजनेस नुकतीच सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी मंजुरी दिली. सदर नगर रचना परियोजना ही 194 हेक्टर क्षेत्राकरिता प्रस्तावित असून नैना प्रकल्पातील ही दुसरी भूखंड एकत्रिकरण व प्रारूप नगर नियोजन परियोजना आहे. नैना प्रकल्पातील पहिली नगर रचना परियोजना …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper