लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून अभिनंदन पनवेल : रामप्रहर वृत्त मुंबई विद्यापीठातर्फे शैक्षणिक वर्ष 2021-2022मध्ये आयोजित करण्यात आलेल्या विद्यापीठस्तरीय 16व्या आविष्कार संशोधन महोत्सवात जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनीतील चांगू काना ठाकूर महाविद्यालयास (स्वायत्त) शिक्षक दिनाचे औचित्य साधून सोमवारी (दि. 5) ओव्हरऑल रनर चॅम्पियनशीप ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. मुंबई विद्यापीठाचे …
Read More »उरणमध्ये मच्छीमारांसमोर जेलीफिशचे संकट
उरण : वार्ताहर उरण परिसरात मासेमारी करण्यासाठी गेलेल्या मच्छीमारांच्या जाळ्यात मासळीऐवजी मोठ्या प्रमाणावर विषारी जेलीफिश येत आहेत. उरणच्या समुद्र किनार्यावरही जेलीफिश दिसू लागले आहेत. या समस्येमुळे मासेमारी धोक्यात आली असून मच्छीमारांवर उपासमारीचे संकट आले आहे. दोन महिन्यांच्या पावसाळी मासेमारी बंदीच्या कालावधीनंतर 1 ऑगस्टपासून पुन्हा मासेमारीला सुरुवात झाली आहे, मात्र खराब …
Read More »चौक तुपगावमध्ये गणपतीला निरोप देताना हिंदू-मुस्लिम ऐक्याचे जतन
मोहोपाडा : प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील तुपगाव येथील मुस्लिम बांधवांनी गणपती बाप्पावर विसर्जनादरम्यान पुष्पवृष्टी केली. त्याचप्रमाणे गणेशभक्तांना प्रसाद वाटून ऐक्याची परंपरा जपली. तुपगाव येथील यासीन भालदार, शरीफ भालदार व अन्य मुस्लिम बांधवांनी रायगड पोलीस दल अंतर्गत खालापूर पोलीस ठाण्याच्या माध्यमातून आणि तुपगाव ग्रुप ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या सहकार्याने गावातील हनुमान मंदिराजवळ शामियाना …
Read More »मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर माडप बोगद्याजवळ पुन्हा अपघात; दोघे ठार, 10 जण जखमी
खोपोली, खालापूर : प्रतिनिधी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अपघातांची मालिका सुरू असून मंगळवारी (दि. 6) पहाटे माडप बोगद्याजवळ उभ्या असलेल्या ट्रकला भरधाव इको कारने धडक दिली. या अपघातात कारमधील दोन प्रवासी जागीच ठार, तर 10 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एक्स्प्रेस वेवर …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते खारघरमध्ये वृक्षारोपण
पनवेल : रामप्रहर वृत्त आगामी काळात ऑक्सिजनचा तुटवडा भासू नये या उद्देशाने विहंगम योग सेवा सत्संग आणि राष्ट्रीय एकता मंचने देशभर एक लाख झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या अंतर्गत खारघर सेक्टर 35 येथे भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत व हस्ते वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमास …
Read More »‘मुंबईत भाजपसोबत निवडणूक लढविणार’
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन मुंबई : प्रतिनिधी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप एकत्र निवडणूक लढवणार असून युतीचा महापौर होईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौर्यानंतर मुख्यमंत्री शिंदे एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी शिवसेना पक्षप्रमुख …
Read More »केणी कुटुंबीयांनी साकारला लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळाचा देखावा
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यात होत असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला भूमिपुत्रांचे दैवत लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा ठराव शिंदे-फडणवीस सरकारकडून नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात विधानसभा आणि विधान परिषदेत मंजूर करण्यात आला. त्यानंतर केंद्र सरकारकडून अंतिम मंजुरी मिळाल्यावर विमानतळ नामकरणावर शिक्कामोर्तब होणार आहे. त्यामुळे भूमिपुत्र, प्रकल्पग्रस्तांमध्ये …
Read More »कर्जतमध्ये नऊ आदिवासी वाड्यांचा एक बाप्पा !!
कर्जत : बातमीदार हल्ली गावात, समाजात सर्रास गटतट पडून भांडण-तंटे होत असतात. आदिवासी वाड्यांमध्ये तर हे प्रमाण अधिक असते, पण कर्जत तालुक्यातील एक, दोन नाही तर तब्बल नऊ आदिवासी वाड्या एकत्र येत सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करीत आहेत. शेलू ग्रामपंचायत हद्दीतील बेडीसगाव अंतर्गत तब्बल 16 आदिवासी वाड्या आहेत. दररोज कष्ट करून …
Read More »रायगडात भातपिकावर किडरोगाचा प्रादुर्भाव
अलिबाग : प्रतिनिधी वातावरणात होत असलेल्या बदलाचा भातपिकावर परिणाम होत आहे. रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी भातपिकावर पिवळा खोडकिडा, सुरळीतील अळी व निळे भुंगिरे यांचा प्रादुर्भाव दिसण्यास सुरुवात झाली आहे. जून महिन्यात सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस पडला, मात्र जुलै महिन्यात पावासाने कसर भरून काढली. ऑगस्ट महिन्यातही चांगल्या पावसाची नोंद झाली. …
Read More »रविवारी पुन्हा रंगणार भारत-पाक लढत
दुबई : वृत्तसंस्था आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान या कट्टर पारंपरिक प्रतिस्पर्धी संघांमध्ये पुन्हा एकदा रविवारी (दि. 3) सुपर-4चा महामुकाबला होणार आहे. याआधी उभय संघात झालेल्या साखळी सामन्यात भारताने पाकिस्तानवर पाच गडी राखून दणदणीत विजय मिळवला होता. संयुक्त अरब अमिराती (यूएई)मध्ये सुरू असलेल्या आशिया चषक स्पर्धेतील लढती रोमहर्षक …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper