Breaking News

Ramprahar Reporters

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील ऑईल टँकरला आग; जीवितहानी नाही

खोपोली, खालापूर : प्रतिनिधी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर मुंबई लेनला खालापूर टोल नाक्यापासून काही अंतरावर ऑइल टँकरच्या केबिनला आग लागली. चालकाने प्रसंगावधान राखून टँकर पुलाखालून पुढे नेत साइटपट्टीवर उभा केला. त्यामुळे पुढील अनर्थ टळला व जीवितहानी झाली नाही. ही घटना रविवारी सकाळी (दि. 18) 7 वाजण्याच्या दरम्यान घडली. घटनेची माहिती मिळताच, …

Read More »

पनवेलमध्ये रविवारी संयुक्त मोर्चा संमेलन

पनवेल : प्रतिनिधी देशाचे कार्यकुशल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाली आहेत. या काळात देशाच्या विकासाची मोठी पावले उचलतानाच जागतिक स्तरावर भारताची मान उंचावण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले. त्या अनुषंगाने योजना, विकासकामे, निर्णयांची माहिती जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी भाजपतर्फे मोदी @ 9 महाजनसंपर्क अभियानांतर्गत रविवारी (दि. 18) …

Read More »

पनवेल बसस्थानकात स्वच्छता अभियान

आमदार प्रशांत ठाकूर, माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांची उपस्थिती पनवेल : प्रतिनिधी पनवेल एसटी बसस्थानकात प्रवेश केल्यावर प्रवाशांना समाधान वाटले पाहिजे यासाठी माजी नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली प्रवासी वाहतूक सामाजिक संस्था चांगले कार्य करीत आहे. या कार्यात त्यांना माझे संपूर्ण सहकार्य राहील. पनवेल आगाराच्या बांधकामासाठी परिवहन सचिवांना …

Read More »

जागतिक योग दिनानिमित्त चलो प्रबळगड!

पनवेल : रामप्रहर वृत्त जागतिक योग दिनानिमित्त 21 जून रोजी सकाळी 6 वाजता भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या समवेत माची प्रबळगड येथे योगासने करण्याची संधी मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने 21 जून हा दिवस जागतिक योग दिन म्हणून संपूर्ण जगभर साजरा केला जातो. त्या अनुषंगाने माची …

Read More »

मावळच्या जागेसाठी काँग्रेस आग्रही

जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांना उमेदवारी देण्याची मागणी अलिबाग :  प्रतिनिधी राष्ट्रवादीकडे असलेला लोकसभेचा मावळ मतदारसंघ आम्हाला सोडावा, असा आग्रह रायगड जिल्हा काँग्रेसने धरला आहे. त्यासाठी काँग्रेसतर्फे महेंद्र घरत हे उमेदवार असणार आहेत. रायगड जिल्हा काँग्रेस कार्यकारिणीच्या बुधवारी (दि. 14) झालेल्या बैठकीत यावर मंथन करण्यात आले. पक्षाचे प्रभारी एस. के. पाटील …

Read More »

आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नाने भाताणपाडा येथे बसविणार ट्रान्सफॉर्मर

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त उरण मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांचे प्रयत्न व सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे भाताणपाडा येथे जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून विद्युत ट्रान्सफॉर्मर बसविण्यात येणार आहेत. या कामाचे भूमिपूजन भारतीय जनता पक्षाचे पनवेल तालुका अध्यक्ष व उरण मतदारसंघ निवडणूक प्रमुख अरुणशेठ भगत यांच्या हस्ते …

Read More »

पथविक्रता समितीच्या विजयी उमेदवारांनी घेतली आमदार प्रशांंत ठाकूर यांची भेट

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या नगर पथविक्रेता समितीच्या सन 2023-24साठी झालेल्या निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांनी भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची त्यांच्या पनवेल येथील निवासस्थानी बुधवारी (दि. 14) भेट घेतली. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. दिनदयाळ अंत्योदय योजना …

Read More »

शालेय वस्तूंच्या खरेदीसाठी पालकांसह मुलांची गर्दी

कर्जत : प्रतिनिधी नव्या शैक्षणिक वर्षात 15 जूनपासून शाळा सुरू होणार आहेत, तर काही शाळा सुरूदेखील झाल्या आहेत. म्हणूनच शाळेचा गणवेश, दप्तर, वह्या, पुस्तके व शालेपयोगी साहित्याच्या खरेदीसाठी पालकांसह मुलांची बाजारपेठेत गर्दी दिसून येत आहे. उन्हाळी सुटीनंतर आता मुलांना शाळेचे वेध लागले आहेत. शाळेमध्ये नवीन वर्ग, नवीन मित्र अशा स्वप्नात …

Read More »

गावठी आंब्यांना खवय्यांची पसंती

पाली : प्रतिनिधी खराब हवामान व अवकाळी पावसामुळे यंदा हापूस आंब्याच्या उत्पादनात घट झाली आहे. आवक कमी झाल्याने हापूस आंब्याचे दर हंगाम सरत चालला असला तरी कमी होण्याचे नाव घेत नाही. त्यामुळे हापूस आंबे खाणे सर्वसामान्यांसाठी अवघड होऊन बसले असून बाजारात गावठी आंबे दाखल झाल्याने खवय्ये त्यांची खरेदी करीत आहेत. …

Read More »

‘महावितरण’चा नागरिकांच्या जिवाशी खेळ!

स्पार्किंग होत असलेल्या विद्युत पोलकडे डोळेझाक; नागरिकांचा संताप पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलमधील उरण रोड येथील कोळीवाड्याकडे जाणार्‍या मुख्य मार्गावरील विद्युत पोलवर स्पार्किंग होत असून त्याकडे महावितरण कंपनीकडून चक्क दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे तेथील नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. महावितरण कंपनीचा बेफिकीर कारभार पनवेलमध्ये पहावयास मिळत आहे. आधीच …

Read More »