Breaking News

Ramprahar Reporters

आता मुस्लिम आरक्षणासाठी लढाई

वंचित बहुजन आघाडीचा 5 जुलैला विधान भवनावर मोर्चा मुंबई ः प्रतिनिधीमराठा आरक्षण आणि ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा धगधगत असताना आता मुस्लिमांच्या आरक्षणाचा मुद्दाही चर्चेत येऊ लागला आहे. मुस्लिमांना पाच टक्के आरक्षण द्यावे, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी आणि रझा अकादमी येत्या 5 जुलैला विधान भवनावर भव्य मोर्चा काढणार आहेत. वंचित …

Read More »

आदित्य ठाकरेंच्या निवासस्थानाबाहेर संभाजी ब्रिगेडचे आंदोलन

ठाकरे सरकारविरोधात घोषणाबाजी मुंबई ः प्रतिनिधीसंभाजी ब्रिगेड संघटनेने बुधवारी (दि. 30) राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेर आंदोलन केले. मराठा, ओबीसी आरक्षण आणि इतर विषयांवर चर्चा करण्यासाठी संभाजी ब्रिगेडने पत्र लिहून वेळ मागितली होती, पण भेटीची वेळ न दिल्याने त्यांनी मंत्रालयाच्या बाजूला असलेल्या ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केले.मराठा समाज …

Read More »

रायगडात हॉटेल, रिसॉर्ट 50 टक्के क्षमतेने होणार खुली

अलिबाग ः प्रतिनिधीराज्यातील कोरोना प्रादुर्भाव अधिक असलेल्या सात जिल्ह्यांमध्ये रायगडचा समावेश आहे. त्यामुळे शासनाच्या अनेक निर्बंधांतून रायगडकरांची अद्याप तरी सुटका झालेली नाही. लेव्हल-4मध्ये असलेल्या रायगडमध्ये अत्यावश्यक सेवेतील दुकाने केवळ 4 वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार आहेत, तर हॉटेल आणि रिसॉर्टला 50 टक्के क्षमतेने सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. जिल्हाधिकार्‍यांनी जारी …

Read More »

गणेश देशमुख यांनी स्वीकारला पनवेल मनपा आयुक्तपदाचा कार्यभार

पनवेल ः प्रतिनिधीयेथील महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त गणेश देशमुख यांनी बुधवारी (दि. 30) पदभार स्वीकारला. याबद्दल सभागृह नेते परेश ठाकूर यांनी त्यांचे स्वागत केले. या वेळी बोलताना देशमुख यांनी पनवेल महापालिकेच्या आयुक्तपदी पुन्हा एकदा रूजू झाल्याने आनंद होत असून जे प्रकल्प सुरू आहेत ते प्राधान्याने पुढे घेऊन जाण्यावर भर देण्यात येईल, …

Read More »

फडणवीसांच्या मागण्यांवर कार्यवाही करा

राज्यपाल कोश्यारींचे मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र मुंबई ः प्रतिनिधीराज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेऊन दिलेल्या निवेदनानंतर राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले असून यामध्ये विधिमंडळ अधिवेशन, विधानसभा अध्यक्षपद तसेच ओबीसी आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना या …

Read More »

आयपीएलमध्ये येणार दोन नवीन संघ

नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाइंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)च्या पुढील हंगामासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) दोन नवीन संघ स्पर्धेत आणणार आहे. ‘क्रिकबझ’च्या अहवालानुसार या नव्या टीमची बेस प्राइस सुमारे 1800 कोटी रुपये असू शकते, परंतु बोली लावल्यामुळे या टीमचे मूल्य 2200 ते 2900 कोटीपर्यंत जाईल.पाच वेळा आयपीएल चॅम्पियन मुंबई इंडियन्सची किंमत …

Read More »

सीमा पुनिया ऑलिम्पिकसाठी पात्र

पतियाळा ः वृत्तसंस्थाभारताची अनुभवी थाळीफेकपटू सीमा पुनिया हिने आंतरराज्य अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी दमदार कामगिरी करत टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याचा मान पटकावला.2018च्या राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक आणि आशियाई स्पर्धेत कांस्यपदक पटकावणार्‍या सीमाने 63.70 मीटर थाळीफेक करीत ऑलिम्पिकचा पात्रता निकष पार केला. 37 वर्षीय सीमा आता चौथ्यांदा ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार …

Read More »

युक्रेनचा स्वीडनवर थरारक विजय

युरो कपमध्ये उपांत्यपूर्व फेरीचे आठ संघ निश्चित ग्लासगो ः वृत्तसंस्थायुरो कप स्पर्धेच्या बाद फेरीतील शेवटच्या सामन्यात युक्रेनने स्वीडनला पराभूत करीत अटीतटीचा सामना 2-1च्या फरकाने जिंकला. या विजयाबरोबरच युक्रेन संघ पहिल्यांदाच उपांत्यपूर्व फेरीत पोहचला आहे. दरम्यान, या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीतील आठ संघ आता निश्चित झाले आहेत.युक्रेन विरुद्ध स्वीडन सामन्यात 90 मिनिटांचा …

Read More »

कर्नाळा बँक घोटाळा : वैद्यकीय कारण पुढे करून जेलबाहेर पडण्याची विवेक पाटील यांची धडपड

12 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी पनवेल ः प्रतिनिधी500 कोटींहून अधिक रुपयांच्या कर्नाळा बँक घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी)अटकेत असलेले बँकेचे अध्यक्ष व माजी आमदार विवेक पाटील यांना 12 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे, मात्र वैद्यकीय कारण पुढे करून ते जामिनासाठी धडपड करीत आहेत. त्यांना निवडणूक लढविताना तसेच जेलमध्ये जाईपर्यंत वैद्यकीय कारण …

Read More »

पनवेल मनपा आयुक्तपदी पुन्हा गणेश देशमुख

सुधाकर देशमुखांची बदली पनवेल ः वार्ताहरपनवेल महानगरपालिका आयुक्तपदी गणेश देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर येथील आयुक्त सुधाकर देशमुख यांची भिवंडी-निजामपूर महापालिका आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली.साधारण एक वर्षापूर्वी गणेश देशमुख हे पनवेल महापालिकेच्या आयुक्तपदी कार्यरत होते. त्यानंतर त्यांची अचानकपणे ठाणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी बदली करण्यात आली होती व त्यांच्या …

Read More »