Breaking News

Ramprahar Reporters

‘कृषी कायद्यांबद्दल शेतकर्‍यांची दिशाभूल केली जातेय’

वाराणसी : कृषी सुधारणांमुळे शेतकर्‍यांना नवे पर्याय उपलब्ध झाले आहेत, मात्र काही जण शेतकर्‍यांची दिशाभूल करण्यासाठी अफवा पसरवत आहेत. ज्यांनी शेतकर्‍यांचा छळ केला, तेच आता शेतकर्‍यांच्या मनात संभ्रम निर्माण करीत आहेत, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी (दि. 30) येथे अप्रत्यक्षपणे विरोधकांना लक्ष्य केले. ते पुढे म्हणाले, सरकारे कायदे तयार …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांचा मराठवाडा दौरा

कन्नड (औरंगाबाद) : मराठवाडा पदवीधर निवडणुकीच्या नियोजनासंदर्भात भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारार्थ भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी कन्नड तालुक्यातील बुथप्रमुख, पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासमवेत बैठका घेऊन निवडणूक नियोजनाचा आढावा घेतला. 

Read More »

क्रीडापटूंसाठी परेश ठाकूर सरसावले

कळंबोली : कळंबोली-रोडपाली येथील खेळाडूंसाठी असलेले मैदान खेळण्याजोगे राहिले नव्हते. या मैदानावर कचरा, मातीचे ढिगारे पडले असल्याने खेळाडूंनी याबाबत स्थानिक नगरसेवक अमर पाटील यांचे लक्ष वेधले. पाटील यांनी ही बाब सभागृह नेते परेश ठाकूर यांना सांगताच त्यांनी तत्परतेने पाहणी करून मैदान विकसित करण्याचे आश्वासन दिले. या वेळी स्थायी समिती सभापती …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी दिल्या शुभेच्छा

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील गव्हाण विभागात असणार्‍या बेलपाडा येथील भारतीय जनता पक्षाची कार्यकारिणी तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी जाहीर केली आहे. नवनियुक्त पदाधिकार्‍यांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची भेट घेतली. या वेळी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.या कार्यकारिणीत अध्यक्षपदी गणेश नामदेव पाटील, सरचिटणीसपदी मधुकर उद्धव …

Read More »

खालापुरात अल्पवयीन आदिवासी मुलीवर बलात्कार; आरोपी फरार

खालापूर : खालापूर तालुक्यातील कुंभिवली आदिवासी वाडीत राहणार्‍या एका 13 वर्षीय मुलीवर अनोळखी इसमाने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाला असून, खालापूर पोलीस व गुन्हे अन्वेषण शाखा अलिबाग यांची पथके या नराधमाचा शोध घेत आहेत.कुंभिवली आदिवासी वाडीतील अल्पवयीन मुलगी कपडे धुण्यासाठी पाताळगंगा नदीजवळ रोजी रुबी कंपनीच्या …

Read More »

डॉ. शीतल आमटे यांची आत्महत्या

अमरावती : प्रतिनिधीज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आमटे यांची नात, डॉ. विकास आमटे यांची कन्या आणि महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे-करजगी यांनी आत्महत्या केली आहे. त्यांनी मानसिक तणावातून आनंदवन येथील राहत्या घरी सोमवारी (दि. 30)सकाळी विषारी इंजेक्शन टोचून घेत जीवनयात्रा संपविली. वरोरा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले असता, …

Read More »

महाविकास आघाडी सरकार नशिबी येणे महाराष्ट्राचे दुर्दैव

आमदार निरंजन डावखरे व आमदार महेश बालदी यांची टीका पनवेल : रामप्रहर वृत्तमहिलांवरील वाढते अत्याचार, अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना अपुरी मदत, मराठा आरक्षणाचा झालेला खेळखंडोबा, वाढीव वीज बिल, कोरोना स्थिती हाताळण्यात आलेले अपयश पाहता महाविकास आघाडी सरकार नशिबी येणे हे महाराष्ट्राच्या जनतेचे मोठे दुर्दैव आहे, असे प्रतिपादन आमदार निरंजन डावखरे …

Read More »

आमदार रविशेठ पाटील यांचा रिलायन्स प्रकल्पग्रस्तांना पाठिंबा; आंदोलनस्थळी दिली भेट

नागोठणे : प्रतिनिधीरिलायन्स प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या रास्त आहेत. लोकप्रतिनिधी म्हणून मी तुमच्या पाठीशी आहे, अशी ग्वाही आमदार रविशेठ पाटील यांनी शनिवारी (दि. 28) नागोठणे येथे दिली.आपल्या विविध प्रलंबित मागण्यांची तड लावण्यासाठी येथील रिलायन्स (पूर्वीची आयपीसीएल) प्रकल्पग्रस्तांनी लोकशासन आंदोलन संघर्ष संघटनेच्या माध्यमातून शुक्रवार (दि. 27)पासून कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन सुरू केले आहे. शनिवारी …

Read More »

राज्य शासनाकडून अनुदान थकल्याने ग्रंथालयांची आर्थिक कोंडी

अलिबाग : प्रतिनिधीशासनाकडून मिळणारे अनुदान थकल्याने राज्यातील ग्रंथालयांची आर्थिक कोंडी झाली आहे. ग्रंथालय कर्मचार्‍यांचे वेतन थकल्याने कर्मचार्‍यांवर उपासमारीची वेळ आली आहे. लॉकडाऊनमुळे सहा महिन्यांपासून ग्रंथालये बंद होती. आता ग्रंथालये खुली झाली असली तरी त्यांच्या समोरील आर्थिक विवंचना संपण्याची चिन्हे दिसून येत नाहीत.करोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यापासून राज्यातील ग्रंथालये बंद झाली. त्यामुळे …

Read More »

ओबीसी समन्वय समितीकडून तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन

कर्जत : बातमीदार‘ओबीसी संघर्षवारी, आमदारांच्या दारी‘ या उपक्रमांतर्गत ओबीसी संघर्ष समन्वय समितीच्या वतीने स्थानिक आमदार महेंद्र थोरवे आणि तहसीलदारांना ओबीसींच्या जणगणना व आरक्षण अशा विविध मागण्यांसंदर्भात निवेदने देण्यात आली. या वेळी ओबीसी प्रवर्गातील विविध जातींच्या संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.कर्जत तालुका आगरी समाज अध्यक्ष सावळाराम जाधव, नाभिक समाज अध्यक्ष दिलीप शिंदे, …

Read More »