पनवेल : रामप्रहर वृत्त बी. सी. ठाकूर सनच्या वेअरफाऊस अॅण्ड लॉजिस्टिकचे कार्यालय उद्योजक भरतशेठ चांगू ठाकूर यांनी पनवेलजवळील करंजाडे येथे सुरू केले आहे. या कार्यालयाचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते मंगळवारी (दि. 15) करण्यात आले. या वेळी बी. सी. ठाकूर कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकपदी प्रतिक ठाकूर यांची निवड …
Read More »तर महाराष्ट्राचा बट्ट्याबोळ झाल्याशिवाय राहणार नाही : फडणवीस
मुंबई : प्रतिनिधी राज्याचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या काळात मोठ्या प्रमाणात घोटाळे झाल्याचा आरोप केला आहे तसेच या सरकारमध्ये सगळे केवळ पैशांच्या पाठीमागे लागल्याचे सांगत सरकारचे मंत्री पैशांचा हव्यास करू लागले तर महाराष्ट्राचा बट्ट्याबोळ झाल्याशिवाय राहणार नाही, असेही फडणवीसांनी म्हटले. ते एका …
Read More »खारघर प्राथमिक आरोग्य केंद्रात विविध वैद्यकीय सेवांचे उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्त खारघर येथील डी-मार्टजवळील नागरी प्राथमिक आरोग्यवर्धिनी केंद्रात कोविड साथरोग आटोक्यात आल्याने बाह्यरूग्ण सेवा पूर्ववत करण्यात आल्या आहेत. या केंद्रात सुरू करण्यात आलेल्या विविध वैद्यकीय सेवांचे उद्घाटन महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर सीताताई पाटील, सभागृह नेते परेश ठाकूर, आयुक्त गणेश देशमुख आदींच्या हस्ते मंगळवारी (दि. 15) झाले. …
Read More »एक्स्प्रेस वेवर विचित्र अपघातात चौघांचा मृत्यू, सात जण जखमी
खोपोली, खालापूर : प्रतिनिधी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खोपोली हद्दीत मंगळवारी (दि. 15) सकाळी साडेसहाच्या सुमारास सहा वाहनांच्या विचित्र अपघातात चार प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून सात जण जखमी झाले आहेत. दरम्यान, अपघातानंतर काही काळ मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. एक्स्प्रेस वेवर बोरघाटात आडोशी बोगद्याजवळ एका ट्रकचा (एमएच 12 एसएक्स …
Read More »पनवेल मनपा हद्दीतील कॅन्सरग्रस्त महिलांना मिळणार अर्थसहाय्य
पनवेल : रामप्रहर वृत्त कॅन्सर या दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या महिलांना व मुला-मुलींना अर्थसहाय्य मिळण्याचा ठराव सोमवारी (दि. 14) झालेल्या पनवेल महापालिकेच्या महिला बालकल्याण समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. हा विषय आता येणार्या सर्वसाधारण महासभेत मांडण्यात येणार आहे. महिला व बालकल्याण समितीची बैठक सभापती हर्षदा उपाध्याय यांच्या अध्यक्षतेखाली आयुक्त दालनाशेजारील …
Read More »भाजप नेते किरीट सोमय्यांना कर्नाळा बँक ठेवीदारांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा
पनवेल : रामप्रहर वृत्त कर्नाळा बँकेत झालेला कोट्यवधींचा घोटाळा उघडकीस आणून ठेवीदार आणि खातेदारांना त्यांचे हक्काचे पैसे परत मिळवून देण्याची आशा पल्लवित करून ती सत्यात उतरवण्यासाठी संघर्ष करणारे भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या वाढदिवसानिमित्त खातेदार आणि ठेवीदारांनी मनापासून शुभेच्छा दिल्या. ‘आम्हाला माहीत आहे कोणाच्या कर्तृत्वामुळे कर्नाळा बँक ठेवीदारांना …
Read More »माणगावमध्ये मध्यरात्री थरार!
दुचाकीवरून आलेल्या दुकलीने झाडल्या गोळ्या; तरुण गंभीर माणगाव : प्रतिनिधी माणगाव शहरातील कचेरी रोड मार्गावर शनिवारी (दि. 12) रात्री 12.10च्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोघा अज्ञात इसमांनी मेडिकलचे दुकान बंद करून पायी चालत जाणार्या तरुणावर पिस्तुलातून गोळ्या झाडल्या. यानंतर हल्लेखोर पळून गेले. या गोळीबारात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी …
Read More »विकासकामांना विरोध करून अस्तित्व टिकवण्याचा शेकापचा केविलवाणा प्रयत्न
सभागृह नेते परेश ठाकूर यांची टीका तोंडरेत पावसाळी नाल्याचे भुमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त शेतकरी कामगार पक्ष विकासकामांना विरोध करून स्वतःचे अस्तित्व टिकवण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत असल्याने त्यांची दुर्दशा झाली असल्याची टीका पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी शनिवारी (दि. 12) केली. तोंडरे येथे महापालिकेच्या माध्यमातून एक कोटी 26 …
Read More »विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीकडून आरपीआय नेते जगदिश गायकवाड यांच्या तडीपारीचा जाहीर निषेध
पनवेल : रामप्रहर वृत्त लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे यासाठी सुरू असलेल्या चळवळीत प्रामुख्याने सहभागी असलेले आरपीआयचे कोकण प्रांत अध्यक्ष व पनवेल महापालिकेचे माजी उपमहापौर जगदिश गायकवाड यांना पोलिसांच्या माध्यमातून ठाकरे सरकारने तडीपारीचा जो आदेश काढला आहे, त्याचा लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई …
Read More »वाशीच्या खाडीत डॉल्फिनचे दर्शन
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त वाशीच्या खाडीमध्ये शुक्रवारी (दि. 11) डॉल्फिन मासा पहायला मिळाला. मासेमारी करणार्या युवकाने पाण्यामधून बाहेर उडी मारणार्या डॉल्फिन माशाचे दृश्य आपल्या मोबाइलमध्ये कैद केले आहे. मागील वर्षीदेखील नवी मुंबईत डॉल्फिन पाहायला मिळाला होता. नवा व्हिडीओ व्हायरल झाला असून आता नवी मुंबईकर डॉल्फिनला पाहण्यासाठी खाडीकिनारी गर्दी करताना …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper