Breaking News

Pravin Gaikar

आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून वृक्ष पडझडीची पाहणी; प्रशासनाला दिल्या सूचना

पनवेल : रामप्रहर वृत्त – बुधवारी सुसाटयाच्या वार्‍यासह पनवेल परिसरात मुसळधार पाऊस झाला. यामुळे कळंबोली परिसरात वृक्षांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली. या कारणाने काही ठिकाणी रस्ते अडवले गेले होते. दरम्यान आमदार प्रशांत ठाकूर यांनी कळंबोलीचा दौरा करुन परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी सिडको आणि महापालिका प्रशासनाला सूचना दिल्या. मंगळवारी रात्रीपासून पनवेल …

Read More »

वादळात झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करुन भरपाई द्या -दर्शना भोईर

पनवेल : रामप्रहर वृत्त – पनवेल महानगरपालिका हद्दीत बुधवारी (दि. 5) झालेल्या वादळात नुकसान झालेल्या घरांचे व अन्य अस्थापनांनचे तातडीने पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी भाजप नगरसेविका दर्शना भोईर यांनी केली आहे. या संदर्भात पनवेलचे  तहसीलदार यांना निवेदन दिले आहे. नगरसेविका भोईर यांनी दिलेल्या निवेदनामध्ये म्हटल्याप्रमाणे, पनवेल …

Read More »

भाजप युवा मोर्चाची स्तुत्य कामगिरी

कामोठे : रामप्रहर वृत्त – वादळी वार्‍याच्या तडाख्याने व पावसामुळे कामोठेमध्ये झालेल्या झाडांच्या पडझडीमुळे कामोठ्यातील रस्ते बंद झाले होते. या वेळी भारतीय जनता युवा मोर्चा कामोठे मंडळ तर्फे रस्त्यातील झाडे बाजूला करून रस्ता नागरिकांसाठी व वाहनांसाठी मोकळा करण्यात आला. या वेळी कामोठे मंडळ भाजप अध्यक्ष रवींद्र जोशी, प्रभाग समिती सभापती …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम

डॉक्टरांना थर्मासचे वाटप पनवेल : रामप्रहर वृत्त – कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर थर्मासचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम भाजप शहर चिटणीस व नगरसेवक नितीन पाटील व सहकार्‍यांनी राबविला. या वेळी उमेश ईनामदार, भाजप पनवेल शहर सोशल मीडिया सेलचे शहर संयोजक प्रसाद …

Read More »

कोरळवाडी आदिवासी उपोषणावर ठाम

पनवेल : रामप्रहर वृत्त – आदिवासी विकास विभागाच्या बैठकीनंतरही राज्य सरकारच्या कोणत्याही खात्याकडून प्रतिसाद न मिळाल्याने काही मागण्यांसाठी कोरळवाडी आदिवासी बांधव 9 ऑगस्टच्या उपोषणावर ठाम असल्याचे सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांनी स्पष्ट केले आहे. पनवेल तालुक्यातील आपटा ग्रामपंचायत हद्दीमधील कोरळवाडी आदिवासी वाडीत स्वातंत्र्याच्या 74 वर्षांनंतरही आजपर्यंत कोणत्याही प्रकारच्या रस्ता नाही …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर : कोरोना योद्धा

वैश्विक महामारी कोरोनामुळे मानवी जीवन पार बदलून गेले आहे. कोविड-19 विषाणूबद्दलची नागरिकांमधील दहशत चार महिन्यांनंतर काही प्रमाणात कमी झाली असली तरी धोका अद्याप कायम आहे. त्यामुळेच अनलॉकचा तिसरा टप्पा सुरू होऊनदेखील जनजीवन पूर्णपणे सुरळीत झालेले नाही. अशा या आपत्तीमध्ये फार कमी लोकप्रतिनिधी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता जनतेसाठी कार्यरत आहेत. …

Read More »

नागोठण्यात पूरसदृश परिस्थिती

नागोठणे : प्रतिनिधी – सोमवारी रात्रीपासून मुसळधार पडत असलेल्या पावसामुळे अंबा नदीने मंगळवारी (दि. 4) सकाळी आपले पात्र ओलांडून परिसरात पुराचे पाणी भरावयास प्रारंभ केल्याने नागोठणे शहरात पुरसदृश परिस्थिती निर्माण झाली. दुपारी दोनच्या सुमारास नागोठणे एसटी बसस्थानक, नागोठणे-रोहे जुना रस्ता तसेच इतर सखल भागात पुराचे शिरले होते. पावसाचा जोर असाच …

Read More »

संशयाचे धुके गहिरे

अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणातील गूढ वाढतच चालल्यासारखे भासते आहे. दीड महिन्याहून अधिक काळ तपास करूनही मुंबई पोलिसांनी या प्रकरणी काहीही ठोस माहिती उजेडात आणल्याचे दिसले नाही. सीबीआय तपासाची मागणीही ठाकरे सरकारकडून सातत्याने फेटाळून लावण्यात आली. आणि आता तर त्यांनी तपासासाठी आलेल्या बिहारच्या वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यालाच बळजबरीने क्वारंटाइन केल्याचा आरोप होतो …

Read More »

पनवेल तालुक्यात 199 नवे कोरोनाग्रस्त

तिघांचा मृत्यू; 166 रुग्णांना डिस्चार्ज पनवेल : प्रतिनिधी – पनवेल तालुक्यात सोमवारी (दि. 3) कोरोनाचे 199 नवीन रुग्ण आढळले असून तिघांचा मृत्यू झाला आहे तर 166  रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 166 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून दोघांचा मृत्यू झाला आहे तर 118 रुग्ण बरे …

Read More »

कानसा-वारणा फाऊंडेशनकडून वृक्षलागवड; गरजूंना वस्तूंचे वाटप

मोहोपाडा : प्रतिनिधी – चौक वावर्ले येथील कानसा-वारणा फाऊंडेशनतर्फे  राज्यातील विविध जिल्ह्यात विविध जातीच्या 4000 वृक्षाची लागवड करण्यात आली तर 2000 शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करुन गरजूंना किराणा सामानाचे किटही वाटप करण्यात आले. संस्थापक दीपक पाटील, अध्यक्ष कृष्णा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कानसा-वारणा फाऊंडेशनचे पदाधिकारी सहकारी यांच्या सहकार्याने योगेश …

Read More »