Breaking News

Ramprahar Reporters

मुंबईत विविध दुर्घटनांमध्ये 25 जणांचा मृत्यू

मुंबई : प्रतिनिधीमुंबईत मध्यरात्री विजांच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पाणी साचून मुंबईची तुंबई झाली. चेंबूरमध्ये डोंगराच्या पायथ्याशी बांधलेली भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 17 जणांचा बळी गेला आहे. याचबरोबर विक्रोळीत एक दुमजली इमारत कोसळून सात जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय भांडूपमध्ये भिंत कोसळून एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, …

Read More »

शरद पवारांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट

नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी (दि. 17) राजधानी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली, पण नेमकी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली याविषयी निश्चित माहिती मिळू शकली नाही.राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर आहे. सत्ताधारी पक्षांमधील धुसफूस सातत्याने समोर येत …

Read More »

आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे आशीर्वाद

रेवदंडा (अलिबाग) : उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांनी शनिवारी आपल्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ निरूपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. सोबत सचिन धर्माधिकारी व राहुल धर्माधिकारी.

Read More »

…तर आमच्या अंगावरून जेसीबी घेऊन जावे लागेल!

आमदार प्रशांत ठाकूर यांचा काळुंद्रेत रूद्रावतार घरे पाडण्यासाठी आलेले अधिकारी गेले परत पनवेल ः प्रतिनिधीपनवेल महापालिका हद्दीतील काळुंद्रे येथे भरपावसात घरे पाडण्यासाठी आलेल्या रेल्वेच्या अधिकार्‍यांना भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी कारवाई करायची असेल तर माझ्यासहीत नगरसेवक तेजस कांडपिळे आणि इतर सहकार्‍यांच्या अंगावरून जेसीबी घेऊन जावे लागेल, असे …

Read More »

माथेरान म्हणजे नैसर्गिक ऑक्सिजन केंद्र -जिल्हाधिकारी

कर्जत : बातमीदारघनदाट जंगलामुळे माथेरान हे ऑक्सिजनचा खजाना असलेले केंद्र असून येथे आल्यावर मन प्रसन्न होते, असे प्रतिपादन रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले.जिल्हाधिकारी निधी चौधरी या परिवारासोबत माथेरानला पर्यटनासाठी आल्या आहेत. खाजगी दौरा असूनही त्यांनी येथील बी. जे. हॉस्पिटलमधील कोविड वार्ड, ओपीडी, ऑक्सिजन यंत्रणा यांची पहाणी केली. तसेच तेथील …

Read More »

चाईल्ड लाइन,‘जाण‘कडून पूर्वाला आधार

खालापूर : प्रतिनिधी वडील गमावलेल्या आणि आई मानसिक रुग्ण असलेल्या खोपोलीतील आठ वर्षांच्या पूर्वा राहुल देवकुळे या मुलीच्या पुनर्वसनाची जबाबदारी रायगड चाईल्ड लाइन या संस्थेने घेतली आहे. तर पनवेलच्या जाण फाऊंडेशनने तिच्या संगोपन, शिक्षणाची  जबाबदारी स्वीकारली आहे. त्यामुळे पूर्वाच्या आयुष्याला मिळाली नवी दिशा मिळाली आहे.पूर्वा राहुल देवकुळे या अवघ्या आठ वर्षाच्या …

Read More »

पुरामुळे नांदगाव हायस्कूलचे नुकसान

मुरुड : प्रतिनिधीतालुक्यातील यशवंतनगर नांदगाव येथील श्री छत्रपती शिवाजी नूतन विद्यालयाच्या कार्यालयासह प्रत्येक वर्गात पुराचे पाणी शिरल्यामुळे शाळेतील  वस्तूंचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.मुरूड तालुक्यात सोमवारी 348 मिलीमीटर त्यानंतर दुसर्‍या दिवशी मंगळवारी 204 मिलीमीटर पाऊस पडल्याने नदी व समुद्राशेजारी असणार्‍या सर्व गावांत पुराचे पाणी शिरले. नांदगाव हायस्कूलमध्ये तर प्रत्येक वर्गात …

Read More »

सीरम इन्स्टिट्यूट करणार ‘स्पुटनिक व्ही’चे उत्पादन

भारतात 30 कोटी डोसचे नियोजन नवी दिल्ली ः वृत्तसंस्थारशियाच्या स्पुटनिक व्ही लसीचे उत्पादक आणि भारतातील सिरम इन्स्टिट्युट यांनी येत्या सप्टेंबरपासून सिरममध्येच स्पुटनिक व्ही लसीचे उत्पादन सुरू करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे कोरोनाविरोधातील लढ्यामध्ये भारताकडे अजून एका लसीचा मोठ्या प्रमाणावर पुरवठा सुरू होऊ शकणार आहे.भारतात वर्षाला स्पुटनिक व्ही लसीचे 30 कोटी …

Read More »

‘मला तळोजा जेलमध्ये हलवा’

घोटाळेबाज विवेक पाटील यांची मागणी पनवेल ः प्रतिनिधीमुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये असलेले कर्नाळा बँकेचे अध्यक्ष व शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांचा तुरुंगातील मुक्काम सत्र न्यायालयाने आता 22 जुलैपर्यंत वाढविण्याचा आदेश दिला आहे तसेच ‘आपल्याला तळोजा जेलमध्ये हलवावे’, या विवेक पाटील यांच्या मागणीवर 22 जुलैच्या सुनावणीत विचार करू, असेही सत्र …

Read More »

रायगडात रेड अलर्ट

अतिवृष्टीचा इशारा; दोन दिवस धोक्याचे अलिबाग ः प्रतिनिधीरायगड जिल्ह्यात मंगळवारी (दि. 13) पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी हवामान खात्याने पुढील दोन दिवस रेड अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व यंत्रणांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, दोन दिवस पडलेल्या पावसाने नद्या, नाले ओसंडून वाहू लागले आहेत.जिल्ह्याच्या बहुतांश …

Read More »