Breaking News

Ramprahar Reporters

शुक्रवारपासून पनवेलमध्ये राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेची महाअंतिम फेरी

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यासह कला दिग्दर्शक नितीन देसाई, सुप्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे, अभिनेते व दिग्दर्शक विजय केंकरे, ब्रँड अ‍ॅम्बेसिडर ओमकार भोजने यांची लाभणार उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या …

Read More »

शेतकर्‍यांच्या जमिनींचे जबरदस्तीने भूसंपादन केल्यास तीव्र आंदोलन करू

आमदार प्रशांत ठाकूर यांचा राज्य सरकारला इशारा पनवेल : रामप्रहर वृृत्त शेतकर्‍यांचे पूर्ण समाधान झाल्याशिवाय विरार-अलिबाग मल्टी मॉडेल कॉरिडॉरसाठी निताळे, वावंजे, नितळस या गावांमधील जमिनीची मोजणी करू नये, अशी मागणी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेलचे विभागीय अधिकारी यांच्याकडे केली आहे. जबरदस्तीने जमीन संपादित केल्यास शासनाला संघर्षाला …

Read More »

विवेक पाटील यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी 1 फेब्रुवारीला

  पनवेल : प्रतिनिधी बोगस कर्ज घोटाळा प्रकरणामुळे अटकेत असलेले कर्नाळा नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि शेकापचे माजी आमदार विवेक शंकर पाटील यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी 1 फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचा तळोजा तुरुंगातील मुक्काम आता आणखी नऊ दिवसांनी वाढला आहे. विवेक पाटील यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) 15 …

Read More »

सर्वपक्षीय विमानतळ कृती समितीचा सिडकोला एक महिन्याचा अल्टिमेटम

पनवेल : हरेश साठे भूमिपुत्र, प्रकल्पग्रस्तांचे दैवत लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांच्या नावासाठी काहीही झाले तरी चालेल अशी रोखठोक भूमिका कायम ठेवत व ’जय दिबा’ असा जयघोष करीत सोमवारी (24 जानेवारी) लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समिती, 27 गाव प्रकल्पबाधित कृती समिती यांच्या नेतृत्वाखाली …

Read More »

ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील यांना सातार्‍यात ‘रयत’ची आदरांजली

सातारा ः प्रतिनिधी रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष व ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांचे नुकतेच निधन झाले. रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन म्हणूनही त्यांनी खूप प्रभावी काम केले होते. त्यांच्याबद्दल असणारी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘रयत’ने शनिवारी (दि. 22) यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्युट ऑफ सायन्स महाविद्यालयात विविध क्षेत्रांतील मान्यवरांना निमंत्रित करून …

Read More »

मराठी संत साहित्य संमेलनाला प्रारंभ

खालापूर : प्रतिनिधी महाराष्ट्र वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित दहाव्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाचा शनिवारी (दि. 22) खालापूर तालुक्यातील देवन्हावे येथील नोव्हाटेल इमॅजिका या ठिकाणी प्रारंभ झाला. राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात त्यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले. अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाचा मान यंदा रायगड जिल्ह्याला मिळाला दोन …

Read More »

साई येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन

पनवेल ः रामप्रहर वृत्त लोकांच्या भले करण्यासाठी एकत्र येऊन काम करूया, असे आवाहन उरण विधानसभा मतदारसंघाचे कार्यतत्पर आमदार महेश बालदी यांनी शनिवारी (दि. 22) केले. पनवेल तालुक्यातील साई येथे आमदार महेश बालदी यांच्या स्थानिक विकास निधीमधून 35 लाख रुपयांची विकासकामे करण्यात येणार असून या कामांचे भूमिपूजन त्यांच्याच हस्ते झाले. त्या …

Read More »

मुंबईत इमारतीला भीषण आग; सहा जणांचा मृत्यू, 15 जखमी

मुंबई : प्रतिनिधी मुंबईमधील ताडदेव भागातील एका इमारतीला शनिवारी (दि. 22) सकाळी भीषण आग लागली. या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला असून 15 जण जखमी झाले आहेत. जखमींना भाटिया रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ताडदेवमधील नाना चौकातील गांधी रुग्णालयाच्या समोरील 20 मजली कमला बिल्डिंगला शनिवारी सकाळी साडेसातच्या सुमारास आग आग …

Read More »

24 जानेवारीला विमानतळ काम बंद लाक्षणिक आंदोलन

‘दिबां’च्या नावासाठी कृती समितीचा वज्रनिर्धार पनवेल : हरेश साठे आता बस पुरे झाले! ‘दिबां’च्या नावासाठी काहीही झाले तरी चालेल, अशी रोखठोक भूमिका कायम ठेवत ‘जय दिबा’ असा जयघोष करीत 24 जानेवारीला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम बंद पाडण्यात येणार आहे. लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती …

Read More »

इंडिया गेटवर बसवणार नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा

पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा नवी दिल्ली : वृत्तसंस्था दिल्लीतील इंडिया गेटवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा भव्य पुतळा बसवण्याची घोषणा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. पंतप्रधान नेताजींच्या पुतळ्याचे छायाचित्र ट्विट करून त्यांंनी ही माहिती दिली, तसेच येत्या 23 जानेवारीला नेताजींच्या जयंतीनिमित्त होलोग्राम पुतळ्याचे अनावरण करणार असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. देश …

Read More »