आयसीसीकडून शिक्कामोर्तब दुबई ः वृत्तसंस्थाकोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुरुषांची आयसीसी ट्वेण्टी-20 वर्ल्ड कप स्पर्धा युएई आणि ओमानमध्ये होणार असण्यावर मंगळवारी (29 जून) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) शिक्कामोर्तब केले. 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर या कालावधीत ही स्पर्धा होणार असून याचे यजमानपद भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे (बीसीसीआय) असणार असल्याची माहिती आयसीसीने दिली.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर …
Read More »कायद्यासमोर कोणालाही पळवाट काढता येत नाही
दरेकरांचा अनिल देशमुखांवर निशाणा मुंबई ः प्रतिनिधी100 कोटी वसुलीप्रकरणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) समन्स पाठवून चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते, मात्र देशमुखांनी चौकशीसाठी उपस्थित राहणार नसल्याचे सांगितले आहे तसेच प्रत्येक चौकशीऐवजी ऑनलाइन जबाब देण्याची देशमुखांची तयारी असल्याचे पत्र त्यांनी ईडीला पाठवले आहे. कोरोनामुळे त्यांनी ऑडिओ-व्हिज्युअल …
Read More »कर्जत पोलिसांनी उधळली फार्महाऊसमधील पार्टी
34 जणांवर गुन्हा दाखल कर्जत ः बातमीदारकोविड-19च्या पार्श्वभूमीवर जारी करण्यात आलेल्या शासकीय आदेशाचे उल्लंघन करून कर्जत तालुक्यातील एका फार्महाऊसमध्ये सुरू असलेली मुंबईतील उच्चभ्रू वस्तीतील पर्यटकांची पार्टी पोलिसांनी उधळली. या प्रकरणी 34 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कर्जत तालुक्यातील वंजारवाडी येथील अविज व्हिलेज फॉर्म हाऊस रेस्टॉरंटमध्ये कोरोनाचे नियम धाब्यावर बसून पार्टी …
Read More »गणेशोत्सवासाठी नियमावली जाहीर
सार्वजनिक मूर्ती चार, तर घरगुती दोन फुटांची मुंबई ः प्रतिनिधीराज्य सरकारकडून गणेशोत्सवासंदर्भात नियमावली जाहीर करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाही निर्बंध घालण्यात आले असून सार्वजनिक गणेशमूर्ती चार फूटांची, तर घरगुती गणेशमूर्ती दोन फुटांची असावी अशी मर्यादा घालून देण्यात आली आहे.संपूर्ण महाराष्ट्राला गणेशोत्सवाचे वेध लागले असून या वर्षी हा उत्सव जल्लोषात …
Read More »गूड न्यूज! भारतात येणार चौथी कोरोना प्रतिबंधक लस
‘मॉडर्ना’च्या आयातीला मंजुरी नवी दिल्ली ः वृत्तसंस्थादेशात आलेली कोरोनाची दुसरी लाट ओसरत चालली असून गेल्या दीड महिन्यापासून कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने घसरण सुरू आहे, मात्र तिसर्या लाटेचा धोका कायम आहे. त्यामुळे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण अभियानाचा वेग वाढवण्याचे प्रयत्न केंद्र सरकारकडून सुरू आहेत. त्याच प्रयत्नांचा भाग म्हणून देशात लवकरच कोरोना प्रतिबंधक …
Read More »विम्बल्डन खुली टेनिस स्पर्धा : त्सित्सिपास सलामीलाच पराभूत
विम्बल्डन ः वृत्तसंस्थाविम्बल्डन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी धक्कादायक निकालाची नोंद झाली. दोन आठवड्यांपूर्वीच फ्रेंच ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारणार्या ग्रीसच्या स्टेफानोस त्सित्सिपासला पहिल्याच फेरीत गाशा गुंडाळावा लागला. सर्बियाचा नोव्हाक जोकोव्हिच आणि बेलारूसची आर्यना सबालेंका यांनी मात्र संघर्षपूर्ण विजयासह दुसरी फेरी गाठली.पुरुष एकेरीत अमेरिकेच्या बिगरमानांकित फ्रान्सेस टिआफोएने तिसर्या मानांकित …
Read More »उरुग्वेला पॅराग्वेने झुंजवले, तर अर्जेंटिनाची बोलिवियावर एकतर्फी मात
रियो दी जानेरो ः वृत्तसंस्थाकोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेत पॅराग्वेविरुद्ध उरुग्वेने, तर बोलिवियाविरुद्ध अर्जेंटिनाने सामना जिंकला. या दोन सामन्यांमध्ये एकूण सहा गोल्स झाले. उरुग्वेने 1-0च्या आघाडीने पॅराग्वेविरुद्धचा सामना जिंकला, तर बलाढ्य अर्जेंटिनाने 4-1ने बोलिवियाचा धुव्वा उडवला.उरुग्वे विरुद्ध पॅराग्वे सामना अटीतटीचा झाला. या सामन्यात उरुग्वेचा सहज विजय होईल असे मानले जात होते, …
Read More »राष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धेत तजिंदरला सुवर्णपदक
पतियाळा ः वृत्तसंस्थाऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेला गोळाफेकपटू तजिंदर पाल सिंग तूर याने सातत्यपूर्ण कामगिरी कायम राखत राष्ट्रीय अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेतही सुवर्णपदकाची कमाई केली.तजिंदरने गेल्या सोमवारी इंडियन ग्रां. प्री. अॅथलेटिक्स स्पर्धेत 21.94 मीटर अशी कामगिरी करून राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली होती. त्यासह त्याने ऑलिम्पिकचे तिकीटही निश्चित केले होते. मंगळवारी त्याने 21.10 मीटर …
Read More »पोर्तुगालपाठोपाठ फ्रान्स स्पर्धेबाहेर
युरो कपमध्ये स्वित्झर्लंडचा रोमहर्षक विजय बुखारेस्ट ः वृत्तसंस्थायुरो कप स्पर्धेत स्वित्झर्लंड संघाने जग्गज्जेत्या फ्रान्सचा पेनल्टी शूट आऊटमध्ये 4-5च्या फरकाने धुव्वा उडवत मोठ्या थाटात उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. अतिरिक्त वेळ दिल्यानंतरही सामना 3-3च्या बरोबरीत सुटल्याने पेनल्टी शूट आऊटने सामन्याचा निकाल लावण्यात आला. पेनल्टी शूट आऊटमध्येही अटीतटीचा सामना पहायला मिळाला. 1938नंतर पहिल्यांदाच …
Read More »‘टीआयपीएल’तर्फे पोलिसांना रेनकोट वाटप
पनवेल : ठाकूर इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. (टीआयपीएल)च्या वतीने कळंबोली पोलीस ठाण्यातील कर्मचार्यांना महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते सोमवारी रेनकोटचे वाटप करण्यात आले. या वेळी नगरसेवक अमर पाटील, बबन मुकादम, भाजपचे कळंबोली शहर अध्यक्ष रविशेठ पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील आदी उपस्थित होते.
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper