अलिबाग : जिमाकाकोरोना विषाणूबाधित व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना रायगड जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त असलेल्या एका रुग्णाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे या व्यक्तीला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.परदेशवारी करून आलेल्या रायगड जिल्ह्यातील एका व्यक्तीला मागील काही दिवसांपासून कोरोनाची लागण झाल्याने त्याच्यावर मुंबई येथील भाभा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. या व्यक्तीला सुरुवातीला …
Read More »वाशीत महिलेचा मृत्यू
नवी मुंबई : रामप्रहर वृत्तवाशीतील खासगी रुग्णालयातील एका महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे आता समोर आले आहे. हा मृत्यू 24 तारखेला झालेला होता, मात्र या महिलेचा कोरोना चाचणी अहवाल येणे बाकी होते. गुरुवारी (दि. 26) आलेल्या या रिपोर्टमध्ये ही 65 वर्षीय महिला पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाबाधित नागरिकांच्या मृत्यूचा …
Read More »विरोधी पक्षनेत्यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्याची मागणी मुंबई : प्रतिनिधीकोरोनामुळे राज्यातील असंघटित क्षेत्रातील कामगारांसमोर तसेच रोजंदारीवर अवलंबून असलेल्या कामगारांच्या अडचणीच्या काळात सरकारने त्यांच्या पाठीशी उभे राहायला हवे. यासाठी सूचविलेल्या उपाययोजनांची शासनाने त्वरित दखल घ्यायला हवी, अशा मागणीचे संयुक्त पत्र विधानसभा आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्र्यांना …
Read More »केंद्र सरकारचा गोरगरिबांना दिलासा
एक लाख 70 हजार कोटींचे पॅकेज जाहीर नवी दिल्ली : वृत्तसंस्थाकोरोना विषाणूमुळे हातावर पोट असणार्यांचे हाल होत आहेत. त्यांना दिलासा देण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी गुरुवारी (दि. 26) एक लाख 70 हजार कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली. दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी विविध दिलासादायक निर्णय …
Read More »भूतिवलीतील मळा संचारबंदीत बनलाय सर्वांचा आधार
शेतकर्यांच्या शेतावर ग्राहकांची गर्दी कर्जत ः बातमीदारकर्जत तालुक्यातील भूतिवली येथील शेतकर्यांनी समूह शेती केली आहे. सहा शेतकर्यांनी एकत्र येऊन भाजीपाल्याची शेती करीत आहेत. देशात आणि राज्यात आधी जमावबंदी आणि आता संचारबंदी लागू केल्यानंतर भाजीपालादेखील शेतातून घाऊक बाजारपेठ गाठू शकत नाही, पण भूतिवली येथील शेतकर्यांच्या मळ्यावर आजूबाजूच्या 25 गावांतील लोक जाऊन …
Read More »कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सरसावला
आवश्यक तिथे सहकार्याचा हात देणार : मोहन भागवत नागपूर : प्रतिनिधीकोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या संकटाच्या परिस्थितीत दक्ष नागरिक म्हणून कर्तव्य बजावण्याचे काम संघ स्वयंसेवकांनी सुरू केले आहे. प्रशासनाच्या सल्ल्याने व परवानगीने आवश्यक तिथे सहकार्याचा हात दिला जात आहे. समाजानेही सरकारच्या सूचनांचे पालन करून कोरोनावर विजय मिळवण्याचा संकल्प करावा,’ असे आवाहन …
Read More »खालापूर तालुक्यातील धक्कादायक घटना
खालापूर, खोपोली : प्रतिनिधीदुचाकी घेण्यासाठी एक लाख रुपयाचा तगादा लावणार्या पतीच्या छळाला कंटाळून पूजा जयेंद्र जाधव (वय 22) हिने साडीद्वारे गळफास घेतल्याची हृद्ययद्रावक घटना घडली. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पूजाच्या पतीला पोलिसांनी अटक केली आहे.कर्जत तालुक्यातील मुगपे हे माहेर असलेल्या पूजाचे 2018मध्ये खालापूर तालुक्यातील मिळगाव कातकरवाडी येथे …
Read More »नागरिकांनी उभारली निरोगी आरोग्याची गुढी
पनवेल : रामप्रहर वृत्तगुढीपाडव्याचा सण बुधवारी (दि. 24) पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता यंदा नागरिकांनी निरोगी आरोग्याची गुढी उभारल्याचे चित्र दिसून आले. चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून मराठी नववर्षारंभ होतो. भारतीय संस्कृतीत चैत्र महिन्याला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. केवळ धार्मिक, ऐतिहासिक, नैसर्गिकच नव्हे, तर आरोग्याच्या दृष्टीनेही हा …
Read More »राज्याला अवकाळीचा तडाखा
पुणे : प्रतिनिधीपुणे, कोल्हापूर आणि नाशिकमध्ये बुधवारी (दि. 24) विविध भागांना अवकाळी पावसाचा तडाखा बसला. पुण्यातील कात्रज, हडपसर या भागांत सोसाट्याच्या वार्यासह जोरदार पाऊस बरसला. त्यामुळे काही क्षणांत रस्ते जलमय झाले. राज्यात आधीच संचारबंदी लागू करण्यात आलेली असल्याने पावसामुळे कोणतीही गैरसोय झाली नाही. दरम्यान, हवेत मात्र गारवा निर्माण झाला असून …
Read More »कोरोनाविरुद्धचे युद्ध 21 दिवसांत जिंकायचेय!
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आवाहन नवी दिल्ली : वृत्तसंस्थादेशभरात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशभरात लॉकडाउनची घोषणा केली. त्यानंतर बुधवारी (दि. 25) पहिल्यांदाच आपला मतदारसंघ असलेल्या वाराणसीतील जनतेशी त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. महाभारताचे युद्ध 18 दिवसांत जिंकले गेले होते. आता आपल्याला 21 दिवसांत करोनाविरोधातील युद्ध जिंकायचे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper