Breaking News

Ramprahar Reporters

खोपोलीजवळील धाकटी पंढरीत हजारो भाविक दाखल आषाढीनिमित्त संतांचा मेळा अवतरला

खोपोली : प्रतिनिधी खोपोलीजवळील ताकई-साजगांव येथील धाकटी पंढरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या ऐतिहासिक विठ्ठल मंदिरात गुरुवारी (दि. 29) साजर्‍या होणार्‍या आषाढी एकादशीनिमित्त हजारो भाविक बुधवारीच दाखल झाले आहेत. वारकरी व सर्वसामान्य भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून धाकटी पंढरी देवस्थान समितीकडून आवश्यक सर्व नियोजन करण्यात आले असल्याचे अध्यक्ष सुधीर पाटील यांनी …

Read More »

आंबेनळी घाटात दरड कोसळली

तब्बल दहा तासांनंतर वाहतूक सुरळीत  पोलादपूर : प्रतिनिधी आंबेनळी घाटात मंगळवारी (दि. 27) रात्री 11.30 वा. च्या सुमारास दरड कोसळल्याने पोलादपूर-महाबळेश्वर दरम्यान वाहतूक ठप्प झाली होती. बुधवारी (दि. 28) सकाळी दरड हटविण्याचे काम पूर्ण करून या मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली. महाबळेश्वर आणि पोलादपूर परिसरात सुरु असेलेल्या संततधार पावसामुळे, आंबेनळी …

Read More »

वनडे वर्ल्डकपचे वेळापत्रक जाहीर; 15 ऑक्टोबरला भारत-पाकिस्तान सामना

मुंबई : प्रतिनिधी यंदा भारताच्या यजमानपदाखाली खेळल्या जाणार्‍या आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक मंगळवारी (दि. 27) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) मुंबईत जाहीर करण्यात आले.  या स्पर्धेत एकूण 10 संघ सहभागी होणार आहेत. यजमान असल्याने भारताला या स्पर्धेत थेट प्रवेश मिळाला आहे. अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, बांगलादेश, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि दक्षिण …

Read More »

मुंबई-गोवासह पाच वंदे भारत ट्रेनला पंतप्रधान मोदींनी दाखवला हिरवा झेंडा

भोपाळ : वृत्तसंस्था देशवासीयांना एकाच दिवशी पाच वंदे भारत ट्रेनची भेट मिळाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (दि. 27) मडगाव (गोवा)-मुंबई, भोपाळ-इंदौर, भोपाळ-जबलपूर, रांची-पाटणा आणि धारवाड-बंगळुरू अशा पाच वंदे भारत रेल्वेगाड्यांना भोपाळ येथील राणी कमलापती रेल्वेस्थानकावरून हिरवा झेंडा दाखविला. एकाच दिवसात पाच सेमी हायस्पीड ट्रेन सुरू होण्याची ही पहिलीच …

Read More »

पनवेल महापालिका क्षेत्रातील मुस्लीम, ख्रिश्चन, बोहरी समाजाच्या दफनभूमीचा प्रश्न मार्गी

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणीला आयुक्तांचा सकारात्मक प्रतिसाद पनवेल : प्रतिनिधी पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील मुस्लीम, ख्रिश्चन आणि बोहरी समाजाच्या दफनभूमीचा अनेक वर्षे प्रलंबित असलेला प्रश्न आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पुढाकाराने मार्गी लागला आहे. याबाबत तिन्ही समाजांच्या प्रतिनिधींची बैठक सोमवारी (दि. 26) आयुक्त गणेश देशमुख यांच्या दालनात झाली. या वेळी आयुक्तांनी …

Read More »

खोपोली सुभाष नगरातील नागरी समस्या सोडविण्याची भाजपची मागणी

खोपोली, खालापूर : प्रतिनिधी खोपोली प्रभाग नंबर 1 सुभाषनगर येथील विविध नागरी समस्यांबाबत भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत शिष्टमंडळाने मुख्याधिकारी अनुप दुरे यांना निवेदन दिले आणि तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. खोपोली सुभाष नगर येथील मस्को स्टील रेल्वेगेट ते सुभाषनगरपर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण करून या रस्त्याला माजी उपनगराध्यक्ष …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या गव्हाण कोपर येथील मोरू नारायण म्हात्रे विद्यालय आणि तुकाराम नारायण घरत जुनियर कॉलेज ऑफ सायन्सच्या विद्यार्थ्यांनी दहावी आणि बारावीतील परीक्षेत दिमाखदार यश मिळविले आहे. संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी या गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. …

Read More »

पनवेलमध्ये लाभार्थी संमेलन उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्त देशाचे यशस्वी व लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर मोदी ऽ 9 कार्यक्रमांतर्गत महाजनसंपर्क अभियानाच्या अनुषंगाने पनवेल विधानसभा भाजपच्या वतीने शनिवारी (दि. 24) राज्याचे उद्योजकता व कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली लाभार्थी संमेलन उत्साहात झाले. तक्का …

Read More »

लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांच्या नावाने पनवेलमध्ये म्युझियम उभारणार

मंत्री मंगलप्रभात लोढा यांची घोषणा पनवेल : प्रतिनिधी प्रकल्पग्रस्तांचे झुंजार लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांच्या नावाने पनवेलमध्ये म्युझियम उभारण्यात येणार आहे. त्यासाठी पर्यटन विभागातर्फे पाच कोटी रुपयांची घोषणा राज्याचे कौशल्य विकास रोजगार, उद्योजकता, पर्यटन, महिला व बालविकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी शनिवारी (दि. 24) येथे केली. ते महारोजगार मेळाव्यात बोलत …

Read More »

पंतप्रधान मोदींच्या जनकल्याणकारी योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहचवा -आमदार प्रशांत ठाकूर

खोपोली : प्रतिनिधी सन 2014 ते 2023 या नऊ वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने देशात जनतेच्या कल्याणासाठी विविध योजना कार्यान्वित केल्या. या जनकल्याणकारी योजनांची माहिती देण्यासाठी कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन प्रचार आणि प्रसार करावा, असे आवाहन भाजप जिल्हाध्यक्ष प्रशांत ठाकूर यांनी शुक्रवारी (दि. 23) खोपोली येथे केले. मोदी ऽ 9 …

Read More »