तरीही खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड पाली : प्रतिनिधी पाली सुधागडसह जिल्ह्यात सध्या ताडगोळे काही प्रमाणात विक्रीसाठी येऊ लागले आहेत, मात्र गेल्या वर्षी 100 रुपयांना एक डझन मिळणारे ताडगोळे यंदा 100 रुपयांना आठ किंवा नऊ मिळत आहेत. ताडगोळ्यांचा हंगाम सुरू होण्यास अवकाश आहे. शिवाय वातावरणातदेखील बदल झाला आहे. त्यामुळे उत्पादन कमी होऊन …
Read More »संजय राऊत यांनी एवढी बोंबाबोंब करायची गरज काय?
भाजप नेते किरीट सोमय्यांचा सवाल मुंबई : प्रतिनिधी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी राज्यसभेचे पदसिद्ध सभापती आणि देशाचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना लिहिलेल्या पत्रात भाजपवर गंभीर आरोप केले आहेत तसेच केंद्रातील सत्ताधार्यांकडून सक्तवसुली संचालनालयाचा (ईडी) गैरवापर करीत विरोधकांचा छळ केला जात असल्याचा आरोप केला आहे. त्यास भाजपकडून तीव्र आक्षेप …
Read More »हिंगणघाट जळीतकांडप्रकरणी आरोपी दोषी; गुरुवारी निकाल
वर्धा : प्रतिनिधी संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणार्या हिंगणघाट जळीतकांडप्रकरणी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले आहे. कोर्ट गुरुवारी (दि. 10) आरोपीला शिक्षा सुनावणार असल्याची माहिती सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दिली. आरोपी विकेश नगराळेने एकतर्फी प्रेमातून 3 फेब्रुवारी 2020 रोजी शिक्षिकेला पेटवले होते. 10 फेब्रुवारीला तिचा मृत्यू झाला. …
Read More »घोटाळेबाज विवेक पाटील यांच्या जामीन अर्जावर आता 17 फेब्रुवारीला सुनावणी
पनवेल : प्रतिनिधी बोगस कर्ज प्रकरणामुळे अडचणीत आलेल्या कर्नाळा नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांना अजूनही न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही. त्यांच्या जामीन अर्जावर आता 17 फेब्रुवारी 2022 रोजी पुढील सुनावणी होणार आहे. मुंबईच्या सत्र न्यायालयात मंगळवारी (दि. 8) झालेल्या सुनावणीच्या वेळी सक्तवसुली संचालनालयातर्फे (ईडी) अॅड. …
Read More »कर्जतमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार
कर्जत : बातमीदार नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मानिवली येथील एका अल्पवयीन मुलीवर गावातीलच तरुणाने बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. पीडित 17 वर्षीय तरुणीवर कल्याणमधील रुग्णालयात उपचार सुरू असून आरोपीवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्जत तालुक्यातील मानिवली येथील पीडित तरुणीच्या घरी कोणी नसताना तिच्यावर त्याच गावातील 37 …
Read More »मुंबई महापालिकेवर प्रशासक नेमणार
राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय मुंबई : प्रतिनिधी बृहन्मुंबई महानगरपालिकेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यासाठी मुंबई महानगरपालिका अधिनियमात सुधारणा करण्यास बुधवारी (दि. 9) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बृहन्मुंबई महापालिकेची मुदत 7 मार्च 2022 रोजी संपत आहे, परंतु राज्यात कोविडची आपत्ती तसेच बृहन्मुंबई महापालिकेच्या सदस्य संख्येत केलेली वाढ आणि त्यामुळे झालेली प्रभागांची पुनर्रचना …
Read More »वाईन विक्री निर्णयाविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आक्रमक
14 फेब्रुवारीपासून उपोषण करणार नगर : प्रतिनिधी राज्य सरकारने सुपरमार्केट आणि वॉक-इन स्टोअर्समध्ये वाईन विक्रीसाठी परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला भाजपकडून तीव्र आक्षेप घेण्यात आला असून राज्यभरातूनही सरकारविरोधात संताप व्यक्त होत आहेत. अशातच ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राज्य सरकारने हा निर्णय मागे घ्यावा या मागणीसाठी मुख्यमंत्री उद्धव …
Read More »राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईतच होणार
मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यपालांचे अभिभाषण घेण्यासाठी नागपुरात सभागृह नाही तसेच आमदार निवास हे सध्या विलगीकरण कक्ष म्हणून वापरले जात आहेत. त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपुरात घेता येणार नाही, तर ते मुंबईतच होईल. 15 फेब्रुवारीला सल्लागार समितीची बैठक होणार आहे. तेव्हा यावर चर्चा केली जाईल, असे अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक बुधवारी (दि. …
Read More »पनवेल मनपा स्थायी समितीच्या बैठकीत वैद्यकीय आरोग्य विभागाच्या विषयांना मंजुरी
पनवेल : प्रतिनिधी कोरोना साथरोगामध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी पीपीई किट खरेदीचा मार्ग मोकळा झाला आहे. पनवेल महापालिकेच्या मंगळवारी (दि. 8) झालेल्या स्थायी समितीच्या ऑनलाइन सभेत कोरोना चाचण्या (आरटी-पीसाआर) करण्यासाठीच्या दरास मान्यता देण्यात आली आहे. पनवेल महापालिकेची स्थायी समितीची सोमवारची स्थगित सभा मंगळवारी मुख्यालयातील आयुक्त दालनासमोरील सभागृहात स्थायी समिती सभापती …
Read More »आत्महत्या रोखण्यासाठी सायकलवरून भारतभ्रमण
पाली : प्रतिनिधी कोरोना महामारीने संपूर्ण जगाला कवेत घेतले. या काळात अनेकांचे रोजगारदेखील हिरावले, जवळचे नातेवाईक दूर झाले. अशीच परिस्थिती संजय बिस्वास उर्फ संजय बंजारा या तरुणावर आली. त्याने नैराश्यात आत्महत्येचा अयशस्वी प्रयत्नही केला. त्यानंतर सायकलिंगने त्याला नवचेतना देऊन तारले व आत्महत्येपासून परावृत्त केले. मग हा तरुण आत्महत्या रोखण्याचा संदेश …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper