Breaking News

Ramprahar Reporters

विराटकडून ‘आरसीबी’च्या पहिल्या विजयाचे अनुष्काला श्रेय

मुंबई : प्रतिनिधी इंडियन प्रीमिअर लीगच्या बाराव्या मोसमात प्ले ऑफ शर्यतीतून बाद होण्याचे सावट डोक्यावर असताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने किंग्स इलेव्हन पंजाबला नमवून पहिल्या विजयाची चव चाखली. बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीने या विजयाचे श्रेय आपल्या पत्नीला म्हणजेचे अनुष्का शर्मा दिले आहे. ’गेल्या वर्षी आणि त्यानंतर माझ्या आयुष्यात एक चांगली घटना …

Read More »

वर्ल्ड चॅम्पियनशीपसाठी तीन खेळाडूंची निवड

उरण : वार्ताहर रशिया येथे 15 ते 21 एप्रिल रोजी होणार्‍या वर्ल्ड युनिफाइट चॅम्पियनशीपसाठी युनायटेड शोतोकन कराटे असोसिएशनच्या तीन खेळाडूंची निवड झाली आहे. उरण तालुक्याील वेश्वी येथील पदाजी पांडुरंग मुंबईकर इंग्लिश मीडियम स्कूलमधील मानस मनीष पाटील (जांभुळपाडा) आणि प्रांजल सचिन पाटील (कळंबुसरे), तसेच जेएनपीटी येथील सेंट मेरी स्कूलची पलक राजन …

Read More »

हॅण्डबॉल स्पर्धेला खेळाडूंचा प्रतिसाद

पनवेल : वार्ताहर अ‍ॅमेच्युअर हॅण्डबॉल असोसिएशन रायगडद्वारे आयोजित 12 वर्षांखालील नववी आणि 10 वर्षांखालील दुसरी मुले व मुलींची जिल्हा अजिंक्यपद स्पर्धा रविवारी (दि. 14) खांदा कॉलनीतील  सीकेटी महाविद्यालय येथे झाली. या स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील सात शाळांमधून एकूण 24 संघ सहभागी झाले होते. स्पर्धेचे उद्घाटन राष्ट्रीय हँडबॉल खेळाडू श्रीशैला भंडारी हिच्या …

Read More »

वर्ल्ड कपसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर

स्मिथ, वॉर्नरचे पुनरागमन; फिंचकडेच धुरा सिडनी : वृत्तसंस्था ऑस्ट्रेलियाने आगामी विश्वचषक स्पर्धेसाठी संघ जाहीर केला असून, अपेक्षेप्रमाणे स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांचे पुनरागमन झाले आहे. या दोघांना वर्ल्ड कप संघात स्थान देताना जोश हेझलवूड आणि पीटर हँड्सकोम्ब यांना डच्चू देण्यात आले आहे; तर संघाची धुरा अ‍ॅरोन फिंच याच्याकडे कायम …

Read More »

दिल्लीपुढे हैदराबादची शरणागती

हैदराबाद : वृत्तसंस्था दिल्लीने यजमान हैदराबादला 39 धावांनी पराभूत केले आणि सलग चौथा सामना जिंकला. कॉलिन मुनरो (40) आणि कर्णधार श्रेयस अय्यर (45) यांच्या फटकेबाजीच्या बळावर दिल्लीने हैदराबादला सामना जिंकण्यासाठी 156 धावांचे आव्हान दिले होते, मात्र कागिसो रबाडा, ख्रिस मॉरिस आणि किमो पॉल या वेगवान मार्‍यापुढे हैदराबादचा संघ 116 धावांत …

Read More »

कहो दिलसे आप्पा फिरसे!

पनवेल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, रिपाइं व मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार श्रीरंग (आप्पा) बारणे यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक 19मध्ये रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत महापालिका सभागृहनेते परेश ठाकूर, नगरसेविका दर्शना भोईर, मुग्धा लोंढे, माजी नगरसेविका कल्पना ठाकूर, तसेच मनोज आंग्रे, अच्युत मनोरे, अभिषेक पटवर्धन, पवन सोनी, विनायक मुंबईकर, …

Read More »

रताळ्याला म्हणतात केळं आणि दुसर्याच्या लग्नात नाचतंय खुळं!

नांदेड : प्रतिनिधी काय अवस्था आहे त्या राज आणि त्यांच्या मनेसेची. मनसे आधी महाराष्ट्र नवनिर्माण सेना होती. त्यानंतर महाराष्ट्रात मतदार नसलेली सेना झाली. आता तर उनसे म्हणजे उमेदवार नसलेली सेना झाली आहे. लग्न दुसर्‍याचं आणि हे नाचून राहिले आहेत. रताळ्याला म्हणतात केळं आणि दुसर्‍याच्या लग्नात नाचतंय खुळं, अशी अवस्था राज …

Read More »

पवारांची घराणेशाही मतदार उलथवणार

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची टीका कर्जत : बातमीदार शरद पवार यांचा राजकीय वारस यापूर्वीच जाहीर झाला आहे. त्यामुळे पार्थ हे पवारांचे कितवे वारस आहेत? असा सवाल करून राष्ट्रवादीने मावळवर लादलेली घराणेशाही येथील सुज्ञ मतदार उलथवून टाकतील, अशी टीका रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी शनिवारी (दि. 13) नेरळ येथे आयोजित कार्यकर्ता …

Read More »

जडेजाच्या बळींचे शतक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था चेन्नई सुपरकिंग्ज संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजाने पुन्हा एकदा आपल्या फिरकीची कमाल दाखवली आहे. जयपूरच्या सवाई मानसिंह मैदानात राजस्थान रॉयल्स संघाविरुद्ध खेळत असताना जडेजाने आयपीएलमध्ये आपल्या शंभराव्या बळीची नोंद केली आहे. राजस्थानच्या स्टिव्ह स्मिथला माघारी धाडत जडेजाने आपल्या खात्यात शंभराव्या बळीची नोंद केली. आयपीएलमध्ये सर्वाधिक बळी …

Read More »

सिंधू उपांत्य फेरीत

सिंगापूर : वृत्तसंस्था संघर्षपूर्ण लढतीनंतर भारताच्या पी. व्ही. सिंधूने सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे, मात्र सायना नेहवाल, किदम्बी श्रीकांत आणि समीर वर्मा यांना पराभवाचा धक्का बसला. जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत 18व्या स्थानी असलेल्या आणि जागतिक कनिष्ठ स्पर्धेच्या कांस्यपदक विजेत्या चीनच्या काइ यानयानला पराभूत करण्यासाठी सिंधूला तीन गेमपर्यंत …

Read More »