Breaking News

Ramprahar Reporters

यंदा मान्सून उशिराने; ‘स्कायमेट’चा अंदाज

मुंबई : प्रतिनिधी यंदा मान्सून अंदमानमध्ये उशिराने दाखल होण्याचा अंदाज हवामानाची माहिती देणार्‍या स्कायमेट वेदर या खासगी संस्थेने वर्तविला आहे तसेच केरळात नैऋत्य मान्सून साधारणपणे 1 जून रोजी दाखल होत असतो, मात्र नैऋत्य मान्सूनसंदर्भात आताच सांगणे कठीण असल्याचे मत शास्त्रज्ञांनी व्यक्त केले आहे. मान्सून अंदमानमध्ये साधारणत: 22 मे रोजी दाखल …

Read More »

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवारपासून कामोठ्यात कबड्डी लीगचा थरार

पनवेल : रामप्रहर वृत्त समाजसेवेबरोबरच क्रीडा क्षेत्राला महत्त्व देणारे पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त उत्तर रायगड जिल्हा भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने विविध क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. यामध्ये 17 व 18 मे रोजी कामोठ्यात विद्युत प्रकाशझोतातील कबड्डी लीगचा थरार पहायला मिळणार आहे. कामोठे सेक्टर …

Read More »

रायगडात पोलीस भरतीसाठी उमेदवारांकडे खंडणी मागणार्‍या लिपिकास अटक

अलिबाग : प्रतिनिधी रायगड पोलीस दलात भरती झालेल्या महिला उमेदवारांकडून खंडणी मागणार्‍या जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयातील लिपिकास अटक करण्यात आली आहे. प्रदीप ढोबाळ असे या लाचखोर लिपिकाचे नावे असून सेवेत रुजू होण्यासाठी आवश्यक असलेले वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यासाठी त्याने महिला उमेदवारांकडे खंडणी मागितली होती. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी मंगळवारी (दि. 16) …

Read More »

हॉलीबॉल चषक स्पर्धेच्या पोस्टरचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते अनावरण

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त खारघर-तळोजा भाजप युवा मोर्चाच्या वतीने युवा वॉरियर्स हॉलीबॉल चषक स्पर्धेचे आयोजन खारघर येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या पोस्टरचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते अनावरण झाले. या वेळी खारघरचा राजा चॅरिटेबल ट्रस्ट अध्यक्ष विजय म्हात्रे, …

Read More »

पनवेल महापालिका क्षेत्रातील मान्सूनपूर्व कामांची माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून पाहणी

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका क्षेत्रात मान्सूनपूर्व कामांना वेग आला असून विविध कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. या कामांची महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी सोमवारी (दि. 15) अधिकार्‍यांसह पाहणी करून आवश्यक त्या सूचना केल्या. मान्सूनपूर्व कामांमधील अनेक मार्गी लागली असून काही कामे सुरू आहेत. या कामांची माजी सभागृह …

Read More »

खालापुरात गोवंश हत्येविरोधात मोर्चा

आमदार प्रशांत ठाकूर यांचा प्रशासनाला इशारा खोपोली : प्रतिनिधी गोमाता आमची माता आहे आणि गोवंश हत्या प्रकरणे या भागात वारंवार घडत असतील तर याचा आम्हाला विचार करावा लागेल. याबाबत कायदा असतानाही अशा घटना घडतात हा प्रशासनाचा कमकुवतपणा आहे. गोवंश हत्या हा हिंदू धर्माच्या अस्मितेचा प्रश्न झाला आहे. त्यामुळे यापुढे असा …

Read More »

श्रीवर्धनमध्ये रस्ते कामाचा शुभारंभ; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

आमदार प्रशांत ठाकूर, माजी आमदार धैर्यशील पाटील यांची प्रमुख उपस्थिती श्रीवर्धन : प्रतिनिधी श्रीवर्धन तालुक्यातील हुनरवेली, शिरवणे, काळींजे आणि कोंडिवली येथे जिल्हा नियोजन विकास निधीतून रस्ते कामांचा शुभारंभ भारतीय जनता पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व माजी आमदार धैर्यशील पाटील यांच्या हस्ते शनिवारी (दि. 13) झाला. या दरम्यान हुनरवेली …

Read More »

जेएनपीएत तीन कोटींच्या ई-सिगारेट जप्त

उरण : प्रतिनिधी तस्करी करण्यात येत असलेल्या तीन कोटींच्या ई-सिगारेट जेएनपीए बंदरातून जप्त करण्यात आल्या आहेत. सीमा शुल्क विभागाने ही कारवाई केली. सीमा शुल्क विभागाला गुप्त खबर्‍याकडून विदेशातून तस्करीच्या मार्गाने पाठविण्यात आलेल्या ई-सिगारेटबाबत माहिती मिळाली होती. त्यानुसार संशयित कंटेनरची तपासणी केली असता त्यात 45 हजार 886 ई-सिगारेटचा साठा आढळला. पाण्याची …

Read More »

महाड तालुक्यात गोळीबार; दोघे जखमी, आरोपी ताब्यात

महाड : प्रतिनिधी महाड तालुक्यातील मोहोत गावात शुक्रवारी रात्री क्षुल्लक कारणावरून एकाने गोळीबार केल्याची घटना घडली. यात दोन जण जखमी झाले आहेत. दरम्यान, पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून बंदूकही हस्तगत केली आहे. महाड तालुक्यातील मोहोत येथे मंदिर जीर्णोद्धार कार्यक्रम सुरू असताना मागील भांडणाचा राग मनात धरून हा गोळीबार झाल्याचे …

Read More »

उ. रायगड जिल्हा भारतीय जनता युवा मोर्चातर्फे क्रीडा स्पर्धा

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य पनवेल : रामप्रहर वृत्त समाजसेवेबरोबरच क्रीडा क्षेत्राला महत्त्व देणारे पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त उत्तर रायगड जिल्हा भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने जिल्ह्यात विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. युवा नेते परेश ठाकूर यांना क्रीडा क्षेत्राची आवड …

Read More »