Breaking News

Ramprahar Reporters

पोलीस असल्याचे सांगून तरुणीवर लैंगिक अत्याचार; पेणमधील घटना

पेण : प्रतिनिधी पोलीस असल्याचे सांगून पेणमध्ये एका नराधमाने तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, 17 वर्षीय तरुणी ही सहकार्‍यासोबत ट्री हाऊसकडून पेणकडे येत असताना रिक्षाचालक प्रशांत पाटील याने मी पोलीस आहे असे धमकावून तरुणी व …

Read More »

रोह्यात लॉजवर चालत असलेल्या वेश्या व्यवसायावर पोलिसांची धाड

मॅनेजरला अटक, तीन महिलांची सुटका रोहे, धाटाव : प्रतिनिधी रोहा पोलिसांनी वेश्या व्यवसाय सुरू असलेल्या दमखाडी येथील श्रीराम लॉजवर शुक्रवारी रात्री उशिरा धाड टाकली. या प्रकरणी लॉज चालविणार्‍या मॅनेजरला अटक, तर तीन महिलांची सुटका करण्यात आली आहे. रोह्यात सुरू असलेल्या अवैध, अनैतिक धंद्यांविरोधात गेले काही दिवस नागरिकांतून ओरड सुरू आहे. …

Read More »

भाताण येथील अमेटी युनिव्हर्सिटीच्या मनमानी कारभाराच्या चौकशीचे आदेश

आमदार महेश बालदी यांच्या मागणीला मंत्री चंद्रकांत पाटील यांचा प्रतिसाद पनवेल : रामप्रहर वृत्त स्थानिक कामगारांना पगारवाढ आणि भत्ते न देणार्‍या पनवेल तालुक्यातील भाताण येथील अमेटी युनिव्हर्सिटीच्या मनमानी कारभाराची चौकशी करण्याचे आदेश राज्याचे उच्च तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. या संदर्भात आमदार महेश बालदी यांनी मंत्रीमहोदयांना अवगत केले असता …

Read More »

पनवेलकरांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सीसीटीव्ही कॅमेरे महत्त्वाचे ठरणार -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : वार्ताहर पनवेलमधील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून गर्दीच्या व महत्त्वाच्या ठिकाणी शहर पोलीस ठाण्याच्या वतीने 44 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. हे कॅमेरे कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतील, असे मत आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केले. पोलीस ठाण्यात शनिवारी (दि. 12) भेट देऊन त्यांनी सीसीटीव्ही कंट्रोल रूमची …

Read More »

पनवेलमध्ये माझी माती माझा देश अभियान; आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शिलाफलकाचे अनावरण

पनवेल : रामप्रहर वृत्त आपल्या देशातील स्वातंत्र्यवीरांच्या स्मृती आपल्या मनात जागत राहिल्या पाहिजेत, ज्या मातीतून आपण जन्माला आलो ती माती आपल्याला वंदनीय असली पाहिजे यासाठी माझी माती माझा देश हे अभियान राबविण्यात येत आहे. आपल्या स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान महापालिका करतेय यातून देशापुढे, तरुण पिढीच्या पुढे बालपिढीसमोर मोठा संदेश दिला जातोय, असे …

Read More »

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये इन्व्हेस्टीचर समारंभ उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्त शिक्षणामुळे आपला देश प्रगती करीत असून या शिक्षणामध्ये उच्च दर्जा प्राप्त करून देण्याकरिता सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूल योगदान देईल, असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शुक्रवारी (दि. 11) इन्व्हेस्टीचर समारंभात केले. नेतृत्व, एकता, शिस्त, नैतिकता, निष्पक्षता आणि …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून विद्यार्थ्यांना यशस्वी नेतृत्वगुणाचा कानमंत्र

कामोठ्यात इन्व्हेस्टीचर समारंभ उत्साहात पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकर पब्लिक स्कूलचा इन्व्हेस्टीचर समारंभ ‘रयत’चे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (दि. 10) उत्साहात झाला. या वेळी त्यांनी विद्यार्थ्यांना शिस्तीचे महत्त्व समजावून सांगत यशस्वी नेतृत्वगुणाचा कानमंत्र दिला. या कार्यक्रमाला …

Read More »

भाजप ओबीसी मोर्चाचा पनवेलमध्ये मेळावा

प्रदेशाध्यक्ष संजय गाते यांनी केले मार्गदर्शन पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप उत्तर रायगड जिल्हा ओबीसी मेळावा गुरुवारी (दि. 10) पनवेल येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या वेळी ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष संजय गाते यांनी मार्गदर्शन केेले. या वेळी प्रदेशाध्यक्ष संजय गाते म्हणाले की, पक्षाकडून …

Read More »

रेवस बंदरात डिझेल तस्करीचा पर्दाफाश; नऊ जण ताब्यात

अलिबाग : प्रतिनिधी डिझेलची तस्करी करणार्‍यांचा रायगड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. रेवस पकटी येथे टाकलेल्या छाप्यात बोटीसह एक कोटीहून अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस महानिरीक्षक कोकण परीक्षेत्र, नवी मुंबई तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांना मांडव्याजवळ समुद्रात बोटीतून डिझेलची वाहतूक व साठा होत असल्याची माहिती मिळाली …

Read More »

सरकारी योजनांचा महिलांनी लाभ घ्यावा -आमदार प्रशांत ठाकूर

कर्जत : रामप्रहर वृत्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार तसेच राज्यातील महायुती सरकारच्या माध्यमातून राबविण्यात येणार्‍या विविध योजनांचा लाभ महिलावर्गाने घ्यावा, असे आवाहन भाजप मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांनी गुरुवारी (दि. 10) केले. ते कर्जतमधील डिकसळ येथे आयोजित सोहळ्यात बोलत होते. भाजप उमरोली जिल्हा परिषद …

Read More »