Breaking News

Ramprahar Reporters

पनवेलमध्ये रंगला पतंग महोत्सव

मान्यवरांची उपस्थिती; नागरिकांनी लुटला आनंद पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करून मकरसंक्रांत सण रविवारी (दि. 15) मोठ्या उत्साहात साजरा झाला. यानिमित्त पनवेल शहरातील मिडलक्लास हौसिंग सोसायटीच्या मैदानात पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या महोत्सवाचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते झाले. तसेच या महोत्सवाला भाजपचे …

Read More »

नवी मुंबई विमानतळाला ‘दिबां’चे नाव हा भूमिपुत्रांचा विजय -केंद्रीय मंत्री कपिल पाटील

उरण : प्रतिनिधी नवी मुंबई विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यास राज्य सरकारने मंजुरी देणे हा भूमिपुत्रांचा विजय असून ही मागणी मी 2015मध्ये संसदेत केली होती, असे प्रतिपादन केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी सोमवारी (दि. 16) व्यक्त केले. ते जासई येथे आयोजित शेतकरी आंदोलनाच्या स्मृतिदिन कार्यक्रमात …

Read More »

महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या विजयाचा मार्ग सुकर

वेणूनाथ कडू यांची माघार; मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त कोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतून वेणूनाथ कडू यांनी सोमवारी (दि. 16) आपला उमेदवारी अर्ज मागे घेत भाजप, शिवसेना, शिक्षक परिषद व मित्रपक्षांचे उमेदवार ज्ञानेश्वर बारकू म्हात्रे यांना जाहीर पाठिंबा दिला. त्यामुळे ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या विजयाचा …

Read More »

महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या विजयाचा निर्धार

रोह्यात आढावा बैठक; प्रमुख नेते, पदाधिकार्‍यांची उपस्थिती धाटाव : प्रतिनिधी कोकण विभाग शिक्षक मतदारसंघातील भाजप, बाळासाहेबांची शिवसेना, आरपीआय महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या प्रचारार्थ रायगड जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकार्‍यांची संयुक्त आढावा बैठक शनिवारी (दि. 14) रोह्यात आयोजित करण्यात आली होती. या वेळी भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, माजी मंत्री व विद्यमान …

Read More »

खांदा कॉलनीतील अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता

केंद्रीय मंत्री भागवत कराड, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची भेट पनवेल : रामप्रहर वृत्त श्री संत वामनभाऊ व भगवानबाबा पुण्यतिथीनिमित्त खांदा कॉलनीत अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला होता. या सप्ताहाला शुक्रवारी (दि. 13) केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी भेट दिली. सप्ताहाची सांगता शनिवारी (दि. 14) ह.भ.प. सुदाम महाराज …

Read More »

आपटा येथे जुगार खेळणार्‍यांना 10 जणांना अटक

रसायनी : प्रतिनिधी पनवेल तालुक्यातील आपटा गावात स्मशानभूमीजवळील मोकळ्या शेडमध्ये जुगार खेळणार्‍या 10 जणांना रसायनी पोलिसांनी धाड टाकून ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आपटा गावात बेकायदेशीररित्या पैसे लावून जुगार खेळला जात होता. रसायनी पोलिसांच्या पथकाने तेथे धाड टाकली. या वेळी घटनास्थळावरून रोख रक्कम, रिक्षा, मोटरसायकल इत्यादी …

Read More »

चौक विभागातून भाजपात इनकमिंग सुरूच

कार्यकर्त्यांचा आमदार महेश बालदी यांच्या उपस्थितीत प्रवेश खोपोली, उरण : प्रतिनिधी, वार्ताहर खालापूर तालुक्यात महाविकास आघाडीला खिंडार पडले असून चौक जिल्हा परिषद विभागातील टेंभरी ग्रामपंचायतीमधील शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये उरण मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या उपस्थितीत बुधवारी (दि. 11) प्रवेश केला आहे. दोन दिवसांपूर्वीच शिवसेना …

Read More »

‘सिनेट’ सदस्यपदी मयुरेश नेतकर यांची नेमणूक

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केली नियुक्ती लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी दिल्या शुभेच्छा पनवेल : रामप्रहर वृत्त मुंबई विद्यापीठ अधिसभा (सिनेट) सदस्यपदी पनवेल येथील मयुरेश नेतकर यांची राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नियुक्ती केली आहे. त्याबद्दल मयुरेश नेतकर यांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, ज्येष्ठ नेते …

Read More »

विद्यार्थी देशाचे भविष्य -लोकनेते रामशेठ ठाकूर

माणगाव येथील शिबिराचे उद्घाटन माणगाव : रामप्रहर वृत्त आजचे विद्यार्थी हे देशाचे उद्याचे भविष्य आहे आणि ते घडविण्यासाठी तुम्ही तयार व्हा, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मंगळवारी (दि. 10) येथे केले. ते राष्ट्रीय सेवा योजना आणि नेतृत्व गुण व व्यक्तिमत्व विकास शिबिरात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत होते. पुणे …

Read More »

‘अंगारक’निमित्त महड, पाली येथील मंदिरात भाविकांची गर्दी

खालापूर, खोपोली, पाली : प्रतिनिधी नव्या वर्षातील एकमेव अंगारक संकष्ट चतुर्थी मंगळवारी (दि. 9) होती. यानिमित्त गणेशभक्तांनी अष्टविनायकांपैकी क्षेत्र असलेल्या रायगड जिल्ह्यातील महड आणि पाली येथील मंदिरात जाऊन गणरायाचे दर्शन घेतले. याशिवाय ज्यांना तिथे जाणे शक्य झाले नाही ते आसपासच्या मंदिरात जाऊन ते बाप्पाचरणी नतमस्तक झाले. महड येथील वरदविनायकाचे दर्शन …

Read More »