अलिबाग : प्रतिनिधीअलिबाग तालुक्यातील बोडणी गावात कोरोनाचा समूह संसर्ग झाला आहे. त्यामुळे तेथील रुग्णांची तपासणी करण्यासाठी आरोग्य यंत्रणा, तहसीलदार, पोलीस बुधवारी (दि. 22) बोडणीमध्ये गेले असता, गावातील पॉझिटिव्ह असलेले रुग्ण तसेच इतर गावकर्यांनी या सर्वांना हाकलून लावले. ग्रामस्थ तपासणी करून घेत नसल्याने बोडणीमध्ये कोरोनाचा उद्रेक होण्याची भीती निर्माण झाली आहे.अलिबाग …
Read More »ग्रामपंचायतींवर खासगी प्रशासक नेमण्यास स्टे
मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई : प्रतिनिधीकोरोनाच्या साथीमुळे ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेणे शक्य नसल्याने त्यांना मुदतवाढ देण्याऐवजी राज्यातील 14 हजार ग्रामपंचायतींवर खासगी प्रशासक नेमण्याचा घाट राज्य सरकारने घातला होता, मात्र मुंबई उच्च न्यायालयाने त्याला स्टे दिला आहे. राज्यातील 14 हजार 314 ग्रामपंचायतींची मुदत 2020मध्ये संपत आहे, पण कोरोनाची परिस्थिती पाहता …
Read More »पीपीई किटसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून 50 लाखांचा निधी
पनवेल : रामप्रहर वृत्तकोरोना वैश्विक महामारीच्या या काळात नागरिकांना सातत्याने मदतीचा हात देणारे भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल महानगरपालिका हद्दीतील कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारार्थ पीपीई किटसाठी 50 लाख रुपयांचा आमदार निधी दिला आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून आमदार प्रशांत ठाकूर यांनी वेळोवेळच्या आपत्कालीन परिस्थितीत गोरगरीब, गरजू तसेच सर्वसामान्य नागरिकांना मदत केली …
Read More »चिंताजनक! रायगडात 15 रुग्णांचा मृत्यू; 439 नवे पॉझिटिव्ह
पनवेल : रायगड जिल्ह्यात 15 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची बुधवारी (दि. 22) नोंद झाली असून, 439 नव्या रुग्णांची भर पडली. मृत रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील आठ, खालापूर, पेण, अलिबाग प्रत्येकी दोन आणि माणगाव तालुक्यातील एकाचा समावेश आहे, तर पॉझिटिव्ह आढळलेले रुग्ण पनवेल तालुक्यात 199, खालापूर 53, पेण 42, महाड 33, अलिबाग 25, …
Read More »रायगडात 299 नवे पॉझिटिव्ह रुग्ण; नऊ जणांचा मृत्यू
पनवेल : रायगड जिल्ह्यात कोरोनाच्या 299 नव्या रुग्णांची मंगळवारी (दि. 21) नोंद झाली असून, नऊ जण मृत्युमुखी पडले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील 156 (महापालिका हद्दीतील 112 व ग्रामीणमधील 44), अलिबाग 44, खालापूर 38, पेण 18, उरण व रोहा प्रत्येकी 16, कर्जत चार, महाड तीन, मुरूड दोन आणि तळा …
Read More »खालापूरजवळ अपघातात दाम्पत्याचा जागीच मृत्यू
खालापूर : प्रतिनिधीमुंबई-पुणे महामार्गावर खालापूर तालुक्यातील कलोते गावच्या हद्दीत ट्रक आणि दुचाकीचा अपघात होऊन दुचाकीवरील पती-पत्नी जागीच मृत्युमुखी पडले. मूळचे गोवा येथील थॉमस अँथनी गोम्स व त्यांचे कुटुंब अनेक वर्षे खालापुरात वास्तव्यास आहेेत. थॉमस गोम्स (47) व त्यांची पत्नी ग्लोरी गोम्स (40) हे त्यांच्या दुचाकी (एमएच 46 एटी 2133)वरून दवाखान्यात …
Read More »आजपासून पनवेल होणार अनलॉक
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणीला यश पनवेल : प्रतिनिधीपनवेल महानगरपालिका क्षेत्रातील लॉकडाऊन हटविण्यासंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणीला यश आले आहे. क्लस्टर कंटेन्मेंट झोन व कंटेन्मेंट झोन वगळून लॉकडाऊन संपुष्टात आणण्याचे आदेश मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांनी जारी केले आहेत. पनवेल महापालिका क्षेत्रातील लॉकडाऊन हटवून जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी तातडीने पावले …
Read More »दि. बा. पाटील सर्वपक्षीय संघर्ष समितीचा सिडको मास हाऊसिंगला तीव्र विरोध
पनवेल : रामप्रहर वृत्तखारकोपर, कामोठे, बामणडोंगरी व तळोजा येथील रेल्वेस्थानकांसमोरील नियोजित पार्किंग जागा व मैदानावर सिडकोने जबरदस्तीने पंतप्रधान आवास योजना राबविण्याचे कट-कारस्थान रचले आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या दि. बा. पाटील सर्वपक्षीय संघर्ष समितीच्या नेत्यांनी त्यास समितीचे अध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली तीव्र विरोध दर्शविला आहे.या संदर्भात सोमवारी …
Read More »एक धागा शौर्याचा, एक धागा रक्षणाचा!
कामोठ्यातील महिला मंचकडून सैनिकांना राख्या पनवेल : प्रतिनिधीदेशाच्या रक्षणासाठी सैनिक सीमेवर त्वेषाने लढतात. त्यांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. प्रसंगी वीरमरण पत्करावे लागते. या सैनिकांचे मनोधैर्य वाढावे तसेच नागरिकांमध्ये देशभक्ती रुजायला हवी, यासाठी कामोठे येथील दिशा महिला मंच व्यासपीठातील महिलांनी रक्षाबंधनच्या पार्श्वभूमीवर राख्या तयार करून त्या व शुभेच्छापत्र सैनिकांना पोस्टाद्वारे …
Read More »आवाहन…
A+ Blood Donation Appeal Urgently required blood for a covid-19 patient who has to undergo Plasma Therapy. The donor — should have A+ blood group — should be less than 45 years of age — should not have diabetes — has to be a Covid-19 survivor who has completed 28 …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper