Breaking News

Ramprahar Reporters

गोलंदाज विनय कुमारची निवृत्तीची घोषणा

नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाभारतीय संघाचा वेगवान गोलंदाज विनय कुमार याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. कर्नाटकचे प्रतिनिधित्व करणार्‍या विनय कुमारने आपल्या ट्विटर हँडलवर याबाबतची माहिती दिली आहे.विनय कुमारची आंतरराष्ट्रीय कारकीर्द जास्त काळ राहिलेली नसली तरी स्थानिक क्रिकेटमध्ये त्याचे नाव आदराने घेतले जाते. विनय कुमारच्या नेतृत्वात कर्नाटकच्या संघाने रणजी करंडकदेखील …

Read More »

पॉइंट टेबलमध्ये भारत अव्वल स्थानी

अहमदाबाद ः वृत्तसंस्थामोटेरा येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या तिसर्‍या कसोटी सामन्यात दुसर्‍या दिवशीच भारताने इंग्लंडला 10 गडी राखून पराभूत केले. दुसर्‍या डावात इंग्लंडने भारताला 49 धावांचे लक्ष्य दिले होते, जे भारताने कोणतीही विकेट न गमावता अवघ्या 7.4 षटकांत पूर्ण केले. या विजयासह टीम इंडिया आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉइंट …

Read More »

हिमा दासची कमाल

18 महिन्यांनंतर ट्रॅकवर उतरून जिंकले सुवर्ण नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाभारताची स्टार धावपटू हिमा दास ही जवळपास दीड वर्षानंतर ट्रॅकवर उतरली आणि तिने पहिल्याच स्पर्धेत 200 मीटर शर्यतीत सुवर्णपदक पटकावले. इंडियन ग्राप्री 2च्या महिला गटात तिने हे यश मिळवले. द्युती चंद हिनेही 100 मीटर शर्यतीत 11.44 सेकंदांची नोंद करून सुवर्णपदक जिंकले. …

Read More »

वनमंत्री संजय राठोड ठरले कोरोनाचे सुपर स्प्रेडर?

शक्तिप्रदर्शनानंतर महंतांसह 19 जण बाधित वाशिम ः प्रतिनिधीपूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे वादात सापडलेले वनमंत्री संजय राठोड यांनी पोहरादेवी येथे केलेल्या शक्तिप्रदर्शनाचे परिणाम आता दिसू लागलेत. राठोड यांच्या शक्तिप्रदर्शनानंतर सेवालाल ट्रस्टचे अध्यक्ष महंत कबीरदास यांच्यासह गावातील 19 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. राठोड यांच्या शक्तिप्रदर्शनाच्या काही दिवसांनंतर लगेच गावातील कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याने …

Read More »

शेकापचे माजी उपसरपंच काशिनाथ गोंधळी भाजपत

पनवेल ः रामप्रहर वृत्तशेकापचे खेरणे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच काशिनाथ नामा गोंधळी यांनी शुक्रवारी (दि. 26) भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर पक्षप्रवेश केला आहे. या वेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी पक्षाची शाल देऊन त्यांचे पक्षात स्वागत केले. काशिनाथ नामा गोंधळी यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने पक्षाची ताकद आणखीन वाढणार …

Read More »

‘डब्ल्यूएचओ’ने मानले पंतप्रधान मोदींचे आभार

लस समानतेला दिलेल्या समर्थनाचे कौतुक नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाभारताने लस वितरण मोहिमेंतर्गत 60पेक्षा अधिक देशांत लस पोहचवण्याचे निश्चित केले आहे. नेपाळ, बांगलादेश, भूतान व इतर शेजारी देशच नाही, तर भारत सरकारने पश्चिम आशिया, आफ्रिका व लॅटिन अमेरिकेसह पश्चिमेकडील देशांनाही लस पाठविली. जागतिक आरोग्य संघटनेचे (डब्ल्यूएचओ) महासंचालक टेड्रॉस अधानॉम घेबेरियसस यांनी …

Read More »

वनमंत्री संजय राठोडांच्या राजीनाम्यासाठी मुख्यमंत्र्यांवर स्वकियांचा दबाव

मुंबई ः प्रतिनिधीपूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी एकीकडे भाजप वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्यासाठी आग्रही असतानाच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर स्वकियांचाही दबाव वाढताना दिसत आहे. विदर्भातील शिवसेना लोकप्रतिनिधी आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटणार असल्याची माहिती मिळत आहे. 1 मार्चपासून विधिमंडळाचे अधिवेशन सुरू होत आहे. त्याआधी वनमंत्री राठोडांचा राजीनामा घेण्यासाठी आता भाजपसह …

Read More »

सभागृह परेश ठाकूर यांच्याकडून पनवेलमधील विविध कामांची पाहणी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महापालिका हद्दीत सुरू असलेल्या विविध कामांची सभागृह नेते परेश ठाकूर यांनी गुरुवारी (दि. 25) पाहणी केली आणि अधिकार्‍यांना आवश्यक त्या सूचना केल्या.  पनवेल कोळीवाडा येथील पकटीजवळ महापालिकेच्या माध्यमातून शौचालय बांधण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक 19मधील गुजराथी स्मशानभूमीचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर सभागृह नेते …

Read More »

रायगड जिल्ह्यात जमावबंदी लागू

अलिबाग : प्रतिनिधीराज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढीस लागला असून, रायगड जिल्ह्यातही कोरोनाबाधितांची संख्या वाढण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे प्रशासनाकडून जिल्ह्यात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. कोरोनाविषयक नियमांचे उल्लघन करणार्‍यांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.जिल्ह्याधिकारी निधी चौधरी यांनी जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणांना कोरोनासंदर्भात उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. सार्वजनिक ठिकाणी …

Read More »

नथुराम गोडसे समर्थकाचा काँग्रेसमध्ये प्रवेश

भोपाळ : वृत्तसंस्थामहात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेचा संदेश लोकांपर्यंत पोहचवण्याची शपथ घेणार्‍या नेत्याने काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. माजी नगरसेवक बाबुलाल चौरसिया याच्या या पक्षप्रवेशासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व माजी मुख्यमंत्री कमलनाथ उपस्थित होते.बाबुलाल चौरसिया यांनी याआधी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत हिंदू महासभेकडून पालिका निवडणूक लढत जिंकली होती. काँग्रेसने मात्र राहुल गांधींचा …

Read More »