Breaking News

Ramprahar Reporters

माथेरान प्रश्न मार्गी लावू; वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आश्वासन

कर्जत : प्रतिनिधी माथेरान हे महाराष्ट्राचे नंदनवन असून तेथील वन विभागांतर्गत असलेले विविध प्रश्न सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. माथेरानमधील सर्व समस्या लवकरच मार्गी लावल्या जातील, असे आश्वासन राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भाजपच्या शिष्टमंडळाला दिले. माथेरान शहरातील वनविभाग अंतर्गत विविध प्रश्न सोडविण्यासाठी भाजपच्या शिष्टमंडळाने राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट …

Read More »

बोरघाटातील शिंग्रोबा मंदिर परिसर उजळला

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने वीज जोडणी पनवेल : वार्ताहर मुंबई-पुणे महामार्गावर असलेल्या बोरघाटातील शिंग्रोबा मंदिरास राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने शनिवारी (दि. 21) वीज जोडणी करण्यात आली. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सामाजिक लढ्यास न्याय दिल्याने शिंग्रोबा मंदिर परिसर उजळताना दिसत आहे. त्याबद्दल भाजप विमुक्त भटके आघाडीसह समस्त …

Read More »

मॅरेथॉन प्री इव्हेंट सायकलिंगला उत्स्फूर्त प्रतिसाद; हजारोंनी घेतला सहभाग

पनवेल : रामशेठ ठाकूर इंटरनॅशल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि खारघर रेसिडेन्सी वेल्फेअर असोसिएशन यांच्या वतीने आणि सहआयोजक अदिम जाती मीना विकास असोसिएशनच्या सहकार्याने रविवारी (दि. 22) होणार्‍या खारघर मॅरेथॉन 2023च्या अनुषंगाने शनिवारी (दि. 21) खारघर येथे मॅरेथॉन प्री इव्हेंट म्हणून 15 किलोमीटर सायकलिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये हजारो नागरिकांनी …

Read More »

रविवारी खारघर मॅरेथॉन; व्यसनमुक्तीसाठी आबालवृद्ध धावणार!

पनवेल : रामप्रहर वृत्त रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि खारघर रेसिडन्स वेल्फेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने व स्पर्धेचे सहआयोजक अदिम जाती मीना विकास असोसिएशनच्या सहकार्याने रविवारी (दि. 22) ’एक धाव व्यसनमुक्तीसाठी’ हे सामाजिक हिताचे घोषवाक्य घेऊन खारघर मॅरेथॉन 2023 होणार आहे. खारघर सेक्टर 19मधील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल येथून …

Read More »

उरण महोत्सव नागरिकांसाठी पर्वणी -लोकनेते रामशेठ ठाकूर

उरण : प्रतिनिधी एक विकसित शहर अशी ओळख निर्माण करू पाहणार्‍या उरणमध्ये आगरी, कोळी आणि कराडी समाजांबरोबरच विविध जाती-धर्मांचे लोक वास्तव करीत आहेत. अशा सर्व लोकांच्या पारंपरिक संस्कृतीचे जतन करण्याचे काम महेश बालदी मित्र मंडळाच्या माध्यमातून उरण महोत्सव करणार आहे. त्यामुळे हा महोत्सव येथील नागरिकांसाठी पर्वणी असल्याचे प्रतिपादन माजी खासदार …

Read More »

कर्नाळा पक्षी अभयारण्य निसर्ग पर्यटनाचा परिपूर्ण विकास आराखडा सादर करावा

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची सूचना पनवेल : रामप्रहर वृत्त कर्नाळा पक्षी अभयारण्य निसर्गाचे देणे आहे. या ठिकाणी विविध प्रकारचे पक्षी असल्याने पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. येथे येणार्‍या पर्यटकांना महत्त्वाच्या सोयीसुविधा देण्यासाठी वन विभागाने निसर्ग पर्यटनाचा परिपूर्ण विकास आराखडा सादर करावा, अशा सूचना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या. सह्याद्री अतिथीगृह …

Read More »

मराठी शाळांची अस्तित्व टिकवणे काळाची गरज -ज्ञानेश्वर म्हात्रे

खोपोली : प्रतिनिधी देशात आंतरराष्ट्रीय इंग्रजी शाळा दिवसेंदिवस वाढत आहेत. हे अतिक्रमण थांबविण्यासाठी सर्वांची एकजुट आवश्यक आहे. आज मराठी शाळांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. या शाळा टिकविणे काळाची गरज आहे व यासाठी विधान परिषदेत तुमचा हक्काचा प्रतिनिधी पाठविण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन कोकण शिक्षक विभाग मतदारसंघाचे भाजप, शिवसेना, रिपाइं …

Read More »

रातोरात तब्ब्ल 13 गाड्यांचे पार्ट चोरीस

तळोजा परिसरात खळबळ; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल पनवेल : वार्ताहर तळोजा परिसरात गाड्यांचे प्रमाण वाढले आहेत. तळोजा परिसरात एक अज्ञात चोराने एकाच रात्री तब्ब्ल 13 व्हॅगनार गाड्यांमधील इंजिन पार्ट चोरून नेले आहेत. या पार्टची प्रत्येकी किंमत 5000 प्रमाणे 70000 रुपयांचे पार्ट चोरले लंपास केले आहेत. इरफान मैफूज शेख (वय 43 …

Read More »

22 जानेवारीला व्यसनमुक्तीसाठी खारघर धावणार!

आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिली पत्रकार परिषदेत माहिती पनवेल : रामप्रहर वृत्त रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्टस कॉम्प्लेक्स आणि खारघर रेसिडन्स वेलफेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने व स्पर्धेचे सहआयोजक अदिम जाती मीना विकास असोसिएशन यांच्या सहकार्याने रविवारी (दि. 22) ’एक धाव व्यसनमुक्तीसाठी’ हे सामाजिक हिताचे घोषवाक्य घेऊन ’खारघर मॅरेथॉन 2023’ आयोजित …

Read More »

मुंबई-गोवा महामार्गावर दुहेरी अपघात

ट्रकची इकोला जोरदार धडक, बालकासह 10 जणांचा मृत्यू खासगी बस उलटून दोघे ठार माणगाव : प्रतिनिधी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर माणगावजवळ रेपोली गावच्या हद्दीत गुरुवारी (दि.19) पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास ट्रकची इको कारला समोरासमोर धडक लागून झालेल्या भीषण अपघातात कारमधील नऊ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर एका चार वर्षाच्या बालकाला माणगाव …

Read More »