नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशाचे सर्वोच्चपद अर्थात राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी सोमवारी (दि. 18) मतदान प्रक्रिया झाली. या निवडणुकीसाठी देशभरातील आमदार-खासदारांनी मतदान केल्याने भरघोस मतदान झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीची मतमोजणी 21 जुलै रोजी होणार आहे. त्यानंतर नवनिर्वाचित राष्ट्रपती 25 जुलैला शपथ घेतील. या निवडणुकीसाठी भाजपप्रणित राष्ट्रीय …
Read More »शिवसेना खासदारांमध्येही उभी फूट
12 जणांची शिंदे गटाच्या बैठकीला उपस्थिती मुंबई : प्रतिनिधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेना पक्षाला गळती लागली आहे. शिवसेनेचे अनेक आमदार, आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्तेदेखील शिंदे गटात सहभागी झाले आहेत. यानंतर आता शिवसेनेच्या खासदारांमध्ये फूट पडली असून 12 खासदार सोमवारी (दि. 18) मुख्यमंत्री शिंदे यांनी बोलाविलेल्या बैठकीला उपस्थित होते. …
Read More »राज्यस्तरीय किकबॉक्सिंग स्पर्धेत नवी मुंबईतील खेळाडूंचे सुयश
नवी मुंबई : बातमीदार अहमदनगर येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय सिनिअर अॅण्ड मास्टर किकबॉक्सिंग स्पर्धेत नवी मुंबईतील 30 खेळाडूंनी सहभाग घेत सहा सुवर्ण, दोन रौप्य आणि सहा कांस्यपदके जिंकली. सुमारे 30 जिल्ह्यांतील 900पेक्षा जास्त खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले होते. स्पर्धा महाराष्ट्र किकबॉक्सिंग अससोसिएशचे अध्यक्ष निलेश शेलार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या …
Read More »आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेत सुभाष पुजारींनी जिंकले सुवर्णपदक
पनवेल : वार्ताहर 54व्या आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेत पळस्पे महामार्ग पोलीस दलाचे सहाय्यक निरीक्षक सुभाष पुजारी यांनी सुवर्णपदक पटकाविले. त्यामुळे पोलीस दलासह पनवेलकरांनी आनंद व्यक्त केला आहे. मालदीव येथे आशियाई शरीरसौष्ठव अजिंक्यपद स्पर्धा सुरू असून या स्पर्धेत 80 किलो वजनी गटात सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी यांनी सुवर्णपदक जिंकले. त्यांच्या या …
Read More »18 वर्षांवरील नागरिकांसाठी बूस्टर डोस मोफत मिळणार
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशात कोरोना संसर्गाच्या नव्याने वाढ होत असताना सरकारने 18 ते 59 वयोगटातील लोकांना कोविड लसींचे मोफत डोस देण्याचा निर्णय घेतला आहे. 15 जुलैपासून यासाठी विशेष मोहीम सुरू होणार असून या 75 दिवसांच्या मोहिमेंतर्गत सरकारी लसीकरण केंद्रांवर कोविड लसीचे बूस्टर डोस मोफत दिले जाणार आहेत. गेल्या आठवड्यात …
Read More »एनडीएच्या राष्ट्रपतिपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू उदया मुंबईत
मुंबई : प्रतिनिधी भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) राष्ट्रपतिपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू गुरुवारी (दि. 14) मुंबईत येत आहेत. भाजप नेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट व अपक्ष आमदार आणि खासदारांना मूर्मू यांच्यासह होणार्या बैठक व चर्चेसाठी आमंत्रित करण्यात आले आहे. द्रौपदी मुर्मू या गुरुवारी दुपारी 2च्या सुमारास मुंबईत येत असून केंद्रीय …
Read More »सीकेटी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा गुणगौरव
पनवेल : रामप्रहर वृत्त मानवी जीवनात शिक्षणाचे महत्त्व अधिक आहे. शिक्षण कधीही वाया जात नाही आणि आयुष्यात शिकण्यासारखे प्रचंड आहे, असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाचे वित्त आणि लेखाधिकारी सीए डॉ. प्रदीप कामथेकर यांनी बुधवारी (दि. 13) खांदा कॉलनी येथे केले. ते विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात प्रमुख मान्यवर म्हणून मार्गदर्शन करताना बोलत होते. …
Read More »अतिवृष्टीग्रस्त नागरिक, शेतकर्यांना मदत करणार -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : प्रतिनिधी राज्यात अतिवृष्टी होऊन अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली आहे, तर शेतकर्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. सध्याचे नैसर्गिक संकट लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करीत आहेत. या वेळी संकटात सापडलेल्या नागरिकांना तसेच शेतकर्यांना मदत करण्याची ग्वाही त्यांनी दिली. ते पत्रकारांशी बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …
Read More »राज्यात कोसळधार !
जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे पाणीच पाणी; जनजीवन विस्कळीत मुंबई : प्रतिनिधी मागील काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस सुरू असून हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार बुधवारी (दि. 13)देखील पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचून जनजीवन विस्कळीत झाले. राज्यात पावसाच्या जोरधारा कायम असून अनेक नदी-नाल्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. त्यामुळे बर्याच ठिकाणी पाणी …
Read More »जिल्हास्तरीय किकबॉक्सिंग स्पर्धेत पेण तालुका चॅम्पियन
पेण : प्रतिनिधी पनवेलजवळील खांदा कॉलनी येथील रायगड किकबॉक्सिंग असोसिएशनच्या वतीने जिल्हास्तरीय किकबॉक्सिंग निवड चाचणी अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत पेणमधील युनायटेड शोतोकान कराटे असोसिएशन या संस्थेत रवींद्र म्हात्रे, विनायक पाटील तसेच प्रथमेश मोकल यांच्याकडे किकबॉक्सिंगचे प्रशिक्षण घेत असलेल्या खेळाडूंनी 45 सुवर्ण, 43 रौप्य आणि 18 कांस्यपदके …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper