कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारचे पाऊल नवी दिल्ली : वृत्तसंस्थाभारतामध्ये करोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे. देशात एक हजारहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली असून, मृत्यू झालेल्यांचा आकडा 30च्या घरात पोहोचला आहे. या संकटावर मात करण्यासाठी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 11 वेगवेगळ्या सबलीकरण गटांची स्थापना केली आहे. सरकारकडे उपलब्ध असलेल्या सामुग्रीचा …
Read More »लॉकडाऊनमध्ये फिट राहा!
पंतप्रधान मोदींनी शेअर केली योगासने नवी दिल्ली : वृत्तसंस्थादेशभरात कोरोनाचा उद्रेक झालेला असताना लॉकडाऊनच्या या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी फिटनेससाठी काय करतात, हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. याचे उत्तर पंतप्रधान मोदींनी सोमवारी (दि. 29) दिले. त्यांनी योगासने करतानाचे काही व्हिडिओ शेअर केले आहेत. मन की बात कार्यक्रमात एका व्यक्तीने पंतप्रधान …
Read More »‘देशात लॉकडाऊन वाढविण्याचा विचार नाही’
नवी दिल्ली : देशात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर देशातील लॉकडाऊनचा कालावधी आणखी वाढवण्यात येणार असल्याच्या सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहेत, मात्र या चर्चा म्हणजे अफवा असून त्यावर नागरिकांनी विश्वास ठेवू नये. केंद्र सरकारचा लॉकडाऊन वाढवण्याचा कोणताही विचार नाही, असे स्पष्टीकरण कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांनी दिले आहे. केंद्राच्या या …
Read More »कोरोनाच्या लढाईत ‘रयत’कडून अर्थसहाय्य
मुंबई : प्रतिनिधीराज्यातील अनेक संस्था आणि मंदिर ट्रस्ट कोरोनाविरुद्धच्या लढाईत आपले आर्थिक योगदान देत आहेत. रयत शिक्षण संस्थेनेही पुढाकार घेत दोन कोटी रुपयांची मदत राज्य सरकारच्या मुख्यमंत्री सहायता निधीत दिली आहे. कोविड-19 या जागतिक महामारीचा सामना देश मोठ्या धैर्याने करत आहे, मात्र कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आल्याने …
Read More »आरोग्याची काळजी घ्या : डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी
रेवदंडा : प्रतिनिधीकोरोनाच्या पार्श्वभूमीवर जेष्ठ निरूपणकार पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी जनतेला आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. आप्पासाहेबांनी व्हिडीओ क्लिपद्वारे नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे सूचित केले आहे. शासनाचे आरोग्यदूत असलेल्या डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी म्हटले आहे की, सध्या जगभरात प्रादुर्भाव झालेल्या कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर जनतेने वेळोवेळी आपले हात …
Read More »पनवेल महापालिका हद्दीत घरोघरी कोरोना तपासणी
पनवेल : वार्ताहरजगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पनवेल महानगरपालिका हद्दीत घरोघरी जाऊन तपासणी करण्यास शनिवार (दि. 28)पासून सुरुवात करण्यात आली आहे. नागरिकांनी काळजी घेत आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे. वैयक्तिक स्वच्छता राखावी. कोरोनाची लक्षणे जाणवताच जवळील रुग्णालयात जाऊन तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. कोरोनाचा प्रसार होऊ …
Read More »पनवेलमध्ये गरिबांसाठी सुरू होणार अन्नछत्र
भाजपच्या सूचनेची आयुक्तांनी घेतली दखल पनवेल : रामप्रहर वृत्तआमदार प्रशांत ठाकूर यांच्या निर्देशानुसार पनवेल महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर व भाजप नगरसेवकांच्या सूचनेप्रमाणे मनपा हद्दीत गोरगरिबांसाठी अन्नछत्र सुरू करण्यात येणार आहे. आयुक्तांनी त्यासंबंधी कार्यवाहीचे आदेश दिलेत. त्यामुळे हातावर पोट असणार्यांना लॉकडाऊनच्या काळात अन्न मिळणार आहे.कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र …
Read More »माणगावमध्ये क्रिकेट खेळणार्या नऊ जणांवर गुन्हा दाखल
माणगाव : प्रतिनिधीकोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेला जमावबंदीचा आदेश धुडकावून एकत्रितपणे क्रिकेट खेळल्याने माणगाव तालुक्यातील डोंगरोळी येथील नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोना विषाणू थांबविण्यासाठी जारी केलेल्या आदेशाची पायमल्ली करून संसर्गजन्य आजार पसरवायची हयगय व घातक कृती करून डोंगरोळी येथे नथुराम पाखड यांच्या शेतात एकत्र जमून नऊ जण …
Read More »काळजी घ्या; आकडा वाढतोय!
मुंबई, नवी दिल्ली : प्रतिनिधी, वृत्तसंस्थाराज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या दररोज वाढतच आहे. हा आकडा आता पावणेदोनशेच्या वर पोहोचला आहे. त्यात मुंबईत सात जण, तर नागपूर, कल्याण आणि डोंबिवलीत प्रत्येकी एक असे तीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. सध्या मुंबईत संशयित रुग्णांसह 209 कोरोनाग्रस्त दाखल आहेत. शुक्रवारी दिवसभरात एकूण 17 नवीन रुग्ण आढळले …
Read More »विरारमध्ये टेम्पोच्या धडकेत पाच मजुरांचा मृत्यू; दोघे जखमी
विरार : प्रतिनिधीलॉकडाऊनमुळे प्रवासी साधने बंद असल्याने पायी प्रवास करून घरी जाणार्या सात मजुरांचा विरारमध्ये मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून दोघे जखमी झाले आहेत. त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. भरधाव टेम्पोने जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला.कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने या व्हायरसचा …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper