कन्नड (औरंगाबाद) : प्रतिनिधीमराठवाडा पदवीधर निवडणूक नियोजनासंदर्भात शहरातील चारही बुथचा आढावा घेण्यासाठी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी (दि. 26) कन्नड येथील साने गुरुजी महाविद्यालय येथे बैठक झाली. भारतीय संविधान दिनानिमित्त या वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व संविधान प्रतिमेचे त्यांनी पूजन केले. त्याचप्रमाणे कर्मवीर काकासाहेब …
Read More »आंतरराष्ट्रीय विमानसेवा 31 डिसेंबरपर्यंत बंदच
नवी दिल्ली : वृत्तसंस्थाआंतरराष्ट्रीय विमानसेवा 31 डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) घेतला आहे. यापूर्वी आंतरराष्ट्रीय विमानसेवा 30 नोव्हेंबरपर्यंत बंद राहणार असे जाहीर करण्यात आले होते, पण कोरोना विषाणूचा वाढता प्रसार पाहता सेवा सुरू करण्याचा कालावधी वाढवण्यात आला आहे.‘डीजीसीए’ने परिपत्रक जारी करून याबाबत आदेश दिले आहेत, मात्र …
Read More »नव्या कृषी कायद्यांमध्ये बदल होणार नाही!
केंद्र सरकारची स्पष्टोक्ती नवी दिल्ली : वृत्तसंस्थाकेंद्र सरकार नवे कृषी कायदे मागे घेणार नाही. हे तिन्ही कायदे शेतकर्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून करण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकर्यांना त्यांच्या उत्पादनांना योग्य भाव मिळण्यास तसेच कृषी क्षेत्रात गुंतवणूक वाढण्यास मदत होणार आहे. म्हणून या कायद्यांमध्ये बदल करण्याचा प्रश्नच नाही, अशी केंद्र सरकारची स्पष्ट …
Read More »भाजपपाठोपाठ मनसेचा ‘शॉक’
वाढीव वीज बिलाविरोधात धडकले मोर्चे मुंबई : प्रतिनिधीकोरोना काळातील वीज बिलवाढीविरोधात राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असणार्या भाजपच्या आंदोलनानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून राज्यभरात गुरुवारी (दि. 26) जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चे काढण्यात आले. मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, औरंगाबाद अशा अनेक प्रमुख शहरांमध्ये मनसेचे कार्यकर्ते वीज बिलमाफीची मागणी करीत रस्त्यावर उतरले. यासंबंधी जिल्हाधिकार्यांना निवेदन …
Read More »देशाला `वन नेशन, वन इलेक्शन`ची गरज
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुनरूच्चार; संविधान दिनानिमित्त जनतेला शुभेच्छा नवी दिल्ली : वृत्तसंस्थादेशाच्या प्रगतीसाठी ’वन नेशन, वन इलेक्शन’ची गरज असल्याचा पुनरूच्चार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला आहे.संविधान दिनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी गुरुवारी (दि. 25) अखिल भारतीय पीठासीन अधिकार्यांच्या संमेलनाला संबोधित केले. या वेळी त्यांनी ’वन नेशन, वन इलेक्शन’बद्दल गांभीर्याने विचारमंथन आवश्यक असल्याचे …
Read More »रायगडात 166 नवे कोरोना पॉझिटिव्ह ; एका रुग्णाचा मृत्यू
पनवेल ः रामप्रहर वृत्तदिवाळीनंतर रायगड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली असून, बुधवारी (दि. 25) नवे 166 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून, एका जणाच्या मृत्यूची नोंद झाली, तर दिवसभरात 115 रुग्ण बरे झाले आहेत.पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 119 व ग्रामीण 21) तालुक्यातील 140, अलिबाग नऊ, पेण सात, कर्जत तीन, महाड …
Read More »पनवेल मनपा स्थायी समितीची ऑनलाइन सभा
विविध विषयांना चर्चेअंती मंजुरी पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महापालिकेच्या स्थायी समितीची सभा बुधवारी (दि. 25) आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आयोजित करण्यात आली होती. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर ही सभा ऑनलाइन पद्धतीने नवनिर्वाचित सभापती संतोष शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या सभेत विविध विषयांवर चर्चा करून त्यांना मंजुरी देण्यात आली.स्थायी समितीच्या …
Read More »मराठा समाजाबाबत राज्य सरकार उदासीन
आमदार विनायक मेटे यांचा आरोप पेण : प्रतिनिधीमराठा आरक्षणासाठी अशोक चव्हाण समितीने समाजाच्या दृष्टिकोनातून चांगल्या प्रकारे समन्वयता दाखविली नाही तसेच न्यायालयातही व्यवस्थित बाजू मांडली नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावर अंतरिम स्थगिती दिली आणि मराठा मुला-मुलींचे भविष्य अंधारमय झाले आहे. हे पाप महाविकास आघाडी सरकारचे असून, सरकारच्या फसव्या धोरणांमुळे समाजावर …
Read More »महाडमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याला मारताना आजोबांचा नेम चुकला
बंदुकीच्या गोळीने नातू जखमी महाड : प्रतिनिधीपिसाळलेल्या कुत्र्याला मारताना आजोबांच्या बंदुकीतून सुटलेली गोळी नातवाच्या लागल्याने तो जखमी झाल्याची घटना महाड तालुक्यातील कोकरे गावात घडली आहे. कविराज साळवी (वय 31) असे जखमी तरुणाचे नाव असून, सुदैवाने तो वाचला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.गेल्या काही दिवसांपासून महाड तालुक्यातील कोकरे गावातील एक …
Read More »महाराष्ट्र सरकार म्हणजे पलटूराम सरकार : देवेंद्र फडणवीस
पुणे : प्रतिनिधीमहाराष्ट्र सरकार रोज घोषणा करते आणि मागे जाते. म्हणून हे पलटूराम सरकार आहे. रोज आश्वासन देतात, मात्र त्या आश्वासनावर टिकून राहात नाहीत. गेल्या वर्षभरात राज्यातील चालू कामांना या सरकारने स्थगिती दिली. महाराष्ट्र स्थगित केला, बंद पाडला. यापेक्षा कुठलेही कर्तृत्व या सरकारचे नाही, अशी घणाघाती टीका माजी मुख्यमंत्री तथा …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper