Breaking News

Ramprahar Reporters

अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त पेट्रोल देण्यास मनाई

अलिबाग : जिमाकाकोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता अत्यावश्यक सेवा पुरविणार्‍यांव्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तींच्या दुचाकी वाहनांना नागरी भागात पेट्रोल देण्यास मनाई करण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी निधी चौधरी यांनी पारित केले आहेत. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित पेट्रोल पंपधारकाविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असेही चौधरी यांनी स्पष्ट केले आहे.कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे 14 …

Read More »

कार्यतत्पर आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली गरीब, गरजूंना पनवेल भाजपतर्फे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

पनवेल : प्रतिनिधीमाजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजप लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केलेल्या मदतीच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल महापालिका हद्दीत पक्षातर्फे गरीब, गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप सुरू केले आहे. सध्या कोरोनामुळे लॉकडाऊन असलेले गरजवंत, गोरगरीबांना यातून दिलासा मिळाला …

Read More »

ना. नितीन गडकरींकडून वाहनचालकांसाठी मुदतवाढ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था ज्या गाड्यांचे रजिस्ट्रेशन, फिटनेस सर्टिफिकेट, परमिट, तसेच ड्रायव्हिंग लायसन्स यांची मुदत 31 मार्चपर्यंत वैध आहे त्यांना 30 जूनपर्यंत मुदतवाढ देण्याचे निर्देश केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहेत. सगळ्या राज्य सरकारांनी निर्देशाचे पालन करून लोकांना कुठलाही त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशी सूचनाही गडकरी यांनी …

Read More »

भाजपतर्फे राज्यभरात व्यापक सेवाकार्य

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी मुंबई : प्रतिनिधीकोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाशी मुकाबला करण्यासाठी सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये भारतीय जनता पक्षातर्फे राज्यभर गरजूंना जेवण, कम्युनिटी किचन, गरजूंना दैनंदिन गरजेच्या वस्तूंचा पुरवठा आणि रक्तदान या माध्यमातून सेवाकार्य सुरू आहे. या सेवाकार्यात राज्यभरातील एक लाख 25 हजार कार्यकर्ते सहभागी झाले आहेत, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत …

Read More »

देशात 24 तासांमध्ये आढळले 227 कोरोनाग्रस्त

नवी दिल्ली, मुंबई : गेल्या 24 तासांत देशातील 227 कोरोनाग्रस्त रुग्णांची प्रकरणे समोर आली आहेत. देशात मंगळवारी (दि. 31) दुपारी 4 वाजेपर्यंत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 1251वर पोहोचली होती. यापैकी 101 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, तर एक रुग्ण स्थलांतरील आहे. सध्या 1117 रुग्णांवर उपचार सुरू असून ते वैद्यकीय तपासणीखाली …

Read More »

नवीन पनवेलमधील रुग्णालय सील

मुलगी अमेरिकेतून आल्याचे न कळविता डॉक्टरने रुग्ण तपासल्याने मनपाची कारवाई पनवेल : प्रतिनिधीआपली मुलगी अमेरिकेतून आल्याचे महापालिकेला न कळविता रुग्णांची तपासणी सुरू ठेवल्याने नवीन पनवेल येथील डॉ. मोहिते यांचे साई बाल रुग्णालय सील करण्यात आले आहे. पनवेल महापालिकेने ही कारवाई केली.लहान मुलांसाठी प्रख्यात असलेले डॉ. मोहिते यांचे नवीन पनवेल सेक्टर …

Read More »

अंगणवाडी सेविका, आशा वर्करची कार्यतत्परता

महिलेची यशस्वी प्रसुती पनवेल : रामप्रहर वृत्तकोरोनामुळे लॉकडाऊन असताना पनवेल तालुक्यातील न्हावा येथील एका महिलेची यशस्वी प्रसुती करण्यात यश आले आहे. याकामी अंगणवाडी सेविका व आशा वर्कर यांनी तत्परता दाखविली.पनवेल तालुक्यातील न्हावा गावच्या रुची लाखन सिंग या गरोदर मातेच्या घरी अंगणवाडी सेविका सुनिता भोईर यांनी भेट दिली, तेव्हा रुची यांना …

Read More »

पनवेल येथे कोविड रुग्णालय सज्ज

अलिबाग : जिमाकापनवेल उपजिल्हा रुग्णालय येथे कोरोना कोविड-19 रुग्णालयाची स्थापना करण्यात आली असून, हे 120 खाटांचे रुग्णालय आता जिल्हा कोविड रुग्णालय म्हणून ओळखले जाणार आहे. रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी नुकतीच या रुग्णालयाची पाहणी केली. या वेळी पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख, प्रांताधिकारी दत्तात्रेय नवले, तहसीलदार अमित सानप, जिल्हा शल्यचिकित्सक …

Read More »

वरळी कोळीवाडा पोलिसांकडून सील

कोरोनाचे चार संशयित रुग्ण आढळल्याने खबरदारी मुंबई : प्रतिनिधीकरोना व्हायरसचे संशयित रुग्ण आढळल्याने मुंबईतील वरळी कोळीवाडा परिसर पोलिसांकडून सील करण्यात आला आहे. प्रादुर्भाव रोखण्यासाठी ही खबरदारी घेण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे या चार संशयितांपैकी एकानेही परदेशात प्रवास केलेला नाही. यातील एक ट्रॉम्बे येथे कूक म्हणून काम करीत होता, इतर तिघे …

Read More »

वीज दरात मोठी कपात

राज्यभरातील ग्राहकांना दिलासा मुंबई : प्रतिनिधीराज्य वीज नियामक आयोगाने सरकारच्या तिजोरीवर कोणताही अतिरिक्त भार न पडू देता स्वस्तात वीज देण्याचे नियोजन केलं आहे. वीज नियामक आयोगाचे अध्यक्ष आनंद कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार, घरगुती विजेच्या वापरात 5 ते 7 टक्के, व्यावसायिक दरात 10 ते 12 टक्के आणि औद्योगिक दरात 10 ते …

Read More »