पनवेल : वार्ताहर महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थान आणि आगरी कोळी, कराडी समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या आई एकविरा देवीबद्दल इस्टाग्राम या सोशल मीडियावर आक्षेपार्ह अपशब्द पोस्ट केल्याप्रकरणी पनवेल पोलिसांनी शेखर उर्फ शैलेश बाळासाहेब शेंडगे याला सोलापूर येथून अटक केली आहे. दुसर्या आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत. एकविरा देवीबद्दल आक्षेपार्ह व अपशब्द पोस्ट करून …
Read More »चिंचवणमध्ये विविध विकासकामांचे भूमिपूजन
पनवेल : रामप्रहर वृत्त भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि उरणचे आमदार महेश बालदी यांच्या पाठपुराव्यातून पनवेल तालुक्यातील आणि उरण मतदारसंघातील चिंचवण गावात सुमारे एक कोटी 23 लाख रुपयांची विकासकामे मंजूर झाली आहेत. या कामांचे भूमिपूजन भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते शनिवारी (दि. 20) झाले. पनवेल …
Read More »ग्रामस्थांच्या हिताचे निर्णय होत नाही तोपर्यंत कोणतीही कार्यवाही नको -आमदार महेश बालदी
पनवेल : रामप्रहर वृत्त जोपर्यंत पुनाडे, वशेणी व सारडे येथील शेतकरी आणि ग्रामस्थांच्या हिताचे सकारात्मक निर्णय होत नाही तोपर्यंत शासनाने कोणत्याही प्रकारची कार्यवाही करू नये, अशी ठाम भूमिका आमदार महेश बालदी यांनी प्रांताधिकारी यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत मांडली. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने औद्योगिकीकरणासाठी उरणमधील पुनाडे, वशेणी व सारडे या तीन गावातील …
Read More »माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारपासून युवा वॉरियर्स फुटबॉल स्पर्धा
पनवेल : रामप्रहर वृत्त समाजसेवेबरोबरच क्रीडा क्षेत्राला महत्त्व देणारे पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त उत्तर रायगड जिल्हा भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने जिल्ह्यात विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने 20 व 21 मे रोजी खांदा कॉलनीतील सीकेटी महाविद्यालयाच्या मैदानावर युवा वॉरियर्स फुटबॉल भव्य …
Read More »रायगडात खरीप हंगामाचे नियोजन; 98 हजार हेक्टरवर होणार भात लागवड
अलिबाग : प्रकाश सोनवडेकर यंदाच्या खरीप हंगामात रायगड जिल्ह्यात 98 हजार 36 हेक्टरवर भात लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे, तर तीन हजार 37 हेक्टरवर नाचणीची लागवड केली जाणार आहे. रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्वतयारी आढावा बैठक जिल्हा नियेाजन भवन येथे झाली. त्या वेळी ही …
Read More »फणसाड अभयारण्यात वन्यजीवांची संख्या वाढली
मुरूड : संजय करडे सध्या वातावरणात मोठा बदल झाला असून उन्हाची तीव्र किरणे जमिनीवर पडू लागल्याने भूतलावरील तापमानात मोठी वाढ झाली आहे. एप्रिल-मे महिन्यात तापमान सध्या 36 अंश सेल्सियसपेक्षा जास्त झाल्याने लोकांना घामाच्या धारा लागल्या आहेत. अशा कडक उन्हात वन्यजीवांनाही मुबलक पाणी मिळावे यासाठी फणसाड अभयारण्य प्रशासनाने विविध उपाययोजना करून …
Read More »युवा वॉरियर्स कबड्डी लीगचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या युवा वॉरियर्स कबड्डी लीग स्पर्धेच्या निमित्ताने जपान विरुद्ध पनवेल असा प्रेक्षणीय सामना रसिकांना अनुभवयास मिळाला. समाजसेवेबरोबरच क्रीडा क्षेत्राला महत्त्व देणारे पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त उत्तर रायगड जिल्हा भारतीय जनता …
Read More »मच्छीमार बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध -केंद्रीय मंत्री परषोत्तम रुपाला
उरण : रामप्रहर वृत्त आपल्या देशाला लांबच लांब समुद्रकिनारे लाभले आहेत. या सामुद्रिक संपत्तीवर उपजीविका करणार्या आमच्या मच्छीमार बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र व राज्य शासन कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसायमंत्री परषोत्तम रूपाला यांनी येथे दिली. सागर परिक्रमा कार्यक्रम 2023 अंतर्गत पाचव्या …
Read More »माणगावच्या उपनगराध्यक्षपदी भाजपचे राजेश मेहता
माणगाव : प्रतिनिधी येथील नगरपंचायत उपनगराध्यक्षपदाच्या बुधवारी (दि. 17) झालेल्या निवडणुकीत माणगाव विकास आघाडीतील भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक राजेश गोकुळदास मेहता विजयी झाले आहेत. त्यांनी प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका हर्षदा सुमित काळे यांचा पराभव केला. उपनगराध्यक्षपदी विराजमान झाल्याबद्दल मेहता त्यांच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. माणगाव नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक …
Read More »नैना परिक्षेत्रातील शेतकर्यांच्या हितासाठी सकारात्मक भूमिका -पालकमंत्री उदय सामंत
पनवेल : रामप्रहर वृत्त नैना परिक्षेत्रातील शेतकर्यांच्या समस्यांबाबत योग्य ती कार्यवाही करण्यासाठी सकारात्मक भूमिका घेणार असल्याचे आश्वासन रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आमदार प्रशांत ठाकूर व शिष्टमंडळाला दिले. नैना क्षेत्रातील शेतकर्यांवर कोणत्याही परिस्थितीत अन्याय होऊ नये यासाठी आमदार प्रशांत ठाकूर शासन दरबारी पाठपुरावा करीत आहे. त्या अनुषंगाने व त्यांच्या मागणीनुसार …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper