Breaking News

Ramprahar Reporters

रायगड पुन्हा दुमदुमणार!

महाड : प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराजांचा 350वा शिवराज्याभिषेक सोहळा 2 जून रोजी तिथीप्रमाणे साजरा करण्यात आलेल्या मंगळवारी (दि. 6) तारखेनुसार हा सोहळा होणार आहे. या सोहळ्याची तयारी प्रशासन आणि पोलीस यंत्रणेने केली आहे. शिवरायांचे तेरावे वंशज संभाजीराजे यांच्या उपस्थितीत हा सोहळा साजरा होणार आहे. दरवर्षी या सोहळ्यासाठी रायगडावर मोठ्या प्रमाणावर …

Read More »

आदईत भाजपचे जनसंपर्क कार्यालय

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप सर्वत्र वाढत, विस्तारत असून पनवेल तालुक्यातील आदई येथे सुरू करण्यात आलेल्या पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते रविवारी (दि. 4) करण्यात आले. नागरिकांना भेडसावणार्‍या समस्या भाजपच्या माध्यमातून सोडविण्याच्या दृष्टिकोनातून जगदीश शेळके यांनी पक्षाचे जनसंपर्क कार्यालय …

Read More »

मावळ लोकसभा मतदारसंघात भाजपचे महाजनसंपर्क अभियान

पनवेल : रामप्रहर वृत्त देशाचे कणखर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारकडून नऊ वर्षांत समाजातील सर्व घटकांसाठी कल्याणकारी कार्य करण्यात आले. देशातील 80 कोटी गरिबांना दरमहा धान्य, चार कोटी कुटुंबांना घरे, पाच कोटी नागरिकांना मोफत उपचार, ग्रामीण भागात 12 कोटी घरांमध्ये पाणी देण्याबरोबरच फेरीवाले, नवउद्योजक, विद्यार्थ्यांसह परदेशस्थ भारतीयांच्या अडचणीवेळीही …

Read More »

पारंपरिक पद्धतीने वटपौर्णिमा साजरी

कर्जत : प्रतिनिधी वटपौर्णिमा शनिवार (दि. 3) उत्साहात साजरी झाली. सुटी असल्याने चाकरमानी महिला दुपारच्या सुमारास वटवृक्षाची पूजा करण्यासाठी बाहेर पडल्या. कडक उन्हाळा असल्याने सुहासिनी अगदी संध्याकाळपर्यंत मनोभावे वटवृक्षाची पूजा करीत होत्या. यंदा विवाह सोहळे नेहमीप्रमाणे उत्साहात पार पडले. अगदी काल-परवापर्यंत विवाह होत होते. त्यामुळे वटपौर्णिमेसाठी नववधूंची संख्या मोठी होती. …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्राचे दानशूर व लाडके व्यक्तिमत्त्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक, सांस्कृतिक, वैद्यकीय, क्रीडा उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्या अनुषंगाने शुक्रवारी (दि. 2) न्हावेखाडी रामबाग येथे जल्लोष सुवर्णयुगाचा हा कार्यक्रम सादर झाला. न्हावेखाडी ग्रामस्थ मंडळ आणि श्री म्हसेश्वर मंदिर कमिटीच्या वतीने श्री …

Read More »

ओडिशातील रेल्वे अपघातातील मृतांचा आकडा 261वर

900हून अधिक जण जखमी भुवनेश्वर : वृत्तसंस्था ओडिशातील बालासोरमध्ये तीन ट्रेनच्या झालेल्या भीषण अपघातातील मृतांचा आकडा 261वर पोहचला असून 900हून जास्त लोक जखमी झाले आहेत. शोध आणिबचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे,  तर जखमींवर वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात येत आहेत. बालासोर जिल्ह्यातील बहनागा रेल्वेस्थानकाजवळ शुक्रवारी (दि. 2) शालीमार-चेन्नई कोरोमंडल एक्स्प्रेस, बंगळुरू-हावडा सुपरफास्ट …

Read More »

सर्वांत मोठ्या दिवाळी अंक स्पर्धेचे शनिवारी पारितोषिक वितरण

पनवेल : रामप्रहर वृत्त शैक्षणिक, सामाजिक, वैद्यकीय, कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणारे श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या 22व्या राज्यस्तरीय व रायगड जिल्हास्तरीय या सर्वांत मोठ्या दिवाळी अंक स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ शनिवारी (दि. 3) …

Read More »

दहावीतही कोकण सरस; राज्यात एकूण निकाल 93.83 टक्के

पुणे : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च 2023मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल शुक्रवारी (दि. 2) जाहीर करण्यात आला. राज्याचा एकूण निकाल 93.83 टक्के लागला असून बारावीप्रमाणे दहावीतही कोकणाने उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखत नऊ विभागीय मंडळांमध्ये अव्वलस्थान (98.11 टक्के) पटकाविले आहे. दहावीच्या परीक्षेसाठी …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव

पनवेल : रामप्रहर वृत्त अफाट लोकप्रियता असलेले माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा 72वा वाढदिवस शुक्रवारी (दि. 2) विविध उपक्रमांद्वारे मोठ्या उत्साहात साजरा झाला. वाढदिवसानिमित्त सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, राजकीय, वैद्यकीय अशा विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह हितचिंतक नागरिकांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे अभीष्टचिंतन करून शुभेच्छांचा वर्षाव केला. सर्वसामान्यांचा आधारस्तंभ असलेले लोकनेते …

Read More »

शिवराज्याभिषेक दिन दिमाखात साजरा

महाड : प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350व्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यानिमित्त राज्य शासनामार्फत रायगडावर शुक्रवारी (दि. 2) दिमाखदार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदेशाचे प्रक्षेपण करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे व्हिजन दिले, अशा शब्दांत पंतप्रधान मोदींनी शिवरायांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव आपल्या संदेशातून केला. या सोहळ्यास …

Read More »