Breaking News

Ramprahar Reporters

ऑस्ट्रेलियाच्या कर्णधाराला दंड

दुबई : वृत्तसंस्थासिडनी येथे तिसर्‍या कसोटी सामन्यात पंचाशी हुज्जत घातल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेन याला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) दंड ठोठावला आहे. तिसर्‍या दिवशी पंचाशी हुज्जत घातल्याप्रकरणी दोषी आढळल्यानंतर पेनवर कारवाई करण्यात आली आहे. सामन्याच्या मानधनातून 15 टक्के रक्कम कपात करण्याचा दंड पेनला करण्यात आला आहे.ऑस्ट्रेलियन कर्णधार टीम पेन आंतरराष्ट्रीय …

Read More »

सेहवागकडून पाँटिंग गुरुजी ट्रोल

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आणि समालोचक रिकी पाँटिंगला भारतीय चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. अनेक नेटकर्‍यांनी पाँटिंगच्या वक्तव्यानंतर त्याला ट्रोल करीत टीकास्त्र सोडले. यामध्ये भारताचे माजी खेळाडू वीरेंद्र सेहवाग आणि वासिम जाफर यांचाही समावेश आहे. चौथ्या डावात भारतीय फलंदाज 200 धावाही करू शकणार नाही, असे वक्तव्य पाँटिंगने …

Read More »

चेतेश्वर पुजारा बनला सहा हजारी मनसबदार

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाबॉर्डर-गावसकर मालिकेतील सिडनी कसोटी सामन्यात चेतेश्वर पुजाराने कसोटीत सहा हजार धावांचा पल्ला पार केला आहे. अशी कामगिरी करणारा पुजारा भारताचा 11वा फलंदाज ठरला आहे.तिसर्‍या कसोटीच्या पाचव्या दिवशी नॅथन लायनच्या चेंडूवर एक धाव घेत पुजाराने सहा हजार धावा पूर्ण केल्या. सिडनी कसोटीत पुजाराने निर्णायक क्षणी 77 धावांची खेळी …

Read More »

सिडनी कसोटी अनिर्णीत

ऑस्ट्रेलियाविरुद्ध विहारी-अश्विनची चिवट फलंदाजी सिडनी : वृत्तसंस्थादुखापतीनंतर एखाद्या योद्ध्याप्रमाणे मैदानावर तग धरून हनुमा विहारी आणि रविचंद्रन अश्विन यांनी तब्बल 259 चेंडू खेळून काढून तिसरी कसोटी अनिर्णीत राखत बॉर्डर गावसकर मालिका 1-1 अशी बरोबरीत सोडली आहे. विहारी-अश्विन दोघेही फलंदाजी करताना दुखापतग्रस्त झाले होते. अशा परिस्थितीतही दोघांनी संयमी फलंदाजी करीत सामना वाचवला. …

Read More »

कोरोनावरील भारतीय लशींना जगभरातून मागणी

नवी दिल्ली : वृत्तसंस्थादेशामध्ये करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीच्या आपतकालीन वापराला परवानगी देण्यात आल्यानंतर संपूर्ण जगाचे लक्ष भारताकडे लागले आहे. जगातील अनेक देशांनी भारताकडे या संपूर्णपणे स्वदेशी बनावटीच्या लसीची मागणी केली आहे.ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जैर बोलसोनारो यांनी तर पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून भारताने ब्राझिलला अ‍ॅस्ट्रॉझेनेकाच्या लसीचा तत्काळ पुरवठा करावा, अशी मागणी …

Read More »

महाराष्ट्रात चाललंय काय…धावत्या बसमध्ये तरुणीवर बलात्कार

नागपूर : प्रतिनिधीगोंदियावरून पुण्याला निघालेल्या एका तरुणीवर खासगी बसच्या क्लिनरने धावत्या बसमध्ये बलात्कार केल्याची खळबळजनक घटना वाशिमजवळच्या मालेगावनजीक घडली. पीडित तरुणीने पुणे पोलिसांकडे तक्रार नोंदविली असून, पोलिसांनी प्रकरण मालेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असल्यामुळे तपासासाठी मालेगाव पोलिसांकडे पाठविले आहे. मालेगाव पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.या घटनेचे सविस्तर वृत्त असे की, …

Read More »

आम्ही सुरक्षेशिवाय फिरणारे लोक -फडणवीस

लोणावळा : प्रतिनिधीसुरक्षा काढणे किंवा ठेवणे यामुळे आमच्यावर काही परिणाम होत नाही. आम्हाला त्याची काही चिंता नाही. आम्ही सुरक्षेशिवाय फिरणारे लोक आहोत. आहे तेवढी सुरक्षा पुरेशी आहे व ती ठेवली नाही तरीदेखील आम्हाला काही अडचण नाही, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (दि. 11) येथे आयोजित पत्रकार परिषदेत म्हटले.विधानसभेतील …

Read More »

पनवेल बस आगाराच्या नुतनीकरणास लवकरात लवकर सुरुवात करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची परिवहनमंत्र्यांकडे मागणीकाम सुरू न केल्यास आंदोलनाचा इशारा पनवेल : रामप्रहर वृत्तराज्य परिवहन महामंडळाच्या पनवेल येथील बस आगाराच्या नुतनीकरणाच्या कामाला लवकरात लवकर सुरुवात करावी, अशी मागणी भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांच्याकडे केली आहे तसेच हे काम सुरू न …

Read More »

राज्यात बर्ड फ्लूचा शिरकाव

परभणीतील मृत कोंबड्यांच्या अहवालातून स्पष्ट मुंबई : प्रतिनिधीदेशातील इतर राज्यांपाठोपाठ महाराष्ट्रातही बर्ड फ्लूचा शिरकाव झाला आहे. परभणी जिल्ह्यात 800 कोंबड्यांचा झालेला मृत्यू हा बर्ड फ्लूमुळेच झाला असल्याचे प्रयोगशाळेने दिलेल्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. मुरूंबा येथे ही घटना घडली असून, परभणीचे जिल्हाधिकारी डी. एम. मुंगळीकर यांनी याबाबत माहिती दिली.देशातील सहा राज्यांमध्ये …

Read More »

‘पहिल्या तीन कोटी लोकांच्या लसीकरणाचा खर्च केंद्र सरकार करणार’

नवी दिल्ली ः देशामध्ये कोरोना लसीकरण मोहिमेला येत्या 16 जानेवारीपासून प्रारंभ होणार असल्याचे केंद्र सरकारने जाहीर केले आहे. देशातील कोरोना साथीची स्थिती, मोहिमेची पूर्वतयारी अशा सर्व गोष्टींचा आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी एका उच्चस्तरीय बैठकीत घेतला. कोविशिल्ड, कोवॅक्सिन या लशींच्या आपत्कालीन वापराला औषध महानियंत्रकांनी मंजुरी दिल्यानंतर काही दिवसांतच मोहीम …

Read More »