Breaking News

Ramprahar Reporters

एमएमआरडीएचे क्षेत्र विस्तारले

मुंबई : प्रतिनिधी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (एमएमआरडीए) सीमा वाढविण्यास बुधवारी (दि. 20) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. यामुळे वसई, पनवेल, अलिबाग, खालापूर व पेण तालुक्याचा उर्वरित भाग आणि पालघर तालुका पूर्णपणे या प्राधिकरणात समाविष्ट होणार आहे. या संदर्भातील एमएमआरडीए अधिनियमातील अनुसूचीमध्ये सुधारणा करण्यासाठीचा मसुदा विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात …

Read More »

दहशतवाद्यांना पोसू नका; पाक, चीनला अमेरिकेचा सल्ला

वॉशिंग्टन ः पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर दहशतवाद्यांना पोसू नका आणि त्यांना मदद देणे बंद करा, अशा शब्दांत अमेरिकेने पाकिस्तान आणि चीनला उद्देशून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. संयुक्त राष्ट्र संघातील (युनो) आपापल्या जबाबदार्‍या यथाशक्ती पार पाडा, असेही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या दोन्ही देशांना म्हटले आहे. युनोकडून घोषित करण्यात आलेले …

Read More »

जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज चषक 2019

क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील तारा येथे इलेव्हन स्टार क्रिकेट संघ आणि भाजप युवा नेते रोहन पाटील यांच्या वतीने जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज चषक 2019 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन समारंभास जेएनपीटीचे विश्वस्त …

Read More »

न्यूझीलंडच्या रॉस टेलरचा विक्रम

डुनेडीन (न्यूझीलंड) : वृत्तसंस्था न्यूझीलंडच्या रॉस टेलरने बांगलादेशविरुद्धच्या तिसर्‍या वन डे सामन्यात विक्रमाला गवसणी घातली. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 330 धावांचा डोंगर उभा केला आणि त्यात टेलरच्या 69 धावांचा समावेश होता. त्याने या खेळीसह न्यझीलंडकडून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम नावावर केला. या सामन्यात टेलरने वन डे क्रिकेटमधील आठ धावांचा पल्लाही …

Read More »

क्रीडा पत्रकार, संघटक, प्रशिक्षक शिवराम सोनवडेकर यांचे निधन

मुंबई : प्रतिनिधी लाल मातीतील खेळाडू म्हणून दम घुमवल्यानंतर कबड्डी, खो-खो आणि कुस्तीसारख्या देशी खेळांना वर्तमानपत्रात मानाचे स्थान मिळवून देणारे हाडाचे क्रीडा पत्रकार, अ‍ॅथलिट, क्रीडा संघटक, खो-खो, कबड्डी प्रशिक्षक शिवराम सोनवडेकर यांचे बुधवारी (दि. 20) सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. ते 70 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुली असा …

Read More »

क्रिकेट स्पर्धेत कोप्रोली किंग विजेता

उरण : वार्ताहर आम्ही पिरकोनकर समूहातर्फे खास चिमुकल्यांसाठी उरण पूर्व विभागात प्रथमच 15 वर्षांखालील क्रिकेटपटूंसाठी मर्यादित षटकांची स्पर्धा रविवारी (दि. 17) आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेस बच्चेकंपनीचा प्रतिसाद लाभला. या स्पर्धेत परिसरातील 12 संघांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचे उद्घाटन पिरकोनचे माजी सरपंच गन्नाथ ठाकूर यांच्या हस्ते झाले. पुलवामा येथील …

Read More »

‘शहीद जवानांसाठी क्रिकेट मालिका जिंकायचीय’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना  भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने आर्थिक मदत केली. याबरोबरच शहीद जवानांसाठी ऑस्ट्रेलियाविरुद्धची क्रिकेट मालिका जिंकायची आहे, असे शमीने म्हटले आहे. पुलवामातील दहशतवादी हल्ल्याचा शमीने तीव्र शब्दांत निषेध केला. तो म्हणाला, मी क्रिकेट खेळतो, पण माझा देश सीमेवरील जवानांमुळे सुरक्षित …

Read More »

नवी मुंबईतील शिवानीची सॉफ्टबॉल संघात निवड

नवी मुंबई : प्रतिनिधी नागपूर येथील मनकापूरमधील जिल्हा क्रीडा संकुल येथे क्रीडा व युवक सेवा संचालनालयातर्फे आयोजित महिलांच्या 19 वयोगटातील सॉफ्टबॉल स्पर्धेत वाशी येथील शिवानी गायकवाड हिने महाराष्ट्र संघाकडून खेळताना सुवर्णपदक पटकावले. त्यामुळे तिची राष्ट्रीय संघात निवड झाली आहे. शिवानी ही ओरियंटल सोसायटीच्या सानपाडा येथील कॉलेज ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजीची …

Read More »

संदीप गुरव यांचा गौरव

नागोठणे : प्रतिनिधी रायगड येथील दिव्यांग खेळाडू संदीप प्रल्हाद गुरव यांना व्हीलचेअर तलवारबाजी खेळात जागतिक स्तरावर केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल राज्य शासनाच्या क्रीडा मंत्रालयाकडून शिवछत्रपती राज्य क्रीडा एकलव्य पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) प्रदान करण्यात आला आहे. मुंबईच्या गेट वे ऑफ इंडियावर झालेल्या शानदार सोहळ्यात गुरव यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराने सन्मानित केले गेले. …

Read More »

एमजीपीएलचा केएम ग्रुप विजेता

कर्जत : बातमीदार कर्जत तालुक्यातील मानिवली येथे ग्रामपंचायतीच्या वतीने मानिवली ग्रामपंचायत प्रीमियर लीग (एमजीपीएल)चे आयोजन करण्यात आले होते. यात केएम ग्रुप संघाने प्रथम क्रमांक पटकावला. मानिवली परिसरातील भव्य पटांगणात रंगलेल्या एमजीपीएलमध्ये 16 संघ सहभागी झाले होते. या वेळी चुरशीचे सामने होऊन वरई लिओन्स इलेव्हन संघ उपविजेता ठरला. या वेळी माजी …

Read More »