Breaking News

Ramprahar Reporters

पनवेलमध्ये काँग्रेसला झटका; माजी नगरसेवक सिद्धार्थ बांठिया भाजपमध्ये

पनवेल : वार्ताहर पनवेल शहरात काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. युवक काँग्रेसचे माजी प्रदेश जनरल सेक्रेटरी आणि माजी नगरसेवक सिद्धार्थ बांठिया यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते पक्षाची शाल स्वीकारत बांठिया यांनी सोमवारी (दि. 9) पक्षप्रवेश केला. मुंबईतील दादर येथील भाजपच्या प्रदेश कार्यालयात सार्वजनिक …

Read More »

छत्रपती संभाजी महाराज कुस्ती संकुलातील आठ जणांची ‘महाराष्ट्र केसरी’साठी निवड

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलचे क्रीडाप्रेमी आमदार प्रशांत ठाकूर संस्थापक अध्यक्ष असलेल्या नितळस येथील छत्रपती संभाजी महाराज राष्ट्रीय कुस्ती संकुलातील आठ कुस्तीपटूंची पुणे येथे 10 जानेवारीपासून सुरू होणार्‍या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी नयन रवींद्र पाटील (48 किलो वजनी गट), सुशांत नामदेव पाटील (60 किलो), …

Read More »

२२ जानेवारीला खारघर मॅरेथॉन; व्यसनमुक्तीसाठी नागरिक धावणार!

सेलिब्रेटी आणि अनेक मान्यवरांची लाभणार उपस्थिती  पनवेल(प्रतिनिधी) रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्टस कॉम्प्लेक्स आणि खारघर रेसिडन्स वेलफेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक २२ जानेवारी २०२३ रोजी ‘एक धाव व्यसनमुक्तीसाठी’ हे सामाजिक हिताचे घोषवाक्य घेऊन ‘खारघर मॅरेथॉन २०२३’ हि स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. खारघर मधील सेक्टर १९ येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल येथून या स्पर्धेला सकाळी ०६ वाजता मान्यवरांच्या हस्ते …

Read More »

पनवेलची आयएनएस विक्रांत युद्धनौका प्रतिकृती आता मंत्रालयात

मान्यवरांच्या हस्ते होणार प्रदर्शनाचे उद्घाटन; आमदार प्रशांत ठाकूर यांची माहिती पनवेल : रामप्रहर वृत्त नौदल बाहुबली, देशाची सामरिक ताकद वाढविणारी आणि शत्रूच्या ऊरात धडकी भरविणारी युद्धनौका आयएनएस विक्रांतची माहिती सर्वांना व्हावी यासाठी या जहाजाची प्रतिकृती महाराष्ट्राचे केंद्रबिंदू असलेल्या मंत्रालयात प्रदर्शनाच्या रूपाने पहायला मिळणार आहे. 12 जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ जयंती …

Read More »

आमदार योगेश कदम यांच्या कारला कशेडी घाटात अपघात; घातपाताचा संशय

पोलादपूर : प्रतिनिधी माजी मंत्री रामदास कदम यांचे पुत्र आणि दापोली मतदारसंघाचे शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांच्या वाहनाला शुक्रवारी (दि. 6) रात्री मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर कशेडी घाटात अपघात झाला. सुदैवाने या अपघातात आमदार कदम बचावले आहेत. दरम्यान, हा अपघात घातपाताची शक्यता असू शकते, असा संशय आमदार कदम यांनी व्यक्त …

Read More »

रायगडातील 717 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

अलिबाग : प्रतिनिधी राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक पाचवी व माध्यमिक आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यामध्ये दोन्ही वर्गातील 717 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले आहेत. जिल्ह्यात पाचवीच्या वर्गातील सात हजार 150 विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यापैकी सहा हजार 522 विद्यार्थी परीक्षेला सामोरे गेले. त्यापैकी एक …

Read More »

कर्जतच्या खुशीने लावले ‘वेड’; चित्रपटातील भूमिकेचे सर्वत्र कौतुक

कर्जत : विजय मांडे बहुचर्चित ‘वेड’ हा चित्रपट प्रदर्शित झाला असून होऊन अवघ्या सहा दिवसांत या चित्रपटाने सर्व उच्चांक मोडले आहेत. या चित्रपटात रितेश-जेनेलिया यांच्या जोडीसोबत चिमुरडीदेखील गाजत असून ती कर्जतची खुशी हजारे ही बालकलाकार आहे. चित्रपटातील रितेश व जेनेलिया यांच्या अभिनयाचे मोठे कौतुक होत आहे. या सर्वांमध्ये चित्रपटाच्या नायक- …

Read More »

आमदार महेश बालदी यांच्याकडून शरीरसौष्ठवपटू रमेश पाटील यांना शुभेच्छा

उरण : वार्ताहर उरण तालुक्यातील दिघोडे गावचे शरीरसौष्ठव रमेश पाटील यांची मिस्टर इंडिया या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून एकमेव अशी निवड झाली आहे. याबद्दल आमदार महेश बालदी यांनी पाटील यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. या वेळी भाजप उरण तालुका भाजप अध्यक्ष रवी भोईर, प्रशिक्षक सिद्धेश शिंदे, दिघोडे गाव अध्यक्ष राजेश …

Read More »

बोरघाटात विद्यार्थ्यांच्या बसला अपघात; झाडामुळे अनर्थ टळला

सर्व जण सुखरूप खोपोली, खालापूर : प्रतिनिधी मुंबई चेंबूर येथील खासगी क्लासच्या बसला लोणावळा-खोपोली असा नो एण्ट्रीमधून केलेला प्रवास जीवघेणा ठरला असतानाच शुक्रवारी (दि. 6) त्याच घटनेची पुनरावृत्ती होता होता वाचली. मानव व यंत्र कुचकामी ठरले असताना एका झाडामुळे 64 विद्यार्थी व सहा शिक्षकांचे प्राण बालंबाल वाचले. डोंबिवलीतील विद्यार्थ्यांच्या सहलीच्या …

Read More »

बेरोजगारांना सुवर्णसंधी! पनवेलमध्ये 13 जानेवारीला रोजगार मेळावा

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागीय आयुक्तालय मुंबई विभाग आणि लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (दि. 13) सकाळी 10 ते 4 वा. आगरी समाज मंडळाच्या पनवेल येथील महात्मा फुले सभागृहात बेरोजगार उमेदवारांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन …

Read More »