Breaking News

Ramprahar Reporters

राज्यातील मंत्र्यांची बदल्यांमधून प्रचंड कमाई

सीआयडी चौकशीची चंद्रकांत पाटील यांची मागणी मुंबई : प्रतिनिधीराज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांनी 15 टक्के बदल्यांच्या नावाखाली अनेक मलाईदार ठिकाणी मर्जीतील अधिकार्‍यांच्या बदल्या करून प्रचंड पैसा गोळा केला आहे, असा आरोप भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे तसेच याची सीआयडीकडून चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.पाटील म्हणाले, उपमुख्यमंत्री …

Read More »

प्रामाणिक करदात्यांसाठी मोदी सरकारचे महत्त्वपूर्ण पाऊल

नवी करप्रणाली जाहीर नवी दिल्ली : वृत्तसंस्थाप्रामाणिक करदात्यांसाठी मोदी सरकारने मोठे पाऊल उचलत नवी करप्रणाली जाहीर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या ‘पारदर्शी कर आकारणी : प्रामाणिकतेचा सन्मान’ व्यासपीठाचे लोकार्पण गुरुवारी (दि. 13) करण्यात आले. या नव्या व्यासपीठामुळे नियमित कर भरणार्‍यांच्या मनातील भीती दूर होईल, असा विश्वास पंतप्रधान …

Read More »

रायगडात 376 नवे रुग्ण; आठ जणांचा मृत्यू  

पनवेल : रायगड जिल्ह्यात 376 कोरोना रुग्णांची नोंद मंगळवारी (दि. 11) झाली असून, आठ जणांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे दिवसभरात 291 रुग्ण बरे झाले. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (महापालिका 179, ग्रामीण 26) तालुक्यात 205, अलिबाग 41, पेण 33, उरण 25, खालापूर 20, रोहा 12, माणगाव नऊ, कर्जत व महाड प्रत्येकी …

Read More »

अवाजवी वीज बिल वाढीची मनसेने नवी मुंबईत फोडली हंडी

नवी मुंबई : बातमीदारलॉकडाऊनमुळे आर्थिक स्थिती बिकट असताना ग्राहकांना अवाजवी बील देणार्‍या महावितरणच्या नवी मुंबईतील कार्यालयात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी (दि. 11) तोडफोड केली. मनसेच्या कार्यकर्त्यांनी वाशी सेक्टर 17 मधील कार्यालयात घुसून प्रवेशद्वारावर खळ्ळ् खट्याक केले. लॉकडाऊनच्या काळात महावितरणकडून नागरिकांना वाढीव बिले देण्यात आली आहेत. सर्व ग्राहकांना अंदाजे आणि …

Read More »

बंदुकीसह जिवंत काडतुसाची तस्करी करणारे त्रिकूट गजाआड

अलिबाग : प्रतिनिधी गावठी बनावटीच्या बंदूकीसह चार जिवंत काडतुसांची बेकायदेशीररित्या तस्करी करणार्‍या त्रिकुटाला अलिबाग पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अलिबाग-पेण मार्गावरील पिंपळभाट परिसरात एक जण बंदुकीसह जिवंत काडतूस विकण्यासाठी येणार असल्याची माहिती अलिबाग पोलीस ठाण्याचे निरीक्षक के. डी. कोल्हे यांना मिळाली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली एक …

Read More »

खासगी रुग्णालयांतील लूटमार रोखण्यात राज्य सरकार अपयशी

फडणवीस, दरेकर यांचा हल्लाबोल मुंबई : प्रतिनिधीराज्यातील खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांकडून वाट्टेल तशी बिलांची आकारणी होत असून, खुलेआम सुरू असलेली ही लूटमार रोखण्यात सरकार सपशेल अपयशी ठरल्याचा दावा विधिमंडळातील विरोधी पक्षाने केला आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व विधान परिषदेचे विरोध पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सांगितले की, गेले जवळपास …

Read More »

…तर देश कोरोनाविरुद्ध जिंकेल!

पंतप्रधान मोदींचा विश्वास; मुख्यमंत्र्यांशी संवाद नवी दिल्ली : वृत्तसंस्थापंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात वाढलेल्या कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी (दि. 11) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून 10 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. सर्वाधिक कोरोना संसर्ग असलेली ही राज्ये आहेत. या राज्यांनी कोरोनाला हरवले तर देश जिंकू शकेल, असा विश्वास पंतप्रधानांनी या वेळी व्यक्त केला. …

Read More »

वडिलांच्या संपत्तीत मुलीलाही मिळणार समान वाटा

सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय नवी दिल्ली : वृत्तसंस्थावडिलांच्या संपत्तीमध्ये मुलीलाही समान वाटा मिळणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात मंगळवारी (दि. 11) ऐतिहासिक निर्णय दिला. त्यामुळे वडिलांच्या संपत्तीत मुलाप्रमाणे मुलीलाही हक्क असावा या मुद्द्यावरील वादावर आता पडदा पडला आहे. 1956मधील हिंदू वारसा हक्क कायद्यात 2005मध्ये सुधारणा करण्यात आली होती. आपल्या पित्याच्या …

Read More »

रायगडात 12 कोरोना बळी; 358 नवे पॉझिटिव्ह

पनवेल : रायगड जिल्ह्यात 12 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद सोमवारी (दि. 10) झाली असून, 385 नवे पॉझिटिव्ह आढळले आहेत. दुसरीकडे दिवसभरात 365 रुग्ण बरे झाले आहे. मृत रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील पाच, उरण तीन आणि खालापूर, पेण, अलिबाग व रोह्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे, तर पॉझिटिव्ह रुग्ण पनवेल (महापालिका 169, ग्रामीण …

Read More »

पनवेल शहर भाजप महिला मोर्चाकडून कोविड योद्ध्यांचा सन्मान

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल शहर भाजप महिला मोर्चाच्या वतीने कोविड योद्धा गौरव सन्मानपत्र रक्षाबंधनाच्या पवित्र पर्वावर देऊन कोविड योद्ध्यांना गौरविण्यात आले. पनवेल तालुका व शहर पोलीस ठाणे आणि ग्रामीण रुग्णालय येथील पोलीस, डॉक्टर, नर्स, रुग्णवाहिका चालक, सफाई कामगार आदींना या वेळी सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमास भाजप महिला मोर्चा पनवेल …

Read More »