Breaking News

Ramprahar Reporters

रायगड जि. प.च्या 564 शाळा दुरुस्तीविना

अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्हा परिषदेच्या 564 शाळांच्या इमारती नादुरुस्त आहेत. जिल्हा नियोजन समितीने नादुरुस्त शाळा इमारत दुरुस्तीसाठी आठ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे, मात्र नादुरुस्त शाळांची यादीच अद्याप जिल्हा नियोजन समितीकडे दिली नसल्याने निधी वर्ग करण्यात आलेला नाही. त्यामुळे निधी उपलब्ध असूनही शाळा इमारतीच्या दुरुस्तीचे काम रखडले आहे. …

Read More »

पनवेलमध्ये आता जिल्हा व सत्र न्यायालय; शासनाचे शिक्कामोर्तब

आमदार प्रशांत ठाकूर आणि वकील संघटनेच्या पाठपुराव्याला यश पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल येथे येत्या 27 जुलैपासून जिल्हा व सत्र न्यायालय सुरू होणार आहे. त्यामुळे पनवेल, उरण, कर्जत व खालापूर या तालुक्यांतील पक्षकार आणि वकिलांचा अलिबागला जाण्याचा दूरचा फेरा, तसेच वेळ व पैसा वाचणार आहे. याबद्दल पनवेल वकील संघटनेचे अध्यक्ष …

Read More »

विंडीजविरुद्ध रोहितकडे धुरा?

भारतीय युवा खेळाडूंना संधी मिळणार मुंबई : प्रतिनिधी विश्वचषकानंतर आता भारताचा संघ वेस्ट इंडिजबरोबर दोन हात करणार आहे. भारत आणि विंडीज यांच्यामध्ये दोन कसोटी सामने आणि प्रत्येकी तीन एकदिवसीय व ट्वेन्टी-20 सामने खेळवण्यात येणार आहेत. या सामन्यांसाठी संघ निवडताना युवा खेळाडूंना जास्त संधी देण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे. या …

Read More »

‘हॉल ऑफ फेम’मध्ये सचिनचा समावेश

लंडन : वृत्तसंस्था क्रिकेट जगतातील माजी दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर याचा समावेश आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) ‘हॉल ऑफ फेम’मध्ये करण्यात आला आहे. दक्षिण आफ्रिकेचा माजी गोलंदाज अ‍ॅलन डोनाल्ड आणि ऑस्ट्रेलियाची माजी महिला क्रिकेटपटू कॅथरिन यांनाही हा प्रतिष्ठेचा सन्मान देण्यात आला आहे. लंडनमध्ये नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात सचिन, डोनाल्ड, कॅथरिनसह तिघांचा आयसीसी …

Read More »

वाकडी-दुंदरे रस्त्याची डागडुजी

पनवेल : रामप्रहर वृत्त रायगड जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणारा पनवेल तालुक्यातील वाकडी ते दुंदरे रस्ता खड्ड्यात गेला आहे. यामुळे वाहनचालक तसेच प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. जिल्हा परिषद याकडे लक्ष देत नसल्याचा संतप्त नागरिकांचा आरोप आहे. या पार्श्वभूमीवर दुंदरे ग्रामपंचायतीने स्वतः पुढाकार घेत या रस्त्यातील खड्डे बुजविण्यास सुरुवात …

Read More »

मिनीट्रेनच्या इंजिनात बिघाड

कर्जत : बातमीदार माथेरान-अमन लॉज शटलसेवा गुरुवारी (दि. 18) इंजीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने रद्द करण्यात आली. त्यामुळे पर्यटकांचे हाल झाले. प्रसिद्ध पर्यटनस्थळ माथेरानची लाइफलाइन मिनीट्रेनची सेवा नेरळ-माथेरानदरम्यान पावसाळ्यात बंद असते. या काळात स्थानिकांसह पर्यटकांसाठी माथेरान-अमन लॉज शटलसेवा दररोज सुरू असते. गुरुवारी ही शटलसेवा नवीन इंजिनात तांत्रिक बिघाड झाल्याने सकाळच्या पहिल्या …

Read More »

खालापुरात कंपनीमध्ये तीन कामगार भाजले

खोपोली : प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील डोणवत येथील कार्बन स्टील मार्ट प्रा. लि या कंपनीत तीन कामगार भाजून गंभीर जखमी झाल्याची घटना घडली असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे समजते, मात्र यामागचे कारण व्यवस्थापनाकडून अधिकृत माहिती समोर न आल्याने गुलदस्त्यात आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, डोणवत येथील कार्बन स्टील मार्ट …

Read More »

काँग्रेस, शेकापचे कार्यकर्ते भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त सब का साथ, सब का विकास, या न्यायाने देशाची प्रगती साधणार्‍या भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार्‍यांचा ओघ कायम असून, खालापूर तालुक्यातील महड व हाळ येथील काँगे्रस, तसेच शेतकरी कामगार पक्षातील कार्यकर्त्यांनी गुरुवारी (दि. 18) भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी या पक्षप्रवेशकर्त्यांचे …

Read More »

‘रामप्रहर’वर शुभेच्छांचा वर्षाव

पनवेल : रामप्रहर वृत्त रायगड जिल्ह्यात अग्रेसर असलेल्या दैनिक ‘रामप्रहर’चा 11वा वर्धापन दिन गुरुवारी (दि. 18) मोठ्या उत्साहात साजरा झाला. या वेळी विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. वर्धापन दिनानिमित्त ’रामप्रहर’च्या कार्यालयात श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली होती. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजप पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ …

Read More »

पनवेल मनपा कर्मचार्यांना सातवा वेतन आयोग लागू होण्याचा मार्ग मोकळा

पनवेल : प्रतिनिधी पनवेल महानगरपालिकेच्या कर्मचार्‍यांना पूर्वलक्षी प्रभावाने महाराष्ट्र नागरी सेवा नियम लागू करण्यास आणि सातव्या वेतन आयोगाप्रमाणे सुधारित वेतनश्रेणी देण्यास बुधवारी (दि. 17) झालेल्या महासभेत मंजुरी मिळाली. त्याचप्रमाणे आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहाची भाडेवाढ टळली आहे. त्यामुळे पालिका कर्मचारी आणि नाट्यरसिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. पनवेल महापालिकेची सर्वसाधारण …

Read More »