मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर प्राथमिक अधिसूचना जाहीर मुंबई : प्रतिनिधी ठाणे तालुक्यातील 14 गावांचा नवी मुंबई महापालिकेमध्ये समावेश करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार नगरविकास विभागामार्फत प्राथमिक अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. हद्दवाढीच्या या कार्यवाहीमुळे ठाणे तालुक्यातील ग्रामपंचायतीची निवडणूक डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्याची विनंती नगरविकास विभागाने राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे. राज्य …
Read More »महाराष्ट्र महिला कबड्डी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी पेणचे संजय मोकल
पेण : प्रतिनिधी गुजरातमधील अहमदाबाद येथे होणार्या 36व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी महाराष्ट्र महिला कबड्डी संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून रायगड जिल्ह्यातील पेणचे राष्ट्रीय खेळाडू संजय मोकल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 26 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबरदरम्यान 36व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन अहमदाबाद येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेत महाराष्ट्र महिला संघ …
Read More »टी-20 वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची घोषणा
नवी दिल्ली : वृत्तसंस्था आंतररराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) आयोजित टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सोमवारी (दि. 11) टीम इंडियाची घोषणा केली. रोहित शर्मा कर्णधार, तर केएल राहुल उपकर्णधार असणार आहे. जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल दुखापतीतून सावरल्यामुळे संघात परतले आहेत. विशेष म्हणजे ऋषभ पंत आणि दिनेश कार्तिक …
Read More »रायगडात मंगळवारपासून गौरा गणेशोत्सव
अलिबाग : प्रतिनिधी अनंतचतुर्दशीला गणेशोत्सवाची सांगता झाली असली तरी रायगड जिल्ह्यात मंगळवारी (दि. 13) साखरचौथीच्या म्हणजेच गौरा गणपतींचे आगमन होत आहे. साधारणतः दीड दिवसाच्या मुक्कामानंतर या बाप्पाला निरोप दिला जातो. रायगड जिल्ह्याच्या उत्तर भागात गौरा गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. अनंत चतुर्दशीनंतर येणार्या पहिल्या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी या गणेशमूर्तीची …
Read More »खारघरमध्ये स्कूल बसला आग
विद्यार्थ्यांना वेळीच बाहेर काढल्याने अनर्थ टळला पनवेल : वार्ताहर खारघर येथे विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जाणार्या एका स्कूल बसला भीषण आग लागल्याची घटना सोमवारी (दि. 11) दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. बसचालक आणि मदतनीस यांनी विद्यार्थ्यांना वेळीच बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला. सीबीडी येथील पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्कूल बस विद्यार्थ्यांना …
Read More »प्रशासकांचा कालावधी वाढविण्याचा निर्णय
मुंबई : प्रतिनिधी राज्याच्या ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रशासकांचा कालावधी वाढविण्यासंदर्भात महाराष्ट्र जिल्हा परिषद अधिनियमात सुधारणा करून अध्यादेश काढण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. राज्यातील 25 जिल्हा परिषदा आणि 283 पंचायत समित्यांच्या प्रशासक नियुक्तीचा कार्यकाळ सप्टेंबर 2022मध्ये संपत आहे, मात्र राज्य निवडणूक आयोगाची प्रक्रिया आणि सर्वोच्च न्यायालयाचे आदेश लक्षात …
Read More »नैसर्गिक आपत्तीबाधित गावांचे होणार पुनर्वसन
सर्वसमावेशक धोरण निश्चितीस मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता मुंबई : प्रतिनिधी राज्यात अतिवृष्टीत निर्माण होणार्या पुरासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित गावांचे पुनर्वसन करण्याबाबतच्या सर्वसमावेशक धोरणास सोमवारी (दि. 11) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. त्यानुसार बाधित गाव, वाडी, तांड्यांचे नवीन ठिकाणी स्थलांतर करून त्यांना नागरी सुविधा देण्यात येणार आहेत. अतिवृष्टीमुळे आलेला पूर, भूस्खलन …
Read More »‘लम्पी’वर स्वदेशी लस तयार – पंतप्रधान नरेंद्र मोदी
नवी दिल्ली : वृत्तसंस्था आत्मनिर्भर भारतासाठी केंद्र सरकारकडून अनेक पावले उचलली जात आहेत. मध्यतंरी कोरोनावर मात करणार्या भारतीय लसीच्या मोठ्या यशानंतर आता जनावरांच्या लम्पी आजारावर भारतीय शास्त्रज्ञांनी स्वदेशी लस विकसित केली आहे, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. ते ग्रेटर नोएडा येथील वर्ल्ड डेयरी समिटच्या उद्घाटन समारंभात बोलत …
Read More »माथेरानची माहिती आता एका स्कॅनवर!
नगर परिषदेकडून अॅप विकसित कर संकलनासह पर्यटनाला चालना कर्जत : बातमीदार माथेरानला आलेल्या पर्यटकांची फसवणूक होते असे सातत्याने बोलले जाते. त्यात पर्यटक प्रवासी कर भरण्यासाठी आल्यानंतर त्यांचा पुढील प्रवास दलाल आणि गाईड यांच्यात अडकून बसतो. तसे होऊ नये आणि पर्यटकांना आपल्या हक्काच्या ठिकाणी सहजपणे जाता यावे यासाठी माहिती देणारे अॅप …
Read More »पनवेलकरांना घडणार लालबागचा राजाचे दर्शन
महात्मा ज्योतिबा फुले हातगाडी संघटनेचा गौरा गणेशोत्सव पनवेल : वार्ताहर कोरोनाच्या दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पनवेलकरांना लालबागचा राजाचे दर्शन होणार आहे. पनवेलमधील महात्मा ज्योतिबा फुले हातगाडी संघटनेच्या श्री गौरा गणेशोत्सवानिमित्त लालबागचा राजाची प्रतिकृती पनवेलमध्ये येत्या मंगळवारी (दि. 13) विराजमान केली जाणार आहे. संघटनेचे गौरा गणेशोत्सवाचे यंदा 30वे वर्ष आहे. पनवेलमधील महात्मा …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper