चेन्नई : वृत्तसंस्था धडाकेबाज फलंदाजी आणि भेदक गोलंदाजीच्या जोरावर चेन्नईने दिल्लीवर 80 धावांनी दमदार विजय मिळवला. दिल्लीने नाणेफेक जिंकून चेन्नईला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. चेन्नईच्या डावाची सुरुवात चांगली झाली नाही. कारण सलामीवीर शेन वॉटसनला एकही धाव करता आली नाही, पण त्यानंतर सुरेश रैना आणि फाफ ड्यू प्लेसिस यांनी संघाला सावरले. …
Read More »सोसायटीच्या विषयाला राजकीय रंग देणे चुकीचे
पनवेल ः प्रतिनिधी सोसायटीतील टॉवरमुळे सोसायटीच्या विकासासाठी आर्थिक फायदा होत असल्याने टॉवर काढू नये, अशी कामोठे येथील शुभांगन सोसायटीची आग्रही मागणी असतानाही रहिवाशांच्या विचाराला न जुमानता त्याला विरोध करण्याचा एकतर्फी प्रयत्न प्रशांत जाधव यांनी केला असून त्याला राजकीय रंग देणे चुकीचे आहे, अशी प्रतिक्रिया सोसायटीमधील रहिवाशांनी व्यक्त केली आहे. सोसायटीच्या …
Read More »माथाडींसाठी कामगारदिनी खूशखबर
ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पात रोजगाराची संधी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते कार्यादेश सुपूर्द कळंबोली : रामप्रहर वृत्त भारतीय जनता माथाडी जनरल कामगार संघाच्या महाराष्ट्र राज्य नवी मुंबई कळंबोली येथील जुन्या टोळीला एल अॅण्ड टी कंपनीमार्फत मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रोजेक्टचे काम मिळाले आहे. हे काम माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर …
Read More »मिनीट्रेनचे रडगाणे सुरूच
पर्यटकांची पायपीट, एक प्रवासी फेरी रद्द कर्जत ः बातमीदार नेरळ-माथेरान-नेरळचा सध्या पर्यटन हंगाम सुरू असून, मिनीट्रेनचे इंजीन रुळावरून खाली घसरण्याचे प्रकार काही थांबत नाहीत. काल सकाळी माथेरान येथून पर्यटकांना घेऊन निघालेली मिनीट्रेन नेरळकडे येत असताना इंजीन रुळावरून खाली घसरले आणि त्यानंतर पुन्हा सहा तासांनी रुळावर ठेवण्यात आले. दरम्यान, मिनीट्रेनची दुपारची …
Read More »मसूद अझहर आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था भारतातील अनेक हल्ल्यांचा मास्टरमाइंड आणि जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी ठरवण्यात भारताच्या कूटनीतिला यश आले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने (यूएनएससी) बुधवारी (दि. 1) मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केले. भारताचा हा मोठा विजय मानला जात आहे. संयुक्त राष्ट्रातील भारताचे राजदूत …
Read More »हा नवीन भारत, घरात घुसून मारतो
मोदींचा दहशतवादावर घणाघात अयोध्या ः वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्या येथे घेतलेल्या जाहीर सभेत आपण केलेल्या विकासकामांची माहिती दिली. या वेळी त्यांनी विरोधकांचाही खरपूस समाचार घेतला. दहशतवादाच्या मुद्द्यावर बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, हा नवीन भारत असून नवीन भारत कोणाला त्रास देत नाही, पण जर कोणी …
Read More »‘त्या’ साडेआठ कोटीच्या गोलंदाजाची आयपीएलमधून माघार
नवी दिल्ली : वृत्तसंस्था किंग्ज इलेव्हन पंजाबने लिलावात 8.40 कोटी रुपये मोजून चमूत दाखल करून घेतलेल्या वरुण चक्रवर्तीने इंडियन प्रीमिअर लीगमधून माघार घेतली आहे. चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी चक्रवर्तीला दुखापत झाली होती आणि त्यातून तो अद्याप पूर्णपणे बरा झालेला नाही. त्यामुळे त्याला संपूर्ण आयपीएल स्पर्धेला मुकावे लागणार आहे. पंजाबने या …
Read More »आफ्रिदीच्या वर्ल्ड कप संघात तेंडुलकर, धोनीला स्थान नाही
लाहोर : वृत्तसंस्था पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने वर्ल्ड कप स्पर्धेसाठी त्याचा 11 जणांचा संघ जाहीर केला. विशेष म्हणजे त्याने जाहीर केलेल्या संघात महान फलंदाज सचिन तेंडुलकर आणि भारताचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांना स्थान देण्यात आलेले नाही. त्याच्या या संघात पाकिस्तानचेच पाच खेळाडू आहेत, ऑस्ट्रेलियाचे चार आणि …
Read More »आयपीएलच्या कामगिरीवरून कोहलीवर प्रश्नचिन्ह नको
नवी दिल्ली : वृत्तसंस्था रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ इंडियन प्रीमिअर लीगच्या 12व्या मोसमातून प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा पहिला संघ ठरला आहे. मंगळवारी पावसामुळे बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामना रद्द झाला आणि त्याचबरोबर विराट कोहलीच्या प्ले ऑफमध्ये खेळण्याच्या अखेरच्या आशाही विरून गेल्या. आयपीएलमधील या अपयशामुळे कोहलीच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित …
Read More »बीसीसीआयच्या अधिकार्याची पंजाबवर कारवाईची मागणी
नवी दिल्ली : वृत्तसंस्था इंडियन प्रीमिअर लीगमध्ये चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स या संघांवर स्पॉट फिक्सिंगप्रकरणी दोन वर्षांची बंदी घालण्यात आली होती. ड्रग्स बाळगणे हा त्यापेक्षा गंभीर गुन्हा आहे, त्यामुळे किंग्स इलेव्हन पंजाबवरही बंदीची कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी बीसीसीआयच्या एका अधिकार्याने केली आहे. पंजाबचे सहमालक नेस वाडिया याला …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper