नवी दिल्ली : वृत्तसंस्था पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाने विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानसोबत सामना खेळू नये म्हणून दबाव वाढत असताना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) प्रशासक समितीने याबाबतचा चेंडू सरकारकडे टोलवला आहे. वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानसोबत सामना खेळावा अथवा खेळू नये, याचा निर्णय सरकारशी चर्चा केल्यानंतरच होईल, असे प्रशासक समितीचे प्रमुख विनोद राय …
Read More »शेतकरी सन्मान निधीचा पहिला हप्ता उद्या मिळणार
लखनऊ : वृत्तसंस्था पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेंतर्गत मोदी सरकार येत्या रविवारी (दि. 24) दोन हजार रुपयांचा पहिला हप्ता शेतकर्यांच्या खात्यात जमा करणार आहे. गोरखपूर येथील शेतकरी मेळाव्यात पंतप्रधान मोदी एका क्लिकने देशातील 12 कोटी शेतकर्यांच्या बँक खात्यात 25 हजार कोटी रुपये ट्रान्सफर करणार आहेत. मोदी सरकारने या वर्षीच्या अर्थसंकल्पात …
Read More »शरद पवार यांच्यासमोर राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा गोंधळ
फलटण : प्रतिनिधी लोकसभा निवडणूक तोंडावर आली असताना शरद पवार यांच्या माढा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गटबाजीला तोंड फुटले आहे. खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष असलेल्या पवार यांना त्याचा शुक्रवारी (दि. 22) फलटण दौर्यात अनुभव आला. पवारांच्या भाषणादरम्यानच पक्षाच्या कार्यकर्त्यांचा जोरदार राडा झाला. हा वाद एवढा टोकाला गेला की संतप्त कार्यकर्त्यांना आवरण्यासाठी पोलिसांना …
Read More »रायगड पोलीस संघ उपांत्य फेरीत
मुंबई : प्रतिनिधी शिवनेरी सेवा मंडळाने आपल्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या स्व. मोहन नाईक चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या पुरुष गटात एअर इंडिया, महिंद्रा, देना बँक या मुंबईच्या संघांबरोबर रायगडच्या पोलीस संघाने; तर महिला गटात महात्मा गांधी, संघर्ष या उपनगरच्या संघांबरोबर मुंबईचा शिवशक्ती आणि खेड-रत्नागिरीचा अनिकेत स्पोर्ट्स यांनी उपांत्य फेरीत …
Read More »पाकविरुद्ध क्रिकेट न खेळण्याचा भारताला पूर्णपणे अधिकार : अख्तर
इस्लामाबाद : वृत्तसंस्था पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरने पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना आदरांजली वाहत भारताला पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट न खेळण्याचा पूर्णपणे अधिकार असल्याचे म्हटले आहे. भारतीय सैन्यावर हल्ला झाला असून, त्यामध्ये त्यांच्या जवानांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. यामुळे भारताने पाकिस्तानविरुद्ध न खेळण्याचा निर्णय घेतला तर त्याच्यात वावगे काहीच नाही, …
Read More »‘भारताला विश्वचषक जिंकण्याची चांगली संधी’
नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने मे महिन्यात इंग्लंडमध्ये होणार्या विश्वचषक स्पर्धेत भारताला विजयी होण्याची चांगली संधी असल्याचे म्हटले आहे. तो नोएडा येथे झालेल्या एका खासगी कार्यक्रमात बोलत होता. गांगुली म्हणाला, गेल्या सहा-सात महिन्यांच्या काळात भारतीय संघ चांगला खेळ करतोय. हे पाहता भारतीय संघ विश्वचषक स्पर्धा …
Read More »पाकविरुद्ध खेळण्याचा निर्णय बीसीसीआय घेईल : चहल
नवी दिल्ली : वृत्तसंस्था पुलवामा अतिरेकी हल्ल्यात 40 जवानांना आपले प्राण गमवावे लागल्यानंतर आगामी विश्वचषक स्पर्धेत भारताने पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट खेळू नये, अशी मागणी होऊ लागली होती, मात्र पाकविरुद्ध क्रिकेट सामना खेळायचा की नाही याचा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) घ्यायचा आहे, असे वक्तव्य फिरकीपटू यजुवेंद्र चहलने केले आहे. पाकविरुद्ध …
Read More »पाकिस्तानी खेळाडूंना व्हिसा नाकारल्याने आयओसीची भारतावर कारवाई
पुणे : प्रतिनिधी पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. विविध स्तरांवर पाकिस्तानचा निषेध होत असताना नेमबाजी विश्वचषकासाठी भारतात येणार्या पाकिस्तानी नेमबाजांना व्हिसा नाकारण्याचा निर्णयही घेण्यात आला. या निर्णयानंतर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेने (आयओसी) भारताला 14 कोट्यांसह नेमबाजी विश्वचषक आयोजित करण्याची परवानगी दिली आहे, मात्र भविष्यात कुठल्याही ऑलिम्पिक …
Read More »जय हनुमान चरी संघ विजेता
अलिबाग : प्रतिनिधी अलिबाग तालुक्यातील मोठे शहापूर येथे एकता क्रीडा मंडळ आयोजित जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत जय हनुमान चरी संघाने विजेतेपद पटकाविले; तर श्री हनुमान स्पोर्ट्स चरी संघ उपविजेता ठरला. या स्पर्धेला सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सदिच्छा भेट देऊन आयोजकांचे कौतुक केले आणि खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. …
Read More »भाजप नगरसेवकांच्या कामाचे श्रेय लाटण्याचा शेकापचा प्रयत्न
पनवेल : प्रतिनिधी पनवेल महानगरपालिका हद्दीतील भाजपच्या नगरसेवकांनी पाठपुरावा करून केलेल्या कामांचे श्रेय मिळवण्यासाठी शेकापकडून पूर्वीच झालेल्या कामांचे भूमिपूजन करण्याचा केविलवाणा प्रयत्न करण्यात आला. आपला निधी कोठे वापरता येतो याबाबतचे शेकापच्या नगरसेविकेचे अज्ञान यानिमित्ताने उघड झाले असल्याचे भाजपचे प्रवक्ते नगरसेवक प्रकाश बिनेदार यांनी म्हटले आहे. पनवेल महापालिका हद्दीतील विकासकामाचा शुभारंभ …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper