Breaking News

Ramprahar Reporters

आमदार प्रवीण दरेकर, भरत गोगावलेंकडून चोळई येथील दरडग्रस्त भागाची पाहणी

पोलादपूर : प्रतिनिधी पोलादपूर तालुक्यातील दरडग्रस्त चोळई येथे आमदार प्रवीण दरेकर आणि भरत गोगावले यांनी मंगळवारी (दि. 5) भेट देऊन पाहणी केली. या भागात तातडीने मदत देण्याचे निर्देश आमदारद्वयीने दिले तसेच येथील स्थानिक नागरिकांच्या व्यथा ऐकून घेऊन त्यांना सर्वार्थ मदत करण्याचे आश्वासन दिले. या वेळी आमदार प्रवीण दरेकर यांनी जिल्हाधिकारी …

Read More »

रायगडात जोरदार पाऊस; सखल भागांत पाणी साचले

अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्याला मंगळवारी (दि. 5) सलग दुसर्‍या दिवशी मुसळधार पावसाने झोडपून काढले. सतत पडणार्‍या पावसामुळे सखल भागांत पाणी साचले होते. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. दरम्यान, हवामान खात्याने रायगड जिल्ह्यात 8 जुलैपर्यंत रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यात सोमवारपासून मुसळधार पाऊस पडत आहे. मंगळवारीदेखील दिवसभर अधूनमधून …

Read More »

किकबॉक्सिंग स्पर्धेत रसायनीतील खेळाडूंचे सुयश

मोहोपाडा : प्रतिनिधी रायगड किकबॉक्सिंग असोसिएशनच्या वतीने आयोजित रायगड जिल्हास्तरीय किकबॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत रसायनीतील खेळाडूंनी शानदार कामगिरी करून पाच सुवर्ण, दोन रौप्य व सहा कांस्य अशी एकूण 13 पदक जिंकली. स्पर्धा खांदा कॉलनी येथे झाली. स्पर्धेचे आयोजन जिल्हा किकबॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष आणि वाको किकबॉक्सिंग असोसिएशनचे महाराष्ट्र उपाध्यक्ष डॉ. मंदार पनवेलकर …

Read More »

टीम इंडियाचे स्वप्न भंगले!

निर्णायक सामन्यात इंग्लंड विजयी; मालिका बरोबरीत बर्मिंगहॅम : वृत्तसंस्था भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना यजमान संघाने सात गडी राखून जिंकला. पाचव्या दिवशी इंग्लंडला विजयासाठी 119 धावांची, तर भारताला सात बळींची आवश्यकता होती. भारताने दुसर्‍या डावात सर्वबाद 245 धावा केल्या होत्या. त्यामुळे भारताकडे 377 धावांची आघाडी आली …

Read More »

तारा, कर्नाळा अभयारण्य, चिंचवण, पळस्पे सर्व्हिस रोडवर पथदिवे लावा

आमदार महेश बालदी यांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तारा, कर्नाळा अभयारण्य, चिंचवण व पळस्पे सर्व्हिस रोडवर पथदिवे लावण्यात यावेत, अशी मागणी आमदार महेश बालदी यांनी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण प्रकल्प अंमलबजावणी युनिट पनवेल प्रकल्प संचालक श्री. घोटकर यांच्याकडे केली आहे. या संदर्भात आमदार महेश बालदी यांच्या मागणीचे पत्र कर्नाळा …

Read More »

तळा आनंदवाडीत इनोव्हाच्या अपघातात दोन ठार, दोघे जखमी

तळा : प्रतिनिधी तळा आनंदवाडी येथे सोमवारी (दि. 4) सकाळी 11च्या सुमारास इनोव्हा गाडीचा भीषण अपघात होऊन दोन जणांचा मृत्यू झाला असून अन्य दोघे जखमी झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी वाहनचालकाला ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार तळ्याकडून इंदापूरकडे इनोव्हा गाडी (एमएच 46-डब्ल्यू 5177) घेऊन जात असताना चालक जयेंद्र पारावे (रा. …

Read More »

कुंडलिका नदीत बुडून पर्यटकाचा मृत्यू

माणगावमधील घटना; दोघांना वाचविण्यात यश माणगाव : प्रतिनिधी पर्यटनासाठी माणगाव तालुक्यात आलेल्या ग्रुपमधील एका तरुणाचा कुंडलिका नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि. 3) घडली, तर त्याच्या दोन सहकार्‍यांना वाचविण्यात यश आले आहे. मुंबई-ठाणे येथून 17 पर्यटक रविवारी वर्षासहलीसाठी माणगाव तालुक्यात आले होते. भिरा येथील देवकुंड परिसर पाहून झाल्यानंतर परतताना …

Read More »

नवीन पनवेलमध्ये उद्यान नूतनीकरण, सुशोभीकरण

महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल महापालिका क्षेत्रात विकासाची अनेक कामे होत आहेत. त्यानुसार नवीन पनवेल सेक्टर 3 आणि 4 मध्ये उद्यान नूतनीकरण व सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन रविवारी (दि. 3) …

Read More »

राज्यात पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली घोषणा

मुंबई : नव्या सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर सत्ताधारी व विरोधी पक्षातील आमदारांची अभिनंदनपर भाषणे झाली व शेवटी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषण केले. या वेळी त्यांनी दोन महत्त्वपूर्ण घोषणा केल्या, ज्यामध्ये इंधनावरील व्हॅट कमी करण्यासाठी लवकरच कॅबिनेटमध्ये निर्णय घेण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या हिरकणी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी 21 …

Read More »

मांसाहारी खवय्यांची चिवणीला पसंती

उरण : वार्ताहर दडी मारलेल्या पावसाने अखेर दमदार सुरुवात केल्याने उरण तालुक्यात खाडी किनारी चिवणी मासे पकडण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. या माशांची गाभोळी (अंडी) खाण्याची मजा काही औरच असते. त्यामुळे मासांहारी खवय्यांची मोठी पसंती या माशांना मिळत असल्याचे दिसून येत आहे. पावसाळा सुरू झाला की उरण तालुक्याच्या पूर्व भागात …

Read More »