Breaking News

Ramprahar Reporters

‘तरुणांनो, नवे कौशल्य आत्मसात करा!’

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाकोरोनाच्या या संकटकाळात अनेक गोष्टी बदलल्या आहेत. बदलत्या तंत्रज्ञानाचा प्रभाव त्यावरही दिसतोय. तरुणांनी प्रत्येक दिवशी नवे कौशल्य (स्कील) शिकणे गरजेचे आहे. हीच आता काळाची गरज आहे. कौशल्यामध्ये फार मोठी ताकद आहे जी माणसाला कुठल्या कुठे पोहोचवू शकते, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (दि. 15) केले. …

Read More »

पनवेल लायन्स क्लबकडून मनपाला पीपीई किट सुपूर्द

पनवेल : वार्ताहरपनवेल परिसरातील कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन लायन्स क्लब ऑफ पनवेलच्या वतीने महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे 200 पीपीई किट सुपूर्द करण्यात आले. लायन्स क्लब सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून कार्यरत असतो. याच अनुषंगाने पीपीई कीट देण्यात आले. या वेळी लायन्स क्लबच्या अध्यक्ष भावना राजेंद्र जेसवानी, संजय गोडसे, सुनिता गोडसे, …

Read More »

मराठा आरक्षणावर तुर्तास अंतरिम आदेश नाही

27 जुलैपासून नियमित सुनावणी मुंबई : प्रतिनिधीमराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाकडून तुर्तास कोणताही अंतरिम आदेश अथवा वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली नाही. आता या संदर्भात 27 जुलैपासून नियमित सुनावणी होणार आहे. राज्य सरकारच्या मराठा आरक्षण आणि वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश परीक्षेच्या निर्णयावर बुधवारी (दि. 15) व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुनावणी झाली. सर्वोच्च …

Read More »

रायगडात 290 नवे पॉझिटिव्ह रुग्ण; तीन जणांचा मृत्यू

पनवेल : रायगड जिल्ह्यात कोरोनाच्या 290 नव्या रुग्णांची मंगळवारी (दि. 14) नोंद झाली असून, पाच जण मृत्युमुखी पडले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील 216 (महापालिका हद्दीतील 175, ग्रामीणमधील 41), अलिबाग 23, खालापूर 15, रोहा 11, उरण नऊ, कर्जत व म्हसळा प्रत्येकी पाच, पेण तीन, महाड दोन आणि श्रीवर्धन तालुक्यातील …

Read More »

काँग्रेसने सचिन पायलट यांना, तर पायलटांनी थेट काँग्रेसलाच हटविले

जयपूर : वृत्तसंस्थाकाँग्रेसने सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षपदावरून हटविले आहे. पायलट यांच्यासोबतच त्यांच्या समर्थक दोन मंत्र्यांनाही मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला आहे. काँग्रेसच्या या कृतीला पायलट यांनीही प्रत्युत्तर देत सोशल मीडियाच्या आपल्या प्रोफाईलवरुन काँग्रेसचा उल्लेख हटवला आहे. काँग्रेस विधिमंडळ पक्षाची मंगळवारी पुन्हा जयपूरमध्ये बैठक झाली. या बैठकीलाही सचिन पायलट यांच्यासह …

Read More »

अलिबागच्या शर्विका म्हात्रेचा गौरव

आशिया बुक ऑफ रेकॉर्डकडून ग्रँड मास्टर किताब अलिबाग : प्रतिनिधीवयाच्या अडीच वर्षांतच भारतातील सर्वांत लहान गिर्यारोहक म्हणून आपले आणि संपूर्ण महाराष्ट्राचे नाव इंडिया ुक ऑफ रेकॉर्डमध्ये सुवर्ण अक्षरांनी कोरलेल्या अलिबाग तालुक्यातील लोणारे गावातील शर्विका म्हात्रे हिच्या कामगिरीची आता आशिया खंडात नोंद झाली आहे. आशिया बुक ऑफ रेकॉर्डने तिला ग्रँड मास्टर …

Read More »

खोपोलीत कंपनीमध्ये भीषण स्फोट

दोन कामगारांचा मृत्यू, एक जण गंभीर जखमी खोपोली, खालापूर : प्रतिनिधीयेथील इंडिया स्टील या कारखान्यात मंगळवारी (दि. 14) मध्यरात्री गॅस टँकचा भीषण स्फोट होऊन दोन कामगार जागीच ठार झाले, तर एक जण गंभीर जखमी झाला असून, त्याला कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  दिनेश वामन चव्हाण (वय 55, …

Read More »

लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची बाजारपेठेत धाव

रायगडात खरेदीसाठी झुंबड अलिबाग : प्रतिनिधीरायगड जिल्ह्यात 15 ते 24 जुलै या कालावधीत टाळेबंदी (लॉकडाऊन) जाहीर करण्यात आली आहे. 10 दिवसांसाठी आवश्यक असलेल्या वस्तू खरेदी करण्यासाठी मंगळवारी (दि. 14) नागरिकांची बाजारपेठांमध्ये झुंबड उडाली होती. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाल्याचे चित्र दिसून आले. किराणा मालाच्या दुकानासमोर लांबच लांब रांगा लागल्या …

Read More »

कोरोना रुग्णांसाठी किमान 1000 बेडचे सुसज्ज रुग्णालय उपलब्ध करून द्या!

आमदार प्रशांत ठाकूर यांची आग्रही मागणी मुख्यमंत्री आणि नगरविकासमंत्र्यांना निवेदन सादर पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल व उरण तालुक्यातील कोरोना रुग्णांसाठी सिडकोच्या माध्यमातून तातडीने किमान 1000 बेडचे सुसज्ज रुग्णालय उपलब्ध करून देण्यात यावे, अशी आग्रही मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. …

Read More »

रायगड जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन

15 जुलैच्या मध्यरात्रीपासून 10 दिवसांसाठी निर्णय लागू अलिबाग : प्रतिनिधीरायगड जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी 15 जुलैच्या मध्यरात्री 12 वाजल्यापासून ते 24 जुलैच्या मध्यरात्री 12 वाजेपर्यंत टाळेबंदी (लॉकडाऊन) करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या काळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्यात येणार …

Read More »