Breaking News

Pravin Gaikar

भागीदाराने केली सहकार्यांची तब्बल 17 कोटींची फसवणूक

बनावट कुलमुख्यत्यारपत्राचा वापर करून परस्पर विकल्या जमिनी पनवेल : वार्ताहर – आशापुरा रियल्टर्स या बांधकाम व्यवसायीक कंपनीतील राकेश संघवी या भागीदाराने कंपनीच्यावतीने विकत घेतलेल्या जमीनीच्या सातबारावर त्याच्या नावाची नोंद असल्याचा फायदा घेऊन तसेच इतर भागीदारांच्या बनावट कुल मुखत्यारपत्रांचा वापर करुन त्याद्वारे कंपनीच्या नावावर पनवेलच्या विचुंबे गावात असलेली कोट्यावधी रुपये किंमतीची …

Read More »

पालीतील बंद रुग्णवाहिका अखेर दुरुस्तीसाठी रवाना

पाली ः प्रतिनिधी – कोरोनाच्या साथरोगात 108 रुग्णवाहिकेचे महत्त्व व उपयुक्तता खर्‍या अर्थाने जाणवू लागली आहे. सुधागड तालुक्यात 108 रुग्णवाहिका बंद असल्याने व ऑक्सिजन रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने पालीतील एका 57 वर्षीय रुग्णाला हकनाक आपला प्राण गमवावा लागला होता. अखेर आता ही बंद रुग्णवाहिका दुरुस्तीसाठी पाठविण्यात आली आहे. रुग्णवाहिका बंद …

Read More »

माणगावात कोरोनाचा वाढता संसर्ग

11 दिवसांत आढळले 306 कोरोनाबाधित माणगाव ः प्रतिनिधी – कोरोनाने मागील 11 दिवसांत माणगाव तालुक्यात धुमाकूळ घातला असून या ठिकाणी   सातत्याने 35 ते 40च्या संख्येने कोरोना रुग्ण आढळत असल्याने प्रशासनाबरोबरच तालुक्यातील नागरिक भयभीत झाले आहेत. शनिवारी तालुक्यातील 28 रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती माणगाव उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. …

Read More »

रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

रेेवदंडा ः प्रतिनिधी – अलिबाग तालुक्यात बेलोशी येथे शनिवारी (दि. 5) कुलस्वामिनी नवतरुण मित्र मंडळाच्या वतीने जिल्हा शासकीय रक्तपेढीच्या सहकार्याने साखरचौथ गणेशोत्सवानिमित्त सामाजिक उपक्रम म्हणून  सायं. 3 ते 6 वाजेदरम्यान रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरास महिला व युवावर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या वेळी रेवदंडा पोलीस ठाण्याचे …

Read More »

दुय्यम निबंधक कार्यालयात दलाल, मध्यस्थांना नो एण्ट्री

पेण ः प्रतिनिधी  – पेण येथील महसूल विभागाचे नोंदणी व मुद्रांक नोंदणी दुय्यम निबंधक श्रेणी-1चे कार्यालय कार्यरत असून या कार्यालयात काही वर्षांपूर्वी पूर्ण वेळ अधिकारी नसल्याने असाच कारभार चालत होता. त्यामुळे दलालांचे चांगलेच फावले होते. मनमानी कारभार तसेच बेशिस्तपणामुळे कार्यालयात आजवर दलालांचा सुळसुळाट होता. दरम्यान, नूतन अधिकारी संजय घोडजकर रुजू …

Read More »

भावी जिल्हाधिकारी आदिवासींच्या दारी

विविध प्रश्नांचा आढावा; भौगोलिक रचनेचाही केला अभ्यास कर्जत ः बातमीदार – केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा पास झालेल्या आणि आपल्या परिविक्षाधीन सेवेचा कार्यकाळ पूर्ण करीत असलेले आयएएस अधिकारी माणिक घोस सध्या रायगड जिल्ह्यात आहेत. रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या सूचनेनुसार परिविक्षाधीन आयएएस घोस यांनी कर्जत तालुक्यातील आदिवासी समाजाचे प्रश्न समजून घेतले. …

Read More »

टाळेबंदीमध्येही जेएनपीटीचे कार्य उल्लेखनीय

उरण : वार्ताहर, प्रतिनिधी – जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) हे भारताचे प्रमुख कंटेनर पोर्ट आहे. लॉकडाऊनच्या निर्बंधांमध्ये शिथिलता आणि देशांतर्गत आर्थिक व्यवहारात सुरू झाल्याने जेएनपीटीमध्ये  मालवाहतूकीमध्ये निरंतर वाढ झाली आहे. कोविड 19 साथीच्या काळात भारतातील सर्व व्यवसाय ठप्प झाले असताना मालवाहतुकीमधील ही प्रगती म्हणजे सध्याच्या कठीण परिस्थितीमध्ये लवकरच सुधारणा …

Read More »

पडझडीत घ्याव्यात अशा सहा कंपन्या

बाजारात सध्या होत असलेली पडझड ही उत्तम कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याची संधी आहे. ज्यांना गेल्या दोन महिन्यांतील तेजी पकडता आली नाही, त्यांच्यासाठी या चांगल्या सहा शेअर्सची शिफारस. मागील आठवड्यात आपण बाजारात खूप हेलकावे पहिले. आठवड्याच्या सुरुवातीसच सीमेवर चीननं केलेल्या घुसखोरीच्या बातमीमुळं बाजाराशी घूस लागली तर गुरुवारी अमेरिकेत बेरोजगारीचे वाढते दर आणि …

Read More »

‘शहरी मनरेगा’ला वाढती बेरोजगारी झेपेल?

ग्रामीण भागातील बेरोजगारांसाठी जशी मनरेगा योजना राबविली जाते आहे, तशी शहरी भागातील बेरोजगारांसाठी शहरी मनरेगा योजना येऊ घातली आहे, पण कोरोना संकटात वाढलेली बेरोजगारी आणि आधीच रोजगार न वाढविता होत असलेली उत्पादन वाढ या भयावह संकटांचा मुकाबला ही योजना करू शकणार आहे? कोरोनाचे संकट जगाचे किमान एक वर्ष घेऊन टाकणार, …

Read More »

धीरापोटी फळे गोमटी

आपण सगळेच सध्या अनलॉक 4च्या आनंदात आहोत. अवतीभवती बरेच काही खुले होत असल्याचा हा आनंद स्वाभाविक आहे. परंतु या आनंदाला बेफिकीरीची जोड मिळाल्यास मात्र गंभीर परिणाम भोगावे लागतील. बुधवारी महाराष्ट्रात आजवरच्या सर्वाधिक 17 हजार 433 केसेस नोंदल्या गेल्या, तर गुरूवारी देशपातळीवर आजवरच्या सर्वाधिक 83 हजार 883 नव्या केसेसची नोंद झाली. …

Read More »