Breaking News

Ramprahar Reporters

आमदार चषक क्रिकेट स्पर्धा

पनवेल : रामप्रहर वृत्तशिव प्रबळ सामाजिक विकाससंस्था आणि कर्तेश्वर क्रिकेट संघ व जय हनुमान क्रिकेट संघातर्फे आमदार प्रशांत ठाकूर चषक 2020 क्रिकेट स्पर्धेचे आयोजन पनवेल तालुक्यातील भिंगार येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेचेउद्घाटन भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 13) झाले.उद्घाटन सोहळ्यास आयोजक माजी सरपंच सुभाष पाटील, …

Read More »

भारताचा पहिला डाव गडगडला

न्यूझीलंडविरुद्धच्या सराव सामन्यात फलंदाज ढेपाळले हॅमिल्टन : वृत्तसंस्थान्यूझीलंडविरुद्धच्या तीनदिवसीय सराव सामन्यात  भारताचा पहिला डाव गडगडला. भारतीय संघावर पहिल्याच दिवशी 263 धावांमध्ये गारद होण्याची वेळ आली. चार फलंदाजांना भोपळाही फोडता आला नाही, तर दोन फलंदाजांचा अपवाद वगळता अन्य खेळाडूंना दोन अंकी धावसंख्याही गाठता आली नाही.येत्या 21 फेब्रुवारीपासून भारत आणि न्यूझीलंड यांच्यात …

Read More »

विवेक पाटलांच्या अटकेची जोरदार मागणी

कर्नाळा बँकेच्या भ्रष्ट कारभाराविरोधात चीड आणि संताप पनवेल ः रामप्रहर वृत्तकर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या कारभारात 63 बोगस कर्ज प्रकरणे करून त्यातील 512.50 कोटी रुपये लंपास करणारे व सर्वसामान्यांच्या पैशांवर डल्ला मारणारे शेकाप नेते,  कर्नाळा नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष माजी आमदार विवेक पाटील यांना अटक करा, अटक करा, अशी जोरदार मागणी …

Read More »

विवेक पाटलांसह कर्नाळा बँकेचे लेखापरीक्षकही अडचणीत 

हताश खातेदार, ठेवीदार मात्र पैसे मिळण्याच्या प्रतक्षेत शेतकरी कामगार पक्षाचे नेते व माजी आमदार विवेक पाटील अध्यक्ष असलेल्या कर्नाळा नागरी सहकारी बँकेत तब्बल 512 कोटींहून अधिक रुपयांचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले असून, या घोटाळ्याची व्याप्ती आणखी मोठी आहे. असंख्य ठेवीदार व खातेदारांनी कष्ट करून कर्नाळा बँकेत जमा केलेली त्यांची आयुष्यभराची …

Read More »

भाजप प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील; मुंबई अध्यक्षपदी लोढा कायम

मुंबई : प्रतिनिधीभाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी पुन्हा एकदा चंद्रकांत पाटील यांची फेरनिवड झाली आहे. भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी विनोद तावडे आणि पंकजा मुंडे यांच्या नावांचीही भाजपच्या गोटात चर्चा होती, मात्र पक्षनेतृत्वाने चंद्रकांत पाटील यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. शिवाय माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची चंद्रकांत पाटील यांच्या नावाला पसंती …

Read More »

घोटाळेबाज कर्नाळा बँकेवर आज ठेवीदारांचा धडक मोर्चा

पनवेल : रामप्रहरकर्नाळा बँकेतील कोट्यवधींच्या घोटाळ्यामुळे हजारो ठेवीदार व खातेदारांना मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत बँकेचे अध्यक्ष व शेकाप नेते केवळ आश्वासने देत आहेत. ठेवीदारांचे हक्काचे पैसे मात्र त्यांना दिले जात नाहीत, तर दुसरीकडे सरकारही याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे ठेवीदारांना त्यांच्या हक्काचे पैसे परत …

Read More »

विवेक पाटलांनी ठेवीदारांचा ‘सुताने’ कापला गळा!

शेतकरी कामगार पक्षाचे नेते व माजी आमदार विवेक पाटील अध्यक्ष असलेल्या कर्नाळा नागरी सहकारी बँकेत तब्बल 512 कोटींहून अधिक रुपयांचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले असून, या घोटाळ्याची व्याप्ती आणखी मोठी आहे. असंख्य ठेवीदार व खातेदारांनी कष्ट करून कर्नाळा बँकेत जमा केलेली त्यांची आयुष्यभराची पुंजी या घोटाळ्यामुळे संकटात सापडली आहे. हक्काचे …

Read More »

जागा देतो सांगून आठ जणांची 52 लाख 45 हजारांची फसवणूक

शेकाप सभापतीविरोधात गुन्हा दाखल उरण : प्रतिनिधीउरण पंचायत समितीचे शेतकरी कामगार पक्षाचे विद्यमान सभापती अ‍ॅड. सागर कडू यांनी चाणजे महसुली गावाच्या क्षेत्रात हवी असलेली जागा घर बांधण्याकरिता देतो, असे सांगून तब्बल आठ जणांची 52 लाख 45 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी उरण पोलीस ठाण्यात सभापती …

Read More »

भारताच्या पराभवाची मालिका; महिलांचीही हार

मेलबर्न : वृत्तसंस्था19 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम लढतीत युवा संघाचा बांगलादेशकडून पराभव…टी-20 मालिकेत विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचे न्यूझीलंडला व्हाईटवॉश दिल्यानंतर याच संघाकडून वन डे मालिकेत भारताला व्हॉईटवॉश आणि हे कमी म्हणून की काय भारतीय महिलांचीही तिरंगी मालिकेतील फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून हार झाली. स्मृती मानधनाने दमदार फटकेबाजी करून तोंडाशी आणलेला विजयी …

Read More »

वन डे मालिकेत भारत हरला, पण राहुल-श्रेयसने मने जिंकली!

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाविराट कोहलीच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्धची टी-20 मालिका 5-0ने जिंकल्यानंतर वन डे मालिका यजमानांनी 3-0ने जिंकत भारताच्या व्हाईटवॉशला त्याच पद्धतीने उत्तर दिले. असे असले तरी के. एल. राहुल आणि श्रेयस अय्यर या जोडीने आपल्या सर्वांगसुंदर खेळीने क्रिकेटप्रेमींची मने जिंकली आहेत.न्यूझीलंडविरुद्धच्या तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात भारताच्या के. एल. राहुलने …

Read More »