महाराष्ट्रातून चौघांना संधी; एकूण 43 जणांना मंत्रिपदे नवी दिल्ली ः वृत्तसंस्थागेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार बुधवारी (दि. 7) झाला. राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलमध्ये झालेल्या सोहळ्यात एकूण 43 मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ देण्यात आली. यात महाराष्ट्रातील नारायण राणे, कपिल पाटील, भारती पवार व भागवत कराड या चार …
Read More »मुरूडमध्ये पर्यटकांवर पोलिसांची कारवाई
कोरोनाविषयक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंड मुरूड ः प्रतिनिधीकोरोनाचे नियम झुगारून मुरूड समुद्रकिनारी मौजमजा करणार्या पर्यटकांवर स्थानिक पोलिसांनी कारवाई केली आहे. या पर्यटकांना दंड ठोठावण्यात आला.शासनाच्या आदेशान्वये जिल्हानिहाय कोरोनाबाधित रुग्णसंख्येनुसार असलेला पॉझिटिव्ह रेट आणि ऑक्सिजन बेडची उपलब्धता या बाबींचा सर्वंकष विचार करून लागू करावयाच्या निर्बंधाबाबत विविध स्तर निश्चित करण्यात आले आहेत. …
Read More »व्हेलच्या उलटीची तस्करी करणार्यास अटक
रायगडातील दुसरी घटना, सुमारे पाच कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त माणगाव ः प्रतिनिधीव्हेल माशाच्या उलटीच्या तस्करीत मुंबई पोलीस दलातील बडतर्फ अलिबागमधील व्यक्तीला झालेल्या अटकेची घटना ताजी असतानाच माणगाव तालुक्यातील लोणेरे येथे बुधवारी (दि. 6) रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने रत्नागिरी येथून मोटरसायकलवर व्हेल माशाची उलटी विक्रीसाठी घेऊन जाणार्या एकाला पकडले …
Read More »खडसेंना ‘ईडी’कडून धक्का
भोसरी जमीन घोटाळ्याप्रकरणी जावयाला अटक मुंबई ः प्रतिनिधीराष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) मोठा धक्का दिला आहे. खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना ईडीने अटक केली आहे. पुण्यातील भोसरी येथील जमीन घोटाळ्याप्रकरणी चौधरी यांना ईडीकडून चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. रात्री उशिरापर्यंत त्यांची चौकशी सुरू होती. यानंतर त्यांच्यावर …
Read More »काँग्रेस नेते कृपाशंकर सिंह यांचा भाजपमध्ये प्रवेश
मुंबई ः प्रतिनिधीकाँग्रेस नेते, माजी गृहराज्यमंत्री आणि माजी मुंबई अध्यक्ष कृपाशंकर सिंह यांनी बुधवारी (दि. 7) भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. या वेळी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. उत्तर भारतीयांचे मोठे समर्थन असलेले कृपाशंकर सिंह यांनी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश …
Read More »वारे, कळंब येथे 200 रोपांची लागवड
कर्जत : बातमीदारकोकण विभाग पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संजय हंडोरे पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कर्जत तालुक्यातील कळंब आणि वारे परिसरात 200 झाडांची लागवड करण्यात आली. या झाडांचे संगोपन केले जाईल, असे आश्वासन आयोजक दीपक बोराडे यांनी या वेळी दिले. वारे येथील तृप्तेश्वर मंदिर तलाव परिसर तसेच प्राथमिक शाळेच्या आवारात वृक्षारोपण …
Read More »बिरदोले शाळेतील विद्यार्थ्यांना छत्रीवाटप
कर्जत : बातमीदारतालुक्यातील दहिवली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच दिवंगत किसन जामघरे यांच्या स्मरणार्थ आणि सुशील कालेकर, राजेश कालेकर यांच्या पुढाकाराने बिरदोले गावातील प्राथमिक शाळेमधील सर्व विद्यार्थ्यांना छत्रीचे वाटप करण्यात आले.दहिवली ग्रामपंचायत सदस्य आणि माजी उपसरपंच किसन जामघरे यांचे मागील महिन्यात प्रदीर्घ आजाराने निधन झाले होते. त्यांच्या स्मरणार्थ सुशील कालेकर आणि राजेश …
Read More »अलिबागेत दिव्यांगांसाठी विशेष लसीकरण मोहीम
अलिबाग ़: प्रतिनिधीलसीकरण केंद्रापर्यंत पोहोचण्यात येणार्या अडचणी तसेच रांगेत उभं राहण्याच्या त्रासामुळे अनेक अपंग कोविड प्रतिबंधक लसीकरणापासून वंचित रहात आहेत. ही बाब लक्षात घेऊन मंगळवारी (दि. 6) प्रथमच अलिबाग येथे अपंगांसाठी विशेष लसीकरण मोहीम राबवण्यात आली.सामाजिक कार्यकर्त्यांच्या सहकार्यातून दिव्यांग कर्मचारी संघटना आणि अलिबाग तहसील कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने अपंगांचे लसीकरण …
Read More »नेरळ ममदापूरवाडीतील रस्त्याची डागडुजी
विहिरीकडे जाण्यासाठी ग्रामस्थांचे श्रमदान कर्जत : बातमीदारनेरळजवळील ममदापूर ग्रुप ग्रामपंचायतीमधील ममदापुरवाडीमधील विहिरीकडे जाणारा रस्ता पावसाळ्यात निसरडा होत असल्याने आदिवासी महिला पाणी भरताना पाय घसरून पडत असत. ही गैरसोय दूर करण्यात येथील ग्रामस्थ यशस्वी झाले आहेत. त्यांनी श्रमदान करून विहिरीकडे जाणारा रस्ता दुरूस्त केला आहे.ममदापूरवाडी येथील पिण्याच्या पाण्याची विहीर वाडीपासून दूर …
Read More »काथ्या उद्योगाचे सार्वत्रिकीकरण व्हावे
जेव्हा जेव्हा मुंबईची तुंबई होते, तेव्हा प्रत्येक विश्लेषणात प्लास्टीक प्रदूषणासोबतच नारळ शहाळ्याच्या कपच्या आणि सालांमुळे अनेक गटारे तुंबत असल्याचे निष्कर्ष काढण्यात आले आहेत. यामुळे पिण्याच्या पाण्याच्या तुलनेत नारळाचे अवशेषदेखील या पुरस्थितीसाठी म्हणजेच तुंबापुरीसाठी कारणीभूत असल्याचे दिसून येत असते. एरव्ही हस्तोद्योगामध्ये याच नारळाच्या शहाळ्याच्या सालीपासून बनविण्यात आलेल्या वस्तुंना टिकाऊ म्हणून मागणी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper