यजमान इंग्लंडवर साकारला दणदणीत विजय लॉडर्स : वृत्तसंस्था पाच वेळा विश्वविजेतेपद मिळवणार्या ऑस्ट्रेलियाने विश्वचषक 2019मध्ये यजमान इंग्लंडवर 64 धावांनी विजय मिळवून उपांत्य फेरी गाठली. कर्णधार अॅरॉन फिंचच्या शतकाच्या बळावर ऑस्ट्रेलियाने 285 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना बेन स्टोक्सने एकाकी 89 धावांची झुंज दिली, पण जेसन बेहेरनडॉर्फने टिपलेल्या पाच …
Read More »भारताचा सामना आज वेस्ट इंडिजशी
साऊदॅम्प्टन : वृत्तसंस्था विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत घोडदौड करणार्या भारतीय संघाची पुढील साखळी लढत गुरुवारी (दि. 27) वेस्ट इंडिजशी होणार आहे. न्यूूझीलंडविरुद्धच्या निसटत्या पराभवामुळे विंडीजच्या उपांत्य फेरीच्या आशा जवळपास संपुष्टात आल्या आहेत, परंतु उर्वरित सामन्यांत विजय मिळण्याचा त्यांचा निर्धार आहे. दुसरीकडे, विंडीजला नमवून सेमीफायनलमधील स्थान निश्चित करण्याच्या दृष्टीने टीम इंडिया मैदानात …
Read More »महापालिकेवर जीएसटी आकारु नये
प्राधिकरणाचा निर्णय, हस्तांतरण मार्गी लागणार पनवेल ः बातमीदार सिडको नोडमधील नागरी सुविधांसाठी राखीव असलेले भूखंड पनवेल महापालिकेला हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. भूखंडाच्या किंमतीवर लागणारा जीएसटी भरावा की नाही, यावरुन रखडलेले हस्तांतरण आता मार्गी लागणार असून यामुळे पनवेल महापालिकेच्या तिजोरीतील तब्बल 7 कोटी 32 लाख रुपयांचा भार कमी होणार आहे. …
Read More »रायगड जिल्ह्यातील शेतकर्यांच्या डोळ्यात पाणी
अलिबाग ः प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात अजूनही मान्सूनचे आगमन झालेले नाही. मान्सून पूर्व पावसाने रागडकराना दिलासा दिला. परंतु मागील काही दिवसांपासून पाऊसधारा फारशा बरसल्याच नाहीत. शेतकरी चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहत आहे. ढगात नाय… पण शेतकर्यांच्या डोळ्यात पाणी आलायं.., अजून दोन दिवस अशीच परिस्थिती राहिल्यास भाताची रोपे करपण्याची शक्यता आहे. जूनच्या सुरूवातीला …
Read More »ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक मोहन रानडे कालवश
पुणे ः गोवा मुक्ती संग्रामातील लढवय्ये कार्यकर्ते, स्वातंत्र्य सैनिक मोहन तथा दादा रानडे यांचे पुण्यातील एका खासगी रुग्णालयात पहाटे साडेपाच वाजता निधन झाले. ते 90 वर्षांचे होते. काही महिन्यापूर्वी त्यांना अन्न नलिकेच्या विकाराचा त्रास सुरु होता. तसेच त्यांच्या शरीरातील हिमोग्लोबीनदेखील कमी झाले होते. त्यामुळे तीन दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात …
Read More »प्रकल्पग्रस्तांना हक्क मिळवून देणे हीच दि.बां.ना खरी आदरांजली
लोकनेते रामशेठ ठाकूर यांची स्मृतिदिनी भावना पनवेल ः प्रतिनिधी आपले नेते दि. बा. पाटील साहेब योध्दा बनून प्रकल्पग्रस्तांसाठी लढले. त्यांच्या आशीर्वादाने प्रकल्पग्रस्तांच्या हक्कासाठी सक्रियतेने काम करून दि. बां.चेे स्वप्न साकार करू या, असे आवाहन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आज (दि. 24) येथे केले. शेतकरी प्रकल्पग्रस्तांसाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढणारे …
Read More »जांभिवली, कराडे खुर्द ग्रामपंचायतीवर ‘कमळ’ फुलले
रसायनी ः बातमीदार कराडे खुर्द ग्रामपंचायतीवर भाजपचे कमळ फुलले असून थेट सरपंचपदाच्या उमेदवार भारती हेमंत चितळे या निवडून आल्या आहेत. प्रभाग क्रमांक दोनचे उमेदवार विजय मुरकुटे यांना निसटता पराभव पत्करावा लागला. कराडे खुर्द ग्रामपंचायत निवडणूक मतदान रविवार (दि. 23) होऊन सोमवारी पनवेल तहसिल कार्यालय येथे मतमोजणी प्रक्रिया पार पडली. यावेळी …
Read More »आवरे ग्रामपंचायतीवर शिवसेना-भाजपा युतीचा झेंडा
उरण ः प्रतिनिधी उरण तालुक्यातील आवरे ग्रामपंचायतींच्या झालेल्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा युतीच्या निरा सहदेव पाटील यांनी थेट सरपंचपदी बाजी मारली. शेकापच्या उमेदवार अमृता धनेश गावंड यांचा 850 मताधिक्याने पराभव करीत 2038 मते मिळवून आवरे ग्रामपंचायतींमध्ये त्या दणदणीत मतांनी विजयी झाल्या आहेत. आवरे ग्रामपंचायतीमधील गेली अनेक वर्षांच्या शेकापच्या सत्तेला सुरुंग लावून शेकाप …
Read More »द. आफ्रिकेचे आव्हान संपुष्टात
लंडन : वृत्तसंस्था वर्ल्डकप स्पर्धेत लॉर्ड्सवर रविवारच्या सामन्यात पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेवर 49 धावांनी दणदणीत विजय प्राप्त केला. पाकिस्तानच्या धुरंदर गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेला 50 षटकांच्या अखेरीस 9 बाद 259 धावांवर रोखले. या सामन्यातील पराभवामुळे दक्षिण आफ्रिकेचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. त्यांचे 7 सामन्यानंतर केवळ 3 गुण आहेत. पाकने प्रथम …
Read More »विंडिजचा संघ मैदानात आल्यावर राष्ट्रगीताऐवजी वाजविले जाते गाणे
मँचेस्टर : वृत्तसंस्था इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या विश्वचषक स्पर्धेत सामना सुरु होण्याआधी प्रत्येक देशाचे राष्ट्रगीत वाजवलं जातं. वेस्ट इंडिजची टीम वर्ल्डकपमध्ये खेळत असली तरी तो एका देशाचा संघ नाही. कॅरेबियन प्रदेशात विविध बेटे आहेत. त्या बेटांनी मिळून वेस्ट इंडिजचा संघ तयार झाला आहे. वेस्ट इंडिज म्हणजे अनेक देशांचे मिळून कॉन्फिडरेशन संघराज्य …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper