Breaking News

Ramprahar Reporters

खेळपट्टीवरून रडगाणे बंद करा

व्हिव्हियन रिचर्ड्स इंग्लंडच्या खेळाडूंवर बरसले जोहान्सबर्ग : वृत्तसंस्थाइंग्लंडविरुद्धचा तिसरा कसोटी सामना भारताने 10 गडी राखून जिंकला. हा सामना दोन दिवसांमध्येच संपल्याने खेळपट्टीवरून बरीच उलटसुलट चर्चा सुरू आहे. अनेक माजी खेळाडूंनी खेळपट्टीबाबत नाराजी व्यक्त केली आहे, तर अनेकांनी खेळपट्टीचा बचावही केलाय. अशातच आता वेस्ट इंडिजचे माजी महान क्रिकेटपटू व्हिव्हियन रिचर्ड्स यांनी …

Read More »

क्रिकेट स्पर्धेत सावळे संघ विजेता

पनवेल : रामप्रहर वृत्ततालुक्यातील न्हावेखाडी येथील श्री गणेश क्रिकेट क्लबच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत ओमसाई सावळे (रसायनी) संघाने विजेतेपद पटकाविले. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते या संघाला 50 हजार रुपये व चषक असे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.  महेश्वरी मैदानात तीन दिवस ही स्पर्धा खेळली गेली. स्पर्धेत द्वितीय …

Read More »

भारतीय हॉकी संघाकडून जर्मनीचा धुव्वा

बर्लिन : वृत्तसंस्थाजवळपास 12 महिन्यांनंतर पहिला सामना खेळणार्‍या भारतीय पुरुष हॉकी संघाने अप्रतिम कामगिरीचे प्रदर्शन करीत यजमान जर्मनीचा 6-1 असा धुव्वा उडवत जर्मनी हॉकी दौर्‍याची शानदार सुरुवात केली.निळकंठ शर्मा (13व्या मिनिटाला), विवेक सागर प्रसाद (27व्या आणि 28व्या मिनिटाला), ललित कुमार उपाध्याय (41व्या मिनिटाला), आकाशदीप सिंग (42व्या मिनिटाला) आणि हरमनप्रीत सिंग …

Read More »

कुस्तीपटू विनेश फोगटला सुवर्णपदक

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाकोरोनाच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर भारताची आघाडीची कुस्तीपटू विनेश फोगटने झोकात पुनरागमन केले. विनेशने 2017च्या विश्वविजेत्या व्ही. कॅलाडझिन्स्कायला नामोहरम करून कीव्ह आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचे सुवर्णपदक रविवारी जिंकले.जागतिक क्रमवारीत तिसर्‍या स्थानावरील विनेशला 53 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत क्रमवारीत सातव्या स्थानावर असलेल्या बेलारूसच्या कॅलाडझिन्स्कायने तोलामोलाची लढत दिली. विनेशने सुरुवातीला 4-0 …

Read More »

इंग्लंडसाठी ट्रिकी खेळपट्टी

टीम इंडिया पुन्हा टाकणार फिरकीचे जाळे अहमदाबाद : वृत्तसंस्थाटीम इंडियाने तिसरी कसोटी जिंकून चार सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. आता आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद (डब्ल्यूटीसी) स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश मिळवण्याच्या निर्धाराने टीम इंडिया चौथ्या कसोटीत मैदानावर उतरणार आहे.डे नाइट कसोटीतील पराभवानंतर इंग्लंडचा संघ कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याच्या …

Read More »

अंगारकीला बल्लाळेश्वर, महडचे गणपती मंदिर बंद

भाविकांनी गर्दी न करण्याचे आवाहन पाली, खोपोली ः प्रतिनिधीकोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या सूचनेनुसार पालीसह जिल्ह्यात कोरोना नियमांची अंमलबजावणी सुरू आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्रातील अष्टविनायक देवस्थानांपैकी प्रख्यात असलेले धार्मिक स्थळ पालीचे बल्लाळेश्वर मंदिर तसेच महड येथील वरद विनायकाचे मंदिर अंगारकी चतुर्थीला मंगळवारी (दि. 2) भाविकांना दर्शनासाठी बंद …

Read More »

खालापुरात हुक्का पार्टीवर पोलिसांची धाड

खोपोली ः प्रतिनिधीकोरोनाच्या संसर्गामुळे सर्वत्र नियमांची कडक अंमलबजावणी सुरू असताना शनिवारी (दि. 27)रात्री खालापुरातील कलोते येथील कॅम्प मॅक्स फार्म हाऊसवर हुक्का पार्टी आणि डिजेवर धिंगाणा घालणार्‍या 14 जणांविरोधात खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कलोते हद्दीतील कॅम्प मॅक्स फार्म हाऊसवर परवानगी नसताना पार्टी सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनिल …

Read More »

नाना पोरेंसह सहकार्‍यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश

महाड ः प्रतिनिधीमहाडमधील तरुण नेतृत्व व यशस्वी उद्योजक संकेत उर्फ नाना पोरे यांनी शनिवारी(दि. 27) आपल्या सहकार्‍यांसह विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या निवासस्थानी भाजपत जाहीर प्रवेश केला. या वेळी तालुकाध्यक्ष जयवंत दळवी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.महाड तालुक्याचा रखडलेला विकास, शिक्षण, आरोग्य आणि तरुणांचे प्रश्न सेडविण्यासाठी स्थानिक नेतृत्व कमी पडत असून …

Read More »

बूथ संपर्क अभियान बैठक

पनवेल ः रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाच्या वतीने बूथ संपर्क अभियान राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत प्रभाग क्रमांक 19, बूथ नंबर 471ची बैठक भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत रविवारी (दि. 28) संपन्न झाली. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले.पनवेल येथील प्रभाग क्रमांक 19, बूथ …

Read More »

भाजपच्या वाढत्या दबावानंतर अखेर वनमत्री राठोड यांचा राजीनामा

मुंबई ः प्रतिनिधीपूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात नाव जोडले गेलेले राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी दबाव वाढल्यानंतर अखेर रविवारी (दि. 28) मुख्यमंत्र्यांकडे आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा सुपूर्द केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन वनमंत्री राठोड यांनी कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा दिला. राठोड यांच्या राजीनाम्यासाठी भाजपने गेल्या काही दिवसांपासून आक्रमक …

Read More »