अलिबागेतील आदिवासी विद्यार्थिनीवर कौतुकाचा वर्षाव अलिबाग : प्रतिनिधी अलिबाग तालुक्यातील श्रीगाण आदिवासी वाडीवर राहणारी आदिवासी विद्यार्थिनी प्रगती नाईक हिचे गुरुवारी (दि. 13) दुपारी लग्न झाले, परंतु लग्नापूर्वी ती टीवायबीकॉमचा शेवटचा पेपर लिहून आली. हळदीच्या अंगाने पेपर लिहून परीक्षेचे कर्तव्य बजावणार्या प्रगतीचे सर्वत्र कौतुक होत आहे. अलिबाग येथील जेएसएम महाविद्यालयात शिकणारी …
Read More »आपटा येथे शनिवारी मोफत आरोग्य तपासणी व औषधे वाटप शिबिर
आमदार महेश बालदी यांचा उपक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष उरण विधानसभा तसेच एमजीएम हॉस्पिटल कामोठे-कळंबोली व आपटा प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि. 15) सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत आपटा येथे मोफत आरोग्य तपासणी व औषधे वाटप शिबिर आयोजित करण्यात आले आहे. आपटा प्राथमिक …
Read More »पनवेल महापालिका क्षेत्रात पाण्यासाठी उपाययोजना
पाईपलाईन कामाचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या माध्यमातून एमजेपीकडून नवीन पाण्याचे कनेक्शन घेण्यात आले आहे. त्या अंतर्गत नवीन 14 इंचाची पाईपलाईन मार्केट यार्ड येथे असलेल्या पाण्याच्या टाकीला जोडण्यात येणार आहे. या पाईपलाईन टाकण्याच्या कामाचे भूमिपूजन बुधवारी (दि. 13) महापालिकेचे माजी सभागृह …
Read More »सर्वांनी मिळून महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा यशस्वी करू-पालकमंत्री उदय सामंत
खारघर येथे घेतला पूर्वतयारीचा आढावा खारघर : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2022च्या वितरण सोहळ्याची जोरात तयारी सुरू असून सर्व शासकीय यंत्रणांनी उत्तम समन्वयाने काम करावे, सर्वांनी मिळून हा सोहळा यशस्वी करूया, असे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज खारघर येथे दिल्या. 2022 या वर्षासाठीच्या …
Read More »नितळस येथे गावदेवी यात्रेनिमित्त कुस्त्यांचे सामने
अपुर्व प्रशांत ठाकूर यांचाही सहभाग पनवेल : रामप्रहर वृत्त नितळस छत्रपती संभाजी महाराज राष्ट्रीय कुस्ती संकुलाच्या माध्यमातून कुस्त्यांचे जंगी सामने मंगळवारी (दि. 11) गावदेवी यात्रेनिमित्त भरविण्यात आले होते. या स्पर्धेला भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी भेट देत खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेत आमदार प्रशांत ठाकूर यांचे पुत्र अपुर्व …
Read More »पनवेल महापालिकेचे आर्थिक नुकसान करणार्यांवर गुन्हा दाखल करा
आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका क्षेत्रातील नागरिकांना मालमत्ता करामध्ये दिलासा देण्यासाठी कायद्यात काही बदल करावा लागला तरी तो करून पनवेलकरांना मदत करावी, अशी मागणी भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्य सरकारकडे केली आहे. दुसरीकडे मात्र माजी नगरसेविका लीना गरड आणि खारघर फेडरेशनचे …
Read More »कोर्लईचे माजी सरपंच प्रशांत मिसाळ यांना 13 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी
अलिबाग : प्रतिनिधी मुरूड तालुक्यातील कोर्लई येथील माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कथित 19 बंगल्यांच्या प्रकरणात फसवणूक केल्याबाबत कोर्लई ग्रामपंचायतीचे माजी सरपंच प्रशांत मिसाळ यांना सोमवारी (दि. 10) रात्री अटक करण्यात आली. प्रशांत मिसाळ यांना मंगळवारी (दि. 11) मुरूड येथील प्रथम वर्ग दिवाणी न्यायालयात हजर केले असता 13 एप्रिलपर्यंत पोलीस …
Read More »स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जन्मदिवस स्वातंत्र्यवीर गौरव दिन म्हणून साजरा होणार
मुंबई : प्रतिनिधी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा 28 मे हा जन्मदिवस राज्य शासनामार्फत स्वातंत्र्यवीर गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी (दि. 11) येथे केली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांच्या प्रचार-प्रसारासाठी विविध कार्यक्रम, उपक्रम स्वातंत्र्यवीर गौरव दिनी आयोजित करण्यात येणार आहेत. देशाच्या स्वातंत्र्यासाठी …
Read More »ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना येत्या रविवारी महाराष्ट्र भूषण पुरस्कार होणार प्रदान
पनवेल : रामप्रहर वृत्त ज्येष्ठ निरूपणकार आणि रायगडचे सुपुत्र डॉ. दत्तात्रेय नारायण उर्फ आप्पासाहेब धर्माधिकारी यांना राज्य शासनातर्फे जाहीर झालेला प्रतिष्ठेचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार येत्या रविवारी (दि. 16) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते खारघर येथील कॉर्पोरेट पार्क मैदानात होणार्या सोहळ्यात प्रदान केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे …
Read More »राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेत ’दीपावली’, तर जिल्हास्तरीय स्पर्धेत ’साहित्य आभा’ मानकरी
आमदार प्रशांत ठाकूर यांनी निकाल केला जाहीर पनवेल : रामप्रहर वृत्त शैक्षणिक, सामाजिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणारे श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या 22व्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेत ’दीपावली’ अंकाने तर रायगड जिल्हास्तरीय स्पर्धेत …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper