Breaking News

Ramprahar Reporters

पनवेलमध्ये आज भाजपची प्रदेश कार्यकारिणी बैठक

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह 800 प्रतिनिधींची लाभणार उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाची प्रदेश कार्यकारिणी बैठक शनिवारी (दि. 23) पनवेलमधील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात होणार असून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार्‍या या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभणार असल्याची माहिती भाजपचे …

Read More »

राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांची संपत्ती जप्त

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक, अनिल देशमुख यांच्या पाठोपाठ प्रफुल्ल पटेल यांच्यावर ईडीने मोठी कारवाई केली असून त्यांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. इक्बाल मिर्ची प्रकरणी इडीकडून ही करावाई झाल्याचे सांगितले जात आहे. वरळी येथील प्लॉट खेरदी प्रकरणी मनी लॉण्ड्रिग झाल्याचा आरोप हा प्रफुल्ल पटेल यांच्यावर ठेवण्यात आला …

Read More »

द्रौपदी मुर्मू देशाच्या नव्या राष्ट्रपती

देशातील पहिल्या आदिवासी महिला सर्वोच्च पदावर विराजमान नवी दिल्ली : वृत्तसंस्था राष्ट्रपतीपदासाठी 18 जुलै रोजी मतदान झाल्यानंतर गुरुवारी (दि. 21) संसद भवनात मतमोजणी करण्यात आली. या निवडणुकीत एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू या भरघोस मतांनी विजयी झाल्या असून त्या देशाच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती ठरल्या आहेत. द्रौपदी मुर्मू यांच्या विजयानंतर …

Read More »

तळीयेचा बहादूर जवान भारतीय सैन्यात ठरला अव्वल

आई-वडिलांना खरी श्रद्धांजली असल्याची भावना केली व्यक्त पाली : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील तळीये दुर्घटनेत आपले संपूर्ण कुटुंब गमावलेल्या बहादूर जवान अमोल कोंडाळकर भारतीय सैन्यात  अव्वल ठरलाय. भारतीय सैन्यात 150 जणांच्या ग्रुपमध्ये कॉम्बॅट इंजिनिअरींग इन्स्ट्रक्टर या कोर्समध्ये प्रथम येत पदक पटकावले. आई-वडिलांना हीच खरी श्रद्धांजली असल्याची भावना त्यांनी व्यक्त …

Read More »

पनवेलमध्ये भाजप प्रदेश कार्यकारिणीची शनिवारी बैठक

मुंबई : प्रतिनिधी भारतीय जनता पार्टीची प्रदेश कार्यकारिणी बैठक शनिवारी (दि. 23) पनवेल येथे होणार आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार्‍या या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रमुख मार्गदर्शन असेल, अशी माहिती भाजप प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी दिली. केशव उपाध्ये म्हणाले की, या बैठकीस भाजप प्रदेश प्रभारी …

Read More »

यंदा दहीहंडी, गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरे होणार

गणेशात्सवासाठी ज्यादा एसटी बस सोडण्याचेही निर्देश मुंबई : प्रतिनिधी गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे राज्यात दहीहंडी व गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला, मात्र आता कोरोनाचा धोका कमी झाला असल्याने या वर्षी मोठ्या धूमधडाक्यात साजरा करता येणार आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस प्रशासन, सार्वजनिक …

Read More »

डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानकडून रायगड जिल्हा पोलीस कल्याण निधीस सात लाखांचा धनादेश सुपूर्द

अलिबाग : प्रतिनिधी प्रबोधनाबरोबरच समाजसेवा करणार्‍या डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने रायगड जिल्हा पोलीस कल्याण निधीकरिता ज्येष्ठ निरूपणकार पद्मश्री डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या हस्ते सात लाखांचा धनादेश  बुधवारी (दि. 20) रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. रेवदंडा येथे झालेल्या या कार्यक्रमास अपर पोलीस अधीक्षक अतुल …

Read More »

चिरले-खालापूर रस्त्याचा बृहद आराखडा तीन महिन्यांत सादर होणार

मुंबई : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील चिरले-खालापूरदरम्यान रस्ता बांधण्यात येणार आहे. या प्रकल्पाचा बृहद आराखडा तयार करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली असून आराखड्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. पुढील तीन महिन्यांत आराखडा पूर्ण होण्याची शक्यता आहे. मुंबई आणि नवी मुंबईतील अंतर कमी करण्यासाठी सागरी सेतूची उभारणी करण्यात येत आहे. या सागरी सेतूमुळे …

Read More »

नवी मुंबईतील गवते दामत्याने समर्थकांसह घेतली उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट

नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबईच्या दिघा भागातील मातब्बर माजी नगरसेवक नवीन गवते, माजी नगरसेविका अपर्णा गवते आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी (दि. 19) माजी मंत्री व विद्यमान आमदार गणेश नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षात स्वगृही प्रवेश केला. त्यांनी बुधवारी माजी खासदार डॉ. संजीव नाईक, माजी आमदार संदीप नाईक …

Read More »

पनवेल शिवसेनेतही पडली फूट ; अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पाठिंबा

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल शहरातही शिवसेनेत उभी फूट पडली असून सुमारे चारशे पदाधिकारी व शिवसैनिक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाले आहेत. या सर्वांनी बुधवारी (दि. 20) मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन आपला पाठिंबा दर्शविला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर घेतलेल्या भूमिकेला राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे. …

Read More »