Breaking News

Ramprahar Reporters

शेतकर्यांना महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन

पनवेल : रामप्रहर वृत्त – महाडीबीटी पोर्टलवर शेतकरी योजना या सदराखाली  शेतकर्‍यांच्या सोईकरिता सर्व योजनांचा लाभ अर्ज एक योजना अनेक या एकाच अर्जाद्वारे देण्याच्या दृष्टीने अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत एकात्मिक संघनिय प्रणाली कृषी विभागाने  विकसित केलेली आहे. या प्रणालीद्वारे शेतकर्‍यांना त्याच्या पसंतीच्या निवडीचे स्वतंत्र देण्यात आले असून शेतकर्‍यांनी …

Read More »

फार्महाऊसमधील पाटर्यांवर निर्बंध

घरमालकांना पोलिसांनी दिल्या सुचना पनवेल : रामप्रहर वृत्त – पनवेल तालुक्यातील फार्महाऊस (शेतघर)वर नवीन वर्षाच्या स्वागतासाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाटर्यांचे आयोजन केले जाते. यावर्षी कोरोनामुळे फार्महाऊसवर गर्दी होऊ नये व नियमांचे पालन व्हावे यासाठी पोलीस लक्ष ठेवून राहणार आहेत. त्यामुळे फार्महाऊस मालकांसोबत बैठका घेत याबाबतच्या सूचना पोलिसांकडून देण्यात आल्या आहेत. …

Read More »

रायगडातही नाइट कर्फ्यू

अलिबाग : पर्यटकांची वाढती संख्या आणि कोरोना विषाणूचा नवा प्रकार लक्षात घेऊन रायगड जिल्ह्यातही रात्रीची संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली. त्याचबरोबर कोरोना नियमांचे उल्लंघन करणार्‍या हॉटेल, रेस्टोरंट व रिसोर्ट्सवर सात दिवसांच्या बंदीची कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. येत्या रविवारी जंजिरा …

Read More »

मालमत्ता करासंदर्भात कामोठ्यात बैठक

पनवेल : रामप्रहर वृत्त  मालमत्ता करविषयक नागरिकांच्या समस्यांसंदर्भात पनवेल महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी कामोठे येथील सुषमा पाटील विद्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी रहिवाशांना असलेल्या शंकांचे लोकप्रतिनिधी व अधिकार्‍यांनी निरसन केले तसेच मालमत्ता कर कमी करण्याच्या दृष्टीने चर्चा केली जाईल, असे सांगण्यात आले.या …

Read More »

‘सीकेटी’च्या दीक्षाची जागतिक भरारी

लघुपटाला इंटरनॅशनल सायन्स फिल्म फेस्टिवलमध्ये नामांकन पनवेल : रामप्रहर वृत्तकेंद्र सरकारचा माहिती व तंत्रज्ञान विभाग, पृथ्वी विज्ञान मंत्रालय आणि आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालय यांनी आयोजित केलेल्या इंटरनॅशनल सायन्स फिल्म फेस्टिवलमध्ये जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी दीक्षा …

Read More »

मागण्या मान्य झाल्याशिवाय अंत्यसंस्कार नाही!

रिलायन्स प्रकल्पग्रस्त तरुणाच्या मृत्यूनंतर आंदोलनकर्ते संतप्त नागोठणे : प्रतिनिधीयेथील रिलायन्स कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन सुरू असताना सोमवारी दुपारी जगदिश वारगुडे या प्रकल्पग्रस्त तरुणाचा अकाली मृत्यू झाला. त्यानंतर आंदोलनकर्ते संतप्त झाले असून, आमच्या मागण्या कंपनी जोपर्यंत ऐकून घेत मान्य करीत नाही तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जाणार नाही, असा पवित्रा लोकशासन आंदोलन …

Read More »

खालापुरात दुय्यम निबंधक लाच घेताना रंगेहाथ जाळ्यात

खोपोली, खालापूर : प्रतिनिधीदस्तऐवज नोंदणीकामी लाचेचा पहिला हप्ता एक लाख रुपये घेताना खालापूर दुय्यम निबंधक सुरेंद्र शिवराम गुप्ते (वय 53, सध्या रा. कर्जत, मूळ  नाशिक) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रायगडच्या पथकाने रंगेहाथ पकडले. या घटनेमुळे खालापूर तालुक्यात खळबळ उडाली आहे.बांधकाम व्यावसायिक किशोर बाफना यांनी खालापूर तालुक्यातील खरिवली व नंदनपाडा भागात …

Read More »

काश्मीरमध्ये ’कमळ’ उमलले

जिल्हा निवडणुकीत तीन जागांवर विजय श्रीनगर : वृत्तसंस्थाएकवेळ अशी होती की काश्मीरमध्ये भारतीय जनता पक्षाचे अस्तित्वच नव्हते. आज त्याच काश्मीर खोर्‍यात ’कमळ’ उमलले आहे. भाजपने जिल्हा विकास परिषदेच्या निवडणुकीत (डीडीसी) नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपीसारख्या स्थानिक बलाढ्य पक्षांना धूळ चारत विजयाचे खाते उघडले आहे.भाजपच्या ऐजाज हुसैन यांनी श्रीनगरच्या खोंमोह-2 आणि ऐजाज …

Read More »

नवा कोरोना विषाणू  :केंद्र सरकारकडून नियमावली जाहीर

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाब्रिटनमध्ये आढळलेल्या नव्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. नव्या नियमानुसार यूकेहून येणार्‍या प्रवाशांपैकी नव्या कोरोना स्ट्रेनसहीत संक्रमित आढळलेल्या रुग्णांना वेगळ्या आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात येणार आहे. याशिवाय कोरोना संक्रमित आढळलेल्या सह-प्रवाशांना इन्स्टिट्युशनल क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात येईल. सरकारने कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता …

Read More »

पंतप्रधान मोदींचा लीजन ऑफ मेरीट पुरस्काराने सन्मान

वॉशिंग्टन : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून लीजन ऑफ मेरीट अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे. भारत आणि अमेरिकेतील भागिदारी आणि व्यवहार्यपूर्ण संबंधांतील वृद्धीसाठी केलेल्या नेतृत्वामुळे पंतप्रधान मोदींचा गौरव करण्यात आला. कोरोनामुळे पंतप्रधान मोदींचा विदेश दौरा शक्य नसल्याने अमेरिकेतील भारतीय राजदूत संधू तरनजीत यांनी पुरस्कार स्वीकारला. …

Read More »