Breaking News

Ramprahar Reporters

नवी मुंबईतील पावणे एमआयडीसीत अग्नितांडव

आठ कंपन्यांना आग; चार कामगार जखमी नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबईतील पावणे एमआयडीसीमध्ये शुक्रवारी (दि. 6) आठ कंपन्यांना भीषण आग लागून चार कामगार जखमी झाले आहेत. त्यांना वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुरुवातीला एका कंपनीला आग लागून ती पसरली. या आगीत इतर सात कंपन्यांचेही नुकसान झाले …

Read More »

पनवेलच्या दुर्पता सौद, सिद्धेश पावशे यांनी बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदक जिंकले

पनवेल : रामप्रहर वृत्त पुणे येथे नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये पनवेलची बॉक्सर दुर्पता सौद आणि सिद्धेश पावशे यांनी सुवर्णपदक जिंकले. या सब ज्युनियर मुले व मुलींच्या स्पर्धेत रायगडचे दोन सुवर्णपदके पटकावली. पनवेलच्या दुर्पता सौद ऊर्फ छोटीने मुलींच्या 38 किलो वजनी गटात सातारा, जळगाव येथील बॉक्सर्सचा पराभव केला आणि …

Read More »

थोर समाजसुधारक स्व. जनार्दन भगत यांची शनिवारी पुण्यतिथी

सीकेटी महाविद्यालयात अभिवादन कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त कष्टकर्‍यांचे द्रष्टे नेते थोर समाजसुधारक स्व. जनार्दन आत्माराम भगत यांची शनिवारी (दि. 7) 34वी पुण्यतिथी आहे. त्यांना अभिवादन करण्यासाठी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या वतीने सकाळी 11.30 वाजता खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. …

Read More »

खारघरमधील पाणीप्रश्नी भाजपचे आंदोलन

पाणीपुरवठा 31 मेपर्यंत सुरळीत करावा अन्यथा सिडको भवनमध्ये घुसणार : आमदार प्रशांत ठाकूर पनवेल : प्रतिनिधी खारघर येथील अनियमित व अपुर्‍या पाणीपुरवठ्यात 31 मेपर्यंत सुधारणा न झाल्यास कोणतीही नोटीस न देता सिडको भवनमध्ये घुसू आणि पाणी मिळत नाही तोपर्यंत तेथेच मुक्काम करू, असा इशारा भारतीय जनता पक्षाचे उत्तर रायगड अध्यक्ष …

Read More »

खारघरमध्ये पाणी प्रश्नावरून संताप; शुक्रवारी आज करणार निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त सिडकोने वसविलेल्या खारघरमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. येथील नागरिकांना अनियोजित पाणीपुरवठ्याचा त्रास होत असल्याच्या अनेक तक्रारी सिडकोकडे करण्यात आल्या आहेत. यासंदर्भात भाजप खारघर- तळोजा मंडलच्या वतीने वेळोवेळी पाठपुरावा केला, मात्र याकडे सिडको दुर्लक्ष करीत असल्याने आता भाजप पदाधिकारी उद्या शुक्रवारी (दि. 6) सिडकोचा …

Read More »

मुंबई-गोवा महामार्गावर केमिकल टँकर पलटी

पाली : प्रतिनिधी मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गावर नागोठणेतील कोलेटी गावाच्या नजीक बुधवारी रात्रीच्या सुमारास भरधाव वेगात येणारा केमिकलचा टँकर पलटी झाला. अचानक टँकर पलटी झाल्याने दोन प्रवासी वाहनांना टँकरची धडक बसून या वाहनांनी पेट घेतला. सुदैवाने प्रसंगावधान राखून देन्ही वाहनांतील प्रवासी कारबाहेर पडल्याने जीवितहानी टळली, मात्र या अपघातामुळे पाच तास …

Read More »

पनवेल महानगरपालिकेचा करवाढविरहीत अर्थसंकल्प मंजूर

नामावलीवरून विरोधकांचा चर्चा न करता सभात्याग पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिकेचा आर्थिक वर्ष सन 2021-22चा सुधारित व सन 2022-23चा कोणतीही करवाढ नसलेला मूळ अर्थसंकल्प नगरसेवक हरेश केणी व अमर पाटील यांच्या सूचनांसह गुरुवारी मंजूर करण्यात आला, मात्र अर्थसंकल्पातील वेगवेगळ्या बाबींवर चर्चा करण्याऐवजी केवळ त्या त्या पक्षाच्या राज्यस्तरीय नेत्यांचे आपल्या भाषणात …

Read More »

स्वतःच्याच भूमीत प्रकल्पग्रस्त भाडेपट्ट्याने राहणार नाहीत

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा सिडकोला इशारा पनवेल : रामप्रहर वृत्त 95 गावातील शेतकर्‍यांची जमीन घेऊन अनेक प्रकल्प सिडकोने उभारले, मात्र आता गरजेपोटी बांधलेल्या घरांच्या बाबतीत सिडको व राज्य शासनाने घेतलेला निर्णय अन्यायकारक आहे. त्यामुळे या भूमीची मालकी हक्क असलेला प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र सिडकोने लादलेल्या निर्णयाच्या विरोधात असून येथील प्रकल्पग्रस्त स्वतःच्या मालकीच्या …

Read More »

मुख्यमंत्री कार्यालयाचा दुरुपयोग -किरीट सोमय्या

पनवेल : हरेश साठे कोर्लई येथील 19 बंगल्यांचा मालमत्ता घोटाळा लपविण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाचा दुरुपयोग झाला आहे, असा गंभीर आरोप करीत या प्रकरणी जनहित याचिका दाखल करणार असल्याची माहिती भाजपचे ज्येष्ठ नेते माजी खासदार किरीट सोमेय्या यांनी बुधवारी (दि. 4) येथे दिली. हनुमान चालिसा, त्याविषयी असलेली भावना व त्यातून झालेले प्रतिकात्मक …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते विरंगुळा केंद्र, पथदिव्यांचे लोकार्पण

मोनिका महानवर यांच्या नगरसेवक निधीतून कळंबोलीत सुविधा कळंबोली : रामप्रहर वृत्त भारतीय माथाडी कामगार संघटनेचे रायगड उपाध्यक्ष तथा भाजप युवा मोर्चाचे रामदास महानवर यांचा वाढदिवस विविध सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवून साजरा झाला. यानिमित्त नगरसेविका मोनिका महानवर यांच्या नगरसेवक निधीतून उभारण्यात आलेल्या विरंगुळा केंद्र आणि पथदिव्यांचे लोकार्पण भाजपचे उत्तर रायगड …

Read More »